संस्कार आणि संस्कृती
पर्वती पुण्यातील ऐतिहासिक वारसा असलेलं मध्यवर्ती ठिकाण. मी बऱ्याचदा सकाळी तिथे फिरायला जातो. त्यावेळी योगा करणारी, फिरणारी बरीचशी लोकं तिथं असतात. पण त्यादिवशी मी जरा उशिरा म्हणजे ९-१० च्या वेळेस गेलो. तर तिथे शाळकरी गणवेशातली काही मुलं मुली अगदी प्रेमीयुगलांसारखी बिनधास्त बसली होती. त्यांच्याकडं बघून प्रश्न पडला ह्या वयातल्या मुलांना प्रेम खरच कळतं ? ते समाजातील वास्तव अंतर्मुख करायला लावणार होत. पण आजकालच जर एकंदरीत वातावरण बघितलं तर मोबाईल आणि इंटरनेट चा वाढता वापर आणि ज्या थाटणीचे चित्रपट येतायत हे सगळं प्रामुख्याने जबाबदार आहे.
मिसळपाव