II मोगरा फुलला मोगरा फुलला II
माझे शालेय शिक्षण ज्या शाळेत झाले, तिथे माझावर उत्तम संस्कार झाले. शाळेची इमारत चारी बाजुनी व मधे मोकळी जागा, या मोकळ्या जागेच्या बाजुनी उंचावर लाऊड स्पीकर लावले होते. प्रार्थना, सूचना देण्यासाठी याचा उपयोग होत असे, मात्र दुपारच्या सुट्टी मधे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम रचित गीतांचे प्रसारण केले जाई. ओम नमोजी आद्या, अवचित परिमळू, आजी सोनियाचा दिनु, पैल तो गे काऊ कोकताहे, धनु वाजे घुणघुणा, अरे अरे ज्ञाना, अशा सुंदर गीतांनी माझ्या मनात घर केले ते बालपणी, पण मनावरती कोरले गेले ते मोगरा फुलला.