एनिग्मा
Good Evening!
This... is the voice of Enigma
In the next hour
we will take you with us
into another world,
into the world of music,
spirit and meditation
Turn off the light,
take a deep breath
and relax
start to move slowly,
very slowly
Let the rhythm be your
guiding light
हे शब्द ऐकले... तेंव्हाच्या भाबडेपणामुळे असेल कदाचित, पण मी खरंच डोळे मिटले, आणि लगेच पुढच्या 'सॅडनेस' या गाण्याचा तो युनीक ठेका सुरू झाला. मागे सिन्थेसायझरच्या कॉर्ड्स वाजत होत्या. सर सर सर हातावरचे केस उभे राहिले आणि तत्क्षणापासून 'एनिग्मा' चा मी वेडा झालो. 'ही कॅसेट ऐकून बघ, वेडा होशील' या रोहन च्या वाक्याला शब्दशः खरं करत.
तोपर्यंत गाणी म्हणजे बॉलिवूड, आणि तेंव्हा चलती असलेले प्रायव्हेट अल्बम्स. म्हणजे बाबा सेहगल, दलेर मेहेंदी इत्यादी. एवढाच व्यासंग होता. इंग्रजी संगीत चाखलं होतं, ते बार्बी गर्ल, व अॅक्वा पुरतं. पण एनिग्मा मुळे माझी गाण्यांची 'टेस्ट'च बदलली. पुढे एनिग्मा च्या सगळ्या कॅसेट (डेक घरी येईपर्यंत) / सिडी फर्स्ट डे फर्स्ट शो सारख्या घेण्यात आल्या. व्हिडियोज बघण्यात आले. मायकल क्रीटू ला पत्रही पाठवलं. चक्क त्याचं उत्तर आलं. जाम खूश झालो. आजही ते पोस्टकार्ड जपून ठेवलेलं आहे.
मग मायकल क्रीटू चे इतरही सगळे अल्बम जमा केले. अगदी शोधून शोधून. जे भारतात मिळाले नाहीत ते अमेरिकेहून मागवले. सीडी घेतली की आधी त्यातलं इनलेट मन लावून वाचलं जायचं. मग नव्या को-या सीडी ला अलगद प्लेयर मधे टाकून जवळपास फुल्ल व्हॉल्यूम मधे दारं बंद करून गाणी लक्षपूर्वक ऐकण्यात यायची. लीजनेअर, मूनलाईट फ्लॉवर, द इन्व्हिजिबल मॅन, मेटामॉर्फोसिस, कोलॅबोरेशन मधले अल्बम म्हणजे मिथ, ट्रान्स अॅटलॅन्टिक एअर वेव्हज... हे सगळे सगळे ऐकत गेलो.
एनिग्मा वरून पुढे मग वर्ल्ड म्युजिकची ओळख झाली. चटक लागली. ढिकच्चॅक ढिक्चॅक पासून वेगळी, मोजकेच; काहीसे गूढ, तरीही अर्थपूर्ण, विचार करायला लावणारे लिरिक्स असलेली गाणी आवडायला लागली. डीप फॉरेस्ट, एनया, ग्रेगोरियन, असे आर्टिस्ट ऐकत गेलो. नेहमीच असं नाही; पण आजही जेंव्हा गाण्यातून शांतता अपेक्षित असते, तेंव्हा वर्ल्ड म्युझिकचाच फोल्डर उघडला जातो. बाय डिफॉल्ट.
आणि एनिग्मा चं 'सॅडनेस' आजही अंगावर काटा आणतं. का कुणास ठाऊक, पण जादू करतं हे गाण. शब्द नाहीत यात तरीही बरंच काही सुचवून जातं. जळमटं साचलेल्या मनाच्या खोलीची खिडकी कर्रर्रर्र करत उघडावी तसं. जळमटं आपली आपणच काढायची असतात पण प्रकाशाच्या त्या तिरिपीचं काम खूप मोठं असतं. ते हे गाणं आजही माझ्यासाठी करतं.
परवा अशीच ती खिडकी उघडली गेली, म्हटलं थोडा प्रकाश 'वाटावा'! म्हणून हा धागाप्रपंच.
वाचने
5325
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
जळमटं आपली आपणच काढायची असतात पण प्रकाशाच्या त्या तिरिपीचं काम खूप मोठं असतं. ते हे गाणं आजही माझ्यासाठी करतं.
मी हि तुमच्या वरोबर त्या प्रकाशाच्या तिरीपीत उभा आहे
अप्रतिम सुंदर धन्यवाद बंद्यु !In reply to सुंदर सुंदर वेल्लाभट माझ्या अतीव आनंदा चा विषय ! by मारवा
एक तरी फैन मिळतो का शंका होती मला खरं सांगू तर. तुम्ही भेटलात. छान वाटलंय.
तुम्हाला आवडतील कदाचित !
http://ultimateclassicrock.com/woodstock-performances/
In reply to वेल्लाभट तुम्ही वुडस्टॉक फेस्टीव्ल ची गाणी ऐकली आहेत का ? by मारवा
उद्द्द्द्याच चेक करतो
भारी भारी. इंजिनिअरिंगला आसताना खूप क्रेझ होती. सायलेन्स मस्ट बी हर्ड वैगैरे सुधा आयकायचो. गाण्याचे व्हिडिऑ भारी असायचे. ह्याची बालीवूडवाल्यानी उचलाउचली भर्प्पूर केली. क्रिमीनल मधले तुम मिले दिल खिले आयकले की एनिग्मा आठवते.
In reply to भारी भारी. इंजिनिअरिंगला by वैभव जाधव
एनिग्मा आणि डीप फॉरेस्ट वरून.
भरो मांग मेरी भरो... हे गाणं... जसंच्या तसं 'द रिव्हर्स ऑप्फ बिलीफ' आहे.
क्या फर्क पडता है ?
एज ऑफ लोनलीनेस म्हणा
की Carly's Song" म्हणा
यु कॉल रोज बाय एनी नेम क्या फर्क पडता है
बाकी मनीषा च्या गालांचा गुलाबी रंग एकदम ओरीजनल आहे. पहाडी गुलाब हि असतो का एखादा ?
मजा आली आठवुन आठवुन हे घ्या गाण
https://www.youtube.com/watch?v=arfkJsIk3Us
In reply to वैभव सुंदर आठवणी शेरॉन स्टोन च्या असोत कि मनीषा कोईराला च्या by मारवा
हेहे!
"प्रास" पण तुम्हाला ह्या बाबतीत मदत करतील...
"आबा" आणि "बॉनी-एम" पाशी आमची इंग्रजी गाणी संपतात...
In reply to कॉलिंग प्रास... by मुक्त विहारि
अगदी अगदी आणि गावस्कर पाशी क्रिकेट
उत्तम परिचय..
..एनिग्माप्रेमी असाल तर डीप फॉरेस्टप्रेमी असालच..
In reply to उत्तम परिचय.. by गवि
एनिग्मा डीप फोरेस्ट एरा ग्रेगोरियन इत्यादी....
रिटर्न टू इनोसन्स... ऐकायला जेव्हढं भारी ,तेव्हढाच त्याचा व्हिडिओ पण भारी होता.. सगळं रिवाइंड मोड मधे...
In reply to रिटर्न टू इनोसन्स... ऐकायला by अत्रुप्त आत्मा
एक नं. बोललात.
आज ऐकली ही गाणी...माझ्या आवडत्या "गल्लीतल्या बैला"पेक्षा ही जास्त आवडली नाहीत...बहुतेक "गल्लीतला बैल" आवडणारा मी एकटाच असेन इथे :(
In reply to आज ऐकली ही गाणी...माझ्या by टवाळ कार्टा
ट का.. रिटर्न टू इनोसन्स .. हेडफ़ोन लाउन डोळे मिटुन ऐक.. तूझे मत बदलेल . :)
In reply to ट का.. रिटर्न टू इनोसन्स .. by अत्रुप्त आत्मा
ऐकलं आत्ताच...नाय बा...माझ्या टाईपचे नाहीये :(...हा घ्य घेतला मग दिल खूश ;)
In reply to ऐकलं आत्ताच...नाय बा...माझ्या by टवाळ कार्टा
ऐकलं आत्ताच...नाय बा...माझ्या टाईपचे नाहीये :(...हा घ्य घेतला मग दिल खूशहे ऐकलं आत्ताच...नाय बा...माझ्या टाईपचे नाहीये :(... haa उतारा घेतला मग दिल खूश ;) असे वाचावे :)
In reply to ऐकलं आत्ताच...नाय बा...माझ्या by टवाळ कार्टा
:) गल्लीतला बैलही भारीच
Give me everything tonight हे माझं आवडतं गाणं.
In reply to हरकत नाही by वेल्लाभट
आपण पंखा आहोत....फुल्ल गरगर फिरणारा... \m/
पण हे खासच :)
ह्म्म... मला बॉ शॅगीची भारी आठवण आली बॉ...
विशेष सुचना :- खालील गाणी आपल्या आपल्या इच्छेनेच उघडावीत ! बाल मनावर विपरीत परिणाम होउ शकतो. ;)
SHAGGY - IT WASNT ME
Shaggy - Hey Sexy Lady ft. Brian & Tony Gold
Shaggy - Boombastic
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आज स्वाक्षरीचा संप आहे. ;)ड्रीम ऑफ डॉल्फिनदेखील उत्तम आहे एनिग्माचे..
In reply to ड्रीम ऑफ डॉल्फिनदेखील उत्तम by गवि
अत्त्तिशय आवडतं....
वेग्गळेच गूढ गहन शब्द आहेत एनिग्मा च्या सगळ्याच गाण्यांचे... तीच गोष्ट पहिले स्ट्राईक होते...
सुंदर सुंदर वेल्लाभट माझ्या अतीव आनंदा चा विषय !