Skip to main content

समाज

नेमका प्रॉब्लेम काय असतो काही लोकांचा

लेखक आशु जोग यांनी शुक्रवार, 01/12/2017 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळीवर अनेकदा उत्तम चर्चा सुरु असतात. त्यातून खूप चांगली माहिती मिळते. कमेंटमधूनही विषयाचे नवे नवे पैलू उलगडले जातात. म्हणूनच हे संस्थळ मराठी इंटरनेट विश्वात आपले वेगळेपण टिकवून आहे. पण ते हे बलस्थान राखलेही पाहीजे. नवीन धागा आला की धाग्याच्या अगदी अंगणात काही जण घाण करून ठेवतात. "मी धाग्याच्या दारात पहिली जागा पटकावली आणि घाण केली" असे वर अभिमानाने सांगतात. काही जण तर चर्चा विषय कोणताही असूद्या, " मी पॉपकॉर्न घेऊन बसलो आहे" असे लिहीतात. मी ग्यारंटीड सांगतो. पुन्हा पुन्हा पॉपकॉर्न घेऊन बसल्याने आरोग्य(मानसिक) बिघडणारच आणि पुन्हा ते धाग्याच्या अंगणात घाण करणारच.

न्याय झाला, पण...!

लेखक अँड. हरिदास उंबरकर यांनी बुधवार, 29/11/2017 16:39 या दिवशी प्रकाशित केले.
न्याय झाला, पण..! मानवी क्रौर्याची परिसमा ओलांडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणातील तिन्ही दोषींना आज न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. कोपर्डी घटनेतील घृणास्पद विकृती आणि विक्षिप्तपणा बघितला तर या प्रकरणात फाशीशिवाय दुसरी शिक्षा योग्य नव्हती. अत्यंत निर्घृणपणे पीडित तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. कोपर्डी अत्याचार प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला. कोपर्डीतील पिढीतला न्याय मिळावा यासाठी लाखो करोडो जनसंख्येचे महामोर्चे निघाले. दोषींना फासावर लटकविण्याची मागणी सर्व स्तरातून करण्यात आली.

एक कागद

लेखक गबाळ्या यांनी सोमवार, 27/11/2017 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
एक कागद कस्पटासम, रद्दीमध्ये फरपटला जसा जीव हा आप्तांमधुनी, गर्दीमध्ये भरकटला एक कागद कस्पटासम ||धृ ।। 
 एक बालक हाती घेई, मायेने मग आकार देई, बनता त्याचे जहाज हवाई, उंच तया उडविला ।। १ ।। 
 उंच विहरता मन स्वच्छंदी, हीन भासली भुतल रद्दी, वाटे मनासी खाशी शक्ती, दैवचि अर्पि मजला ।। २ ।। 
 वाटे त्यासी उंच उडावे वादळ वारे यांसी भिडावे कांबीटाचा कणा देउनी, पतंग सुंदर केला ।। ३ ।। 
 इतकी उंची तये गाठली साद मनीची नभी आटली ढील देण्या जाता बालक, मांजा संपून गेला ।। ४ ।। 
 गगन ठेंगणे खुणवी तारे मांजा परी तो रोखुनी धरे दृढनिश्चय तो मनी करुनी, तोडी त्या नाळेला ।। ५ ।। 
 उंच उंच तो जातच राही स्वानंदी मग

उठ मावळ्या ...

लेखक गबाळ्या यांनी बुधवार, 22/11/2017 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याबरोबर नेहमी पार्टी करणाऱ्या आपल्या साथीदाराने आता फक्त घास फुस अशी प्रतिज्ञा केल्यावर त्याच्या साथीदारांना धक्का बसला. त्याला परत आपल्या गोटात सामील करून घेण्यासाठी ते म्हणतात. उठ मावळ्या फोडू चल नळ्या कुकुटाची सर ना कधी पाचोळ्या चल मदिरालयी तु घुस ये सोडूनि घास फूस कोंबड्यासम केस रंगविसी कोंबडीस मग का तू वर्जिशी ६५, lolly-pop वर लिंबू टाकुनी चुस ये सोडूनि घास फूस वय का आपुले असे मोजिले चार पेग जर रिते तू केले यौवन भासेल तूस ये सोडूनि घास फूस

आर्य की याम्नाया-पशुपालक ?

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 21/11/2017 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
धागा लेखास कारण sciencenews.org या वेबसाईटवर, 'भटक्या आशियायी पशुपालकांचा ताम्रयुगीन (ब्राँझ एज) सांस्कृतीक घडणीवर प्रभाव कसा पडला असावा ?' अशा अर्थाचा एक लेख आला आहे. लेखास त्यांनी जनुकीय, पुरातत्वीय अनुवंशशास्त्र असा टॅग लावल्याचे दिसते.

आरक्षण

लेखक गबाळ्या यांनी सोमवार, 20/11/2017 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
"आरक्षण - योग्य कि अयोग्य" या विषयावर चर्चेसाठी मला TV वर बोलावण्यात आलं होतं. चर्चेत प्रत्येक जण आपापल्या भूमिकेतून आरक्षणाविषयी मत मांडत होता. कोणी तात्विक आणि तर्कशुद्ध मत मांडून आरक्षण हे कसे वरवरचे मलम आहे आणि याने प्रश्न सुटण्याऐवजी वाढतच कसे जाणार आहेत असे पटवून देऊ पाहत होता तर कोणी ऐतिहासिक दाखले देऊन आरक्षण हि कशी सामाजिक गरज आहे हे दाखवू पाहत होता. काही चाणाक्ष लोक आरक्षणाचा मुद्दा बरोबर आहे पण त्याची अंमलबजावणी चुकीची आहे असा दोन्ही पक्षांना नाराज न करणारा सावध पवित्रा घेत होते. चर्चेला उधाण आले होते पण निष्पन्न काहीच होत नव्हते. तेवढ्यात एकजण म्हणाला "लै तर्क लावू नका.

पसायदानातील समतोलाचे एक आगळेपण

लेखक माहितगार यांनी शनिवार, 18/11/2017 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
नियमीतपणे छानशा बोलीभाषेतून बाल कविता करणार्‍या एका (#) कवि महोदयांच्या सहज म्हणून लिहिलेल्या एका कवितेकडे माझ्या छिद्रन्वेषी स्वभावाने लक्ष वेधले. कवितेतील वेगवेगळ्या पशुपक्षांना आपल्या स्वभाव वैशिष्ट्याचाच कंटाळा आलेला असतो. जसे की मांजर म्हणते की मी म्याऊ म्याऊच कधी पर्यंत म्हणू? कोंबडी म्हणते कुकूचकू करून कंटाळ्चा आलाय, तर कावळा म्हणतो मी काळाच रहाणार का ? मी कविंना विचारले की न्यूनगंड असू नये असा काही बोध अभिप्रेत आहे का ? संवादातून लक्षात आले की कविच्या बाल कवितेचा उद्देश बोध नव्हे केवळ रंजन होता.

ग्राम"पंचायत" लागली..!! -7

लेखक विशुमित यांनी गुरुवार, 16/11/2017 18:00 या दिवशी प्रकाशित केले.

गाज

लेखक अबोली२१५ यांनी सोमवार, 13/11/2017 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीवर्धन तालुक्याच्या कुशीत रममाण छोटे खाणी दिवेआगर.दिवेआगर म्हणजे सृष्टीला पडलेलं स्वप्न... नारळ पोफळीच्या बागांनी नटलेल निसर्गान पुष्कळ दान केलं. जसे श्रीवर्धनला अतिप्राचीन आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेलं आहे त्याचप्रमाणे दिवेआगर हि अतिप्राचीन गावांपैकी एक ठरत असून देवविद्या पारंगत घैसास, देवल, मावलभट आदी ब्राम्हणाची वस्ती होती. समुद्रमार्गानी येणाऱ्या अरब चाच्यांनी या गावाला वेळोवेळी लुटलं. पण, भट आणि बापट या दोघा भावंडानी सिद्धीच्या परवानगीने याचा कायापालट केला.

आस्तिक-नास्तिक, श्रद्धा-अंधश्रद्धा, इ इ इ मानवी संकल्पनांवर होणारे वादविवाद

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी मंगळवार, 07/11/2017 23:47 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : अठ्ठावीस लक्ष रुपये, त्यात उद्धृत केलेले एका नियतकालिकात प्रसिद्ध झालेले एक वाचकाचे पत्र, तत्सम विषयांवरचे इतर लेख व त्यांच्यावरची चर्चा. वर लिहिलेल्या लेखातला सगळा प्रकार, धार्मिक अंधश्रद्धा नसून... (अ) एका लोभी माणसाच्या लालचीचा (कमी वेळात पैसे अनेक पटींनी वाढवणे) फायदा घेऊन दुसर्‍या बेरकी माणसाने त्याला फसवले किंवा (आ) एका भ्रष्ट माणसाच्या मानसिक असुरक्षिततेचा फायदा घेऊन, भ्रष्ट मार्गाने कमावलेली संपत्ती (हवाला मार्गे) कायदेशीर बनवून देतो, असे सांगून दुसर्‍या बेरकी माणसाने त्याला फसवले असाच जास्त दिसतो.