एक कविता हरवलेली ... सापडली :)

शाळेत शिकलेल्या कविता, कोणतीतरी त्यापैकी एक मनात कुठेतरी घर करून राहिलेली आणि खूप खूप आवडलेली, भावलेली. काही वर्षांनंतर ऐकली की मनाला आणखीच जास्त भुरळ घालणारी. मला वाटत आपल्या प्रत्येकाची अशी एखादी 'खास' कविता असेलच. माझीही होती. शाळेत खूप खूप आवडलेली म्हणून माझ्या एका मैत्रिणीने तिच्या स्वतःच्या सुंदर हस्ताक्षरात मला लिहून दिलेली. पण नंतर नोकरी-संसार या सगळ्या पसाऱ्यात हरवून गेली. दोन-चार ओळी लक्षात होत्या पण पूर्ण नीट अशी आठवेच ना. शोधली म्हणा, गुगल करा काहीही सापडतं ... पण नेमकी हीच नाही मिळाली, का मलाच शोधता आली नाही काय माहित.

विव्हळून ..

लेखनविषय:
प्रेरणा: गविंना सलाम करुन (कारण विडंबन पाडणे हे नेहमीच सोपे असते) उघड्या कानांतून एक विव्हळणारा सूर घुसला कोणा नवगायकाचा हायब्रीड, आंग्लाळलेला नंबर असणार डोक्यात तीव्र झिणझिण्या, आन मनांत गांवरान शिव्या आल्या संस्कारांचे चाप काढून, त्या मनसोक्त खुल्या आवाजात दिल्या. पुन्हा पुन्हा कानात घुसणारे ते अभिजात संगीताचे विडंबन कोण सालं सुरेल केकाटताय बाप मेल्यावाणी भो .... नवीन पिढीची चव नासवून टाकतात भ्रष्ट नकलेच्या सडलेल्या मेंदूंचे ........ नांव विचारलं, तर तो आमचा आवडता 'शंकर' होता मग मी, गपगुमान कानांत बोळे घालून चालू लागलो!

प्रकाशाची सावली

लेखनविषय:
लेखनप्रकार
काही गाणी असतातच अशी एकदा ऐकली की कधी जिभेवर चढतात आणि ह्रदयात उतरतात कळतच नाही. एक सुंदर गाणं जमवून यायला जसे शब्द आणि संगीत मदत करतात तितकीच किंबहूना त्याहून जास्त मदत गाण्याचं चित्रिकरण आणि कलाकार ज्याच्यावर चित्रिकरण झालेलं आहे ते सुद्धा करतात. बर्‍याच चित्रपटात काही गाणी अतिशय सुमधूर असून देखील त्याच चित्रपटातील इतर काही अतिप्रसिद्ध झालेल्या गाण्यांच्या सावलीत झाकोळून जातात. आज काल युट्यूब आणि इतर संस्थळांमूळे ही सर्व परिचीत - अपरिचीत गाणी सहज उपलब्ध झाली आहेत. 'स्विकार किया मैने' या चित्रपटातील 'शबाना आझमीं'वर चित्रीत केलेलं हे गाणं असच एक अप्रतिम मास्टरपीस.

मारवा !

लेखनविषय:
लेखनप्रकार
त्या दिवशी संध्याकाळी अचानकच आभाळ दाटलं होतं. नेहमीपेक्षा लवकर, आणि जरा जास्त अंधारून आलं होतं. आणि अशात सीडीवर वसंतरावांचा 'मारवा' लागला होता. 'मदमाती चली चमकत दामनीसी.... ' असे काही तरी बोल असावेत विलंबित ख्यालाचे.वसंतराव मारव्याच एक एक पदर उलगडत होते, आणि इकडे मनःपटलावर वेगवेगळ्या प्रतिमा तयार होत होत्या आणि विरून जात होत्या. कुणी जुना मित्र भेटावा, आणि कुणालाही न सांगता येण्याजोगं काहीतरी गहिरं असं त्यानं आपल्यासमोर मोकळं करावं तसंच झालं होतं अगदी. मन हळवं झालं होतं.

काहीतरी नवीन..

लेखनविषय:
लेखनप्रकार
बॉम्बे टीव्ही वर काम करणारा एक कलाकार.. पानू रे! मदन मोहन आणि हेमंत मुखर्जी या दिग्गजांसोबत काम करण्याची संधी मिळालेले पानू रे... आणि त्यांचा सांगितीक वारसा मिळालेला त्यांचा मुलगा सुरोजीत रे...! या दोघा बाप-लेकांनी अनूप जलोटा यांच्यासोबत साई बाबांच्या भजनांचा एक अल्बम केला आणि बंगालीतूनही १-२ अल्बम केले होते . पण इतकी वर्ष मुंबईत राहिलेल्या या दोघांना मराठी संगितानेही तितकीच भुरळ घातली आणि मराठीतला पहिला वहिला अल्बम करण्याच्या दृष्टीने त्यांनी पाऊल उचलले. कोणत्यातरी एका क्षणी सुरोजीतची आणि माझी भेट झाली फेसबुकवर आणि त्यांच्या या अल्बम साठी गाणी लिहिण्याची संधी मला मिळाली.

लिलाव

लेखनविषय:
मिपाकरांना नमस्कार, संगीतकार श्रीधर फडके हे मराठी भावसंगीतातलं एक दिग्गज व्यक्तिमत्व! ऋतु हिरवा, तेजोमय नादब्रम्ह, संगीत मनमोही रे अशा अनेक अल्बम्सनी मराठी मनाला गेली अनेक वर्षे घातलेली मोहीनी अजूनही तशीच आहे. यात भर म्हणून श्रीधरजींनी संगीतबद्ध केलेल्या मराठी गीतांचा "लिलाव"साठी काम करण्याचा मला योग आला.

वाह उस्ताद!

लेखनविषय:
लेखनप्रकार
नुकतेच गेल्या महिन्यात उस्ताद झाकिर हुसेन यांच्या एका कर्यक्रमात मॅनेजमेंट टीम मध्ये काम करण्याची (सुवर्ण)संधी प्राप्त झाली. त्यांच्या सहवासात आमची पूर्ण टीम तब्बल दोन दिवस होती. त्यांच्या स्वभावाबद्दल सांगायचं झालं तर प्रवासापासूनच हळूहळू त्यांचं व्यक्तिमत्व उलगडत गेलं. आम्ही कार्यक्रमाच्या शहरात पोचत असतानाच गाडीच्या ड्रायवरला चहा विचारण्यापासूनच ते नंतर त्याच्यासोबत चहा एंजॉय करेपर्यंत आम्हाला समजून चुकलं, की आपले पुढचे दोन दिवस एका उमद्या आणि नम्र कलाकरासोबत जाणार.

एकदाच यावे सखया...

लेखनविषय:
लेखनप्रकार
एकदाच यावे सखया.. (येथे ऐका)
अशोकजी परांजपेंचे सुंदर शब्द असलेलं अशोक पत्की, सुमनताईंचं एक सुरेख गाणं. साधीच परंतु अत्यंत सात्त्विक अन् गोड चाल आणि सुमनताईंचा तितकाच गोड आणि हळवा गळा.
Subscribe to संगीत