किशोरी - २०१४
खरे तर जेमतेम १ वर्षांपूर्वी झालेली भेट त्या स्वरांची ...मी लिहून गेलो कि पुढची भेट कधी ठाऊक नाही ...पण आज पुन्हा भेटले ते स्वर ..
आज पार्ले टिळकच्या पटांगणावर सकाळच्या सुखद थंडीत तानपुरे सुरु झाले ... स्टेजवरचे दिवे मालवायला लावले आणि कसलीही नोमतोम वगैरे नं करता माफक आलापीनंतर तोडी सुरु ... मुळातच कारुण्यरसप्रधान राग आणि हळूहळू मूडमध्ये येऊ लागलेल्या ताई ....पण सुरुवातीच्या माईकच्या काही त्रासांनी जराश्या वैतागलेल्या ...पण सुदैवाने ते सगळे वेळीच ठीकठाक झाले आणि मग आम्ही सगळे त्या तोडीच्या गाभ्यात डोळे मिटून गेलो ... जे कृष्णमुर्ती म्हणतात ती 'शून्यावस्था' कदाचित हीच असावी ..स्वर निरखून बघायची गरज नाही ... तालाची आवर्तने मोजायची गरज नाही ...कसल्याही प्रमेयाचा दावा नाही ...म्हणून मग काही सोडवून दाखवायचे नाही आणि म्हणून मग काहीही गाठायचे नाही ...कसलाही अभिनिवेश म्हणून नाहीच... फक्त स्वरांच्या दुलईत कोणीतरी हळू हळू थोपटत आहे हि नं कळणारी जाणीव आणि कसले माहित नाही पण स्वरांच्या निखळ आर्ततेतून येणारे ... आतून ...खोल तळातून येणारे गहिवर ... डोळ्यातून तरळणारे पाणी ... समेच्या जेमतेम १ मात्रा आधी उठून सम साधून (गाठून नव्हे) पुढे चालू...
....नाही म्हणायला तानपुर्यावर नात आणि सौ नंदिनीताई बेडेकर ह्यांची अतिशय समंजस साथ...तबल्यावर भरत कामत ..संवादिनीवर सुयोग कुंडलकर ...आणि मिलिंद रायकर ह्यांचे व्हायोलीन स्वरश: गात होते...
पण त्या तोडीतला पंचम जणू फुरंगटून बसलेल्या लहान मुलासारखा ...होता म्हणावा तर एकही ठेहेराव नाही ..आणि नाही म्हणावा तर सावली सतत दिसत होती जाणवत होती ..आणि मुख्य म्हणजे तार सप्तकातील मध्यमापर्यंत सरसर जाऊन येऊन एकदाही तारषड्ज 'दाखवला' नाही ...हि मांडणी कसली HAUNTINGहोती ...असो द्रुत चीजेतील तानांमध्ये आमची किशोरी पुन्हा दिसली ...८३व्या वर्षी ...पुन्हा एकदा ..
"थोडी विश्रांती घेऊयात का ...पण तुम्ही जाऊ नका हं " असे खट्याळपणे विनवून ...म्हणून मध्यंतर ...
नंतर मग ललत सुरु झाला ..पण उत्तरांगात भटियार दिसला पण ललतभटियार म्हणावे असेही नाही आणि नाही असेही नाही .. पुन्हा मधेच कुणीतरी वेगळेच भेटून जात होते ...काय कि ...मध्यलय झपताल ...पण त्यावर लिहिण्याआधी कुणाला तरी विचारले पाहिजे ...थोडे रेकोर्डिंग केलेय ...इथे कुणी सांगेल का ?
किशोरीचे नाव त्यांच्या आईने अतिशय समर्पक ठेवले आहे ....
'किशोरी'
आता पुनरागमनायच असं म्हणायचंच
वाचने
5956
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
थोडक्यात, पण सुरेख विवेचन
कुणी सांगेल का
In reply to थोडक्यात, पण सुरेख विवेचन by बहुगुणी
तो 'स्वरशः' शब्द फारच आवडला!
In reply to थोडक्यात, पण सुरेख विवेचन by बहुगुणी
आवडलं
शब्दातीत
हो ...अपलोड करतो
In reply to शब्दातीत by तिमा
वा वा!
वाट पहात आहे
लेख कसा वाटला सांगू? म्हणजे
पंचम नसेल तर भटियाराचा काही
ललत पन्चम राग होता तो
ओके
In reply to ललत पन्चम राग होता तो by सदस्य११
अविस्मरणीय
तू नळी वर् मिळालेली लिन्क
सुंदर रसग्रहण !
छान लिहिलंय!
अवश्य
In reply to छान लिहिलंय! by पैसा
आज आठवले हे
किशोरीताईंना भावपूर्ण श्रद्धांजली
श्रद्धांजली
अतिशय उत्कट लेखन..
माझी मर्यादा....