मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संगीत

हाँटींग : मी रात टाकली....

विशाल कुलकर्णी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
काही महिन्यांपूर्वीची गोष्ट.... नेहमीप्रमाणे हातातल्या रिमोटशी खेळत असताना झी मराठी चॅनेलवर क्षणभर थबकलो. प्रत्येक ब्रेकच्या आधी कार्य्क्रमाच्या ब्रेकनंतर येणार्‍या भागाची थोडीशी झलक दाखवायचे आजकाल फॅड आहे. तर मी झी मराठीपाशी थबकलो कारण सारेगमच्या सेलिब्रिटी पर्वाचे जुने भाग दाखवत होते. आणि गुप्त्यांच्या 'वंदनाताई' अमृता सुभाषला सांगत होत्या.... "तू गाणं छानच गायलंस. मुळातच हे गाणं अतिशय गोड आहे. खरेतर 'हाँटींग' आहे, त्यांनी अजुन एक दोन उदाहरणे दिली त्यात 'या डोळ्याची दोन पाखरे..." ही होतं.

शांत गाणी....

मुक्त विहारि ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
शीर्षकात बरेच काही असल्याने, मुळ लेखालाच सुरुवात करतो.तरी पण दोन वाक्यातले मनोगत.ही गाणी मी शक्यतो एकटाच ऐकतो.असे वाटते की, ते गायक, त्यांच्या भावना फक्त माझ्याकडेच व्यक्त करत आहेत. मराठी.... १. मालवून टाक दीप. (https://www.youtube.com/watch?v=9rhPyDAuaGE) २. येशील, येशील, येशील राणी पहाटे पहाटे येशील (https://www.youtube.com/watch?v=RYcuTXiQkDw) ३. झाल्या तिन्ही सांजा (https://www.youtube.com/watch?v=B-I3VMOA6gg) ४. शुक्र तारा मंद वारा (https://www.youtube.com/watch?v=bu10VgPSK-w) ५. जेथे सागरा धरणी मिळते (https://www.youtube.com/watch?v=w3-vtWptq4Y) ६.

जा री जा री ओ कारी बदरीया.......

विशाल कुलकर्णी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
कधी कधी कसं होतं ना? एखादा संगीतकार , एखाद्या चित्रपटात एका वर चढ एक सुंदर गीते देवून जातो. मग प्रेक्षकाची - श्रोत्याची अवस्था "देता किती घेशील दोन कराने" (इथे "ऐकता किती ऐकशील दोन कानाने" असे वाचायलाही हरकत नाही ;) ) अशी होवून जाते. पण या सगळ्या आनंदात बरेच वेळा असेही होते की अत्युत्तम असे काही ऐकताना त्याच चित्रपटातील एखादे साधेच पण नितांत सुंदर असलेले गाणेही नकळत दुर्लक्षीत होऊन जाते. आता हेच बघा ना. श्री. एस.एम.श्रीरामलु नायडू या यंडु गुंडू वाटणार्‍या नावाच्या माणसाने १९५५ साली युसुफसाब उर्फ दिलीप कुमार आणि मीनाकुमारी यांना घेवून 'आझाद' नावाचा एक तद्दन मसालापट काढला.

मेरा सुंदर सपना बीत गया.....

विशाल कुलकर्णी ·
लेखनविषय:
पूर्वप्रकाशित ... ती एक न उलगडलेलं कोडं होती. एक अधुरी राहून गेलेली कविता होती. तीन दशक..., जवळजवळ तीन दशके तीने आपल्या नजाकतभर्‍या , मादक स्वरांच्या जोरावर रसिकांच्या मनावर अनभिषीक्त साम्राज्य गाजवलं. तिच्यावर हिंदी सिनेसृष्टीबरोबरच तिच्या नशिबाने, तसेच जवळच्यांनीही खुप अन्याय केलेला आहे. 'सुजाता' मध्ये एक गाणं आहे.

तुमच्या घराण्यातील अथवा परिचयातील कतृत्ववान अथवा दखल घेण्याजोग्या व्यक्तींची माहिती द्या

माहितगार ·
लेखनप्रकार
नमस्कार, आपल्या (तुमच्या) चालू अथवा मागच्या पिढीमध्ये अथवा परिचयात कतृत्ववान अथवा दखल घेण्या जोग्या व्यक्ती असू शकतात पण काही ना काही कारणाने त्यांच्या बद्दल लिहावयाचे, दखल घ्यावयाचे राहून जाऊ शकते. तर दुसर्‍या बाजूस अगदी प्रसिद्ध व्यक्तीबद्दलसुद्धा प्रत्यक्षात पुरेशा माहितीचा अभाव आढळून येतो अथवा माहितीत गॅप्स राहून जातात. या धाग्याच्या निमीत्ताने अशा आपल्या परिचयातील व्यक्तींबद्दल लिहिते करण्याचा हा छोटासा प्रयत्न. लगेच वेळ नसेल तर भविष्यात तरी लेखन करू इच्छित असाल अशी आपल्या परिचयातील नावे किमान नोंदवून ठेवावीत.

किशोरी - २०१५

अत्रन्गि पाउस ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
किशोरी - २०१४ खरे तर जेमतेम १ वर्षांपूर्वी झालेली भेट त्या स्वरांची ...मी लिहून गेलो कि पुढची भेट कधी ठाऊक नाही ...पण आज पुन्हा भेटले ते स्वर .. आज पार्ले टिळकच्या पटांगणावर सकाळच्या सुखद थंडीत तानपुरे सुरु झाले ... स्टेजवरचे दिवे मालवायला लावले आणि कसलीही नोमतोम वगैरे नं करता माफक आलापीनंतर तोडी सुरु ...

मोगरा फुलला

दिलिप भोसले ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
II मोगरा फुलला मोगरा फुलला II माझे शालेय शिक्षण ज्या शाळेत झाले, तिथे माझावर उत्तम संस्कार झाले. शाळेची इमारत चारी बाजुनी व मधे मोकळी जागा, या मोकळ्या जागेच्या बाजुनी उंचावर लाऊड स्पीकर लावले होते. प्रार्थना, सूचना देण्यासाठी याचा उपयोग होत असे, मात्र दुपारच्या सुट्टी मधे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम रचित गीतांचे प्रसारण केले जाई. ओम नमोजी आद्या, अवचित परिमळू, आजी सोनियाचा दिनु, पैल तो गे काऊ कोकताहे, धनु वाजे घुणघुणा, अरे अरे ज्ञाना, अशा सुंदर गीतांनी माझ्या मनात घर केले ते बालपणी, पण मनावरती कोरले गेले ते मोगरा फुलला.

‘घन तमी शुक्र बघ राज्य करी’ ….

विशाल कुलकर्णी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पूर्वप्रकाशित कविवर्य भा.रा. तांबे यांच्या अनेक सुश्राव्य कविता-गाण्यांपैकी 'घन तमी शुक्र बघ राज्य करी' हे स्वरांचे प्रचंड चढउतार असलेलं गाणं लतादीदींचं फार प्रिय आहे. हे गाणे लतादीदींचे प्रिय असण्यामागे अजून एक महत्वाचे कारण आहे. दीदी पं. दीनानाथांबरोबरच आणखी दोन व्यक्तींना गुरू मानतात. एक भालजी पेंढारकर आणि दुसरे मास्टर विनायक.

एनिग्मा

वेल्लाभट ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
Good Evening! This... is the voice of Enigma In the next hour we will take you with us into another world, into the world of music, spirit and meditation Turn off the light, take a deep breath and relax start to move slowly, very slowly Let the rhythm be your guiding light हे शब्द ऐकले... तेंव्हाच्या भाबडेपणामुळे असेल कदाचित, पण मी खरंच डोळे मिटले, आणि लगेच पुढच्या 'सॅडनेस' या गाण्याचा तो युनीक ठेका सुरू झाला. मागे सिन्थेसायझरच्या कॉर्ड्स वाजत होत्या. सर सर सर हातावरचे केस उभे राहिले आणि तत्क्षणापासून 'एनिग्मा' चा मी वेडा झालो.

मला भावलेलं गाणं

समीरसूर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
घरी येता येता ती तिच्या घराच्या दारात उभी दिसली. मन प्रसन्न झाले. खांदा दरवाज्याच्या चौकटीला टेकवून उभं राहण्याची तिची ती तर्‍हा मोहक होती. ती तशी उभी राहिली की तिच्या कंबरेची उजव्या बाजूला नाजूक कमान तयार होत असे. तिचा उजवा हात कमरेवर आणि डावा हात वेणीशी चाळा करत असे. घरी आलो. चैन पडेना. पुन्हा एकदा तिच्या घरावरून चक्कर मारण्यासाठी म्हणून बाहेर पडलो. ती अजून तशीच उभी होती. मला पुन्हा पाहताच सुरेख हसली आणि आत पळून गेली. मनाला इतकी खुशी इतर कुठल्याच गोष्टीने होत नसे. परत घरी जायला निघालो. आभाळ भरून आलं होतं; पावसाचे थेंब पडू लागले होते. तिच्या त्या हसण्याचा गारवा मनाला गुदगुल्या करतच होता.