एक सुखद फ्युजन
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about एक सुखद फ्युजन
- 11 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
काही गोष्टी अपघाताने घडतात. अशा अपघाताचा परिणाम बघता, ते वेळोवेळी का होत नाहीत याबद्दल खट्टू व्हायला होतं. अर्थात असे अपघात पैशापासरी न घडणं यातच त्यांचं महत्त्व अधोरेखित होत असतं, नाही का?
असे हे उपरोल्लेखित अपघात आपल्या संगीत सृष्टीत ठराविक काळाने पुन्हा पुन्हा घडत असतात आणि त्यातून ते आपलं जीवन आणखी सुसह्य करून सोडतात असं आपलं मला वाटतं. असाच एक अपघात १९९२ मध्ये कधीतरी घडला आणि आपलं सांगीतिक विश्व समृद्ध करता झाला.
जाहिरातींच्या जिंगल्सना संगीत देणारा संगीत दिग्दर्शक त्या वेळेला रेकॉर्डिंग रूममध्ये जिंगलचे शब्द अर्थात जिंगलचा फायनल ड्राफ्ट येण्याची वाट बघत होता.