Skip to main content

समाज

कर्करोगाचा विळखा

लेखक हेमंतकुमार यांनी गुरुवार, 21/09/2017 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
कर्करोगाचे प्रमाण जगभर झपाट्याने वाढत आहे. यासंबंधी ‘यु.के.’ मधील एक मजेदार अहवाल वाचनात आला. २०१५ मध्ये त्या देशात ७०,०००हून अधिक नवीन निदान झालेले कर्करोगी आढळले होते. हा आकडा नक्कीच धक्कादायक आहे.

उरले जगणे, मरणासाठी !

लेखक दिनेश५७ यांनी बुधवार, 20/09/2017 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
परवा एसटीच्या मुंबई सेंट्रल ऑफिसात एका मित्राला भेटायला गेलो होतो. खूप गप्पा मारल्या, आणि निघालो. बाहेर पॅसेजमध्ये लवाटे भेटले. तोच उत्साह, तीच घाई, तोच, काहीतरी शोधणारा चेहरा आणि तीच भिरभिरती नजर... मला समोर पाहून दिलखुलास हसले. आणि पिशवीत हात घातला. एक कागदाचं भेंडोळं समोर धरलं. हा नवा पत्रव्यवहार... ते उत्साहानं म्हणाले, आणि मला, दोन वर्षांपूर्वी भेटलेले लवाटे आठवले. तेव्हा माझ्या ऑफिसात त्यांच्याशी गप्पा मारल्यानंतर खूप अस्वस्थता आली होती. मग एक लेखच तयार झाला, आणि त्यावर अक्षरशः प्रतिक्रियांचा पाऊस पडला. परवाच्या भेटीमुळे तो लेख पुन्हा आठवला उरले जगणे, मरणासाठी... ‘‘नमस्कार. मी लवाटे.

कंपास पेटी

लेखक OBAMA80 यांनी बुधवार, 20/09/2017 12:18 या दिवशी प्रकाशित केले.

कंपास पेटी

********************** आपल्या सगळ्यांच बालपण अनेक लहानसहान गोष्टींनी व्यापलेले असते, मधल्या काळात त्या गोष्टींच आपल्याला अप्रूप वाटेनास होत आणि आयुष्याच्या माध्यान्ही अचानक त्या सापडल्यानंतर मन लहान मुलासारख बागडायला लागत. त्या सर्वांमधली “कंपास पेटी” ही ह्रदयाच्या सर्वात जवळची. आपल्या बालपणातील अनेक गमतीजमती, गुपीत, भांडण या पेटीशी जोडलेली असतात. त्या रम्य दिवसातील लाखों आठवणी हळुवारपणे अलगद जपून ठेवणार्‍या या छोट्या गोष्टीला “पेटी”शिवाय दुसरा योग्य शब्द नाही. ही आपल्या शालेय जीवनातील एक अविभाज्य घटक!!

कुलुप

लेखक RDK यांनी मंगळवार, 19/09/2017 23:59 या दिवशी प्रकाशित केले.
लोणावळयाला उन्हाळयाचे भय कसले?? डोंगराच्या मध्यभागी वसलेल्या या शहराचे सौभाग्य की ग्रीष्माच्या तापत्या उन्हाचा कोप याला कमीच सहन करावा लागत होता. तरीही नाजुक प्रवृत्तिची लोक डोक्यावर छत्र्या धरून निसर्गाने दाखविलेल्या औदार्याप्रती कृतघ्नपना दाखवित होती. स्टेशन गेट जवळ उसाच्या रसाचे दूकान लोकांचा गळा थंड करत होते. शाळेतुन येणारी काही मुले बंगल्यांच्या बाहेर, झाडावरुन पडलेले बादाम दगड़ाने फोडुन खात होती. तेवढ्यात एक गाडी गेटजवळ येऊन थांबली. मालगाड़ी जात होती. स्टेशन गेट लावलेले होते.

प्रिय घरास

लेखक शिव कन्या यांनी सोमवार, 18/09/2017 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय घरास, नाही, तुझी आठवण येत नाही. बाई आहे मी. जाईन तिथे चूल मांडीन. रांधेन. खाऊ घालीन. चार फुले लावीन. शेज सजवीन. संग करीन. पोरं जन्माला घालीन. संसार थाटीन. वाढवीन. इथेही नवे घर करीनच की. नव्हे नव्हे केलेच आहे. नाही, तुझी आठवण येत नाही. इथे मी पायी कुठे जात नाही. गाडीत जाते. पायी चालले असते तर थबकले असते. वळून पाहिले असते. मग एखादे घर तुझ्यासारखे दिसले असते. मग खिडकीतून आत शिरले असते. पडद्यामागे लपून बसले असते. नाही नाही ते आठवले असते. उगीच तो दिवस रडून घालवला असता. म्हणून मी इथे गाडीतून गालिच्यावर, गालिच्यावरून गाडीत एवढेच पाय खाली ठेवते.

लव यू ज़िन्दगी: अदूचा तिसरा वाढदिवस!!!!

लेखक मार्गी यांनी सोमवार, 18/09/2017 00:32 या दिवशी प्रकाशित केले.
आज तू चक्क तीन वर्षांची झालीस! वाढदिवशी तू घातलेल्या पंखाप्रमाणे तुला आता खरोखर पंख फुटले आहेत! तुझा वाढदिवस तू खूप खूप एंजॉय केलास! दिवसभर 'हॅपी बर्थडे टू यू' म्हणत होतीस! गेल्या एका वर्षामध्ये तुझी झेप थक्क करणारी आहे! अलीकडे तर तू मोठ्या माणसांप्रमाणे बोलतेस! जवळ जवळ ऐकलेला प्रत्येक शब्द तुला लक्षात राहतो आणि नंतर तू अचानक तो शब्द असलेलं वाक्य बोलतेस! तुला इतके बारीक सारीक संदर्भ लक्षात राहतात! माणसं चांगले लक्षात राहतात! गेल्या वर्षभरातल्या अनेक आठवणी आहेत! अजूनही तू आरशासारखी नितळ आहेस. अजूनही तू आमचे तसेच लाड करतेस! समोर येणा-या सर्व गोष्टी तू आनंदाने स्वीकारतेस.

सामाजिक कार्य करायचे आहे,सामाजिक संस्था/NGO सूचवा!!

लेखक सिंथेटिक जिनियस यांनी रविवार, 17/09/2017 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
मी याआधीच्या अनेक लेखात माझी पार्श्वभुमी लिहीली आहे.नविन लोकांसाठी परत लिहीतो.मी शेतकरी आहे .सातार्यात राहतो.मी अल्पभूधारक शेतकरी आहे.माझ्यापुरतं मी कमावतो.आठवड्यातील पाच दिवस मी रिकामा असतो.एखादी नोकरी व कामधंदा केल्यास वेळ जाईल असे वाटल्याने एक धागा काढला होता.त्यात मी लीहील्याप्रमाणे मला सोशल फोबिया आहे.त्यामुळे सोशली इंटेंन्सीव्ह काम मला जमेल असे वाटत नाही.त्यामुळे रिकामा वेळ जावा व सत्कारणी लागावा यासाठी मी सध्या एखाद्या सामाजिक संस्थेत काम करावे असा विचार करत आहे.जेणेकरुन माझा वेळही जाईल आणि समाजाला काहीतरी मदत होईल.आणि माझा सोशल फोबिया कमी होईल हा आणिक फायदा. तर मला अश्या NGO मध्ये काम

सामान्य माणसानी नाकासमोर चालायचं

लेखक कल्पक यांनी शनिवार, 16/09/2017 00:14 या दिवशी प्रकाशित केले.
सामान्य माणसानी नाकासमोर चालायचं फार विचार न करता गपचूप राहायचं! आधाशी आणि नालायक लोकांची होर्डिंग्स शहराला विद्रुप करतात सणांच्या नावाखाली थिल्लर गाणी वाजतात स्पीकरच्या भिंती कानाचे पडदे फाडतात पण सामान्य माणसानी नाकासमोर चालायचं फार विचार न करता गपचूप राहायचं! बेकायदेशीर बांधकामं आणि अतिक्रमणं शहराला विळखा घालतात कचऱ्याचे ढीग ठिकठिकाणी ओसंडून वाहतात खड्ड्यांमध्ये अधूनमधून दिसणारे रस्ते दुर्मिळ होतात पण सामान्य माणसानी नाकासमोर चालायचं फार विचार न करता गपचूप राहायचं! अस्मितांची भांडणं लावली की राजकीय मार्ग सुकर होतात रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य हे मुद्दे मग बाजूला पडतात दर पाच वर्ष

ग्राम"पंचायत" लागली..!! -1

लेखक विशुमित यांनी शुक्रवार, 15/09/2017 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
गुरुवारी संध्याकाळी साडे सात वाजता घरी जायला हडपसरच्या बस स्टॉप वरून पंढरपूरला निघालेला लाल डब्बा पकडला. दार उघडून बघतोय तर गाडी खचाखच भरलेली. "आयला एकादशी वगैरे नसताना पण पंढरपूरला लोक रोज का जात असतील?." मनात पहिला विचार आला. सासवड- जेजुरी पर्यंत उभं राहून जावे लागणार हे पक्क होतं. खांद्यावरचं धोपटं काढून वरच्या जाळीत टाकणार तेवढ्यात 'सोन्या' ने हाक मारली. "पाव्हणे या मागे. तिघं बसू ". बाबू मांढरेला पलीकडे ढकलून सोनावणे म्हणाले. बाबू आणि सोन्या माझ्या शेजारच्या गावची, डेली अप डाऊन करणारे.! सोन्या अप डाउन मधला सगळ्यात सिनियर बडबड्या खेळाडू मेंबर म्हणा.

संघर्ष : सुरुवात.

लेखक दिपक लोखंडे यांनी मंगळवार, 12/09/2017 23:31 या दिवशी प्रकाशित केले.
०५ ऑगस्ट सकाळी : ७ वा. त्या दिवशी राधा खूप सुंदर दिसत होती तिचा तो निरागस चेहरा अबोला असूनही खूप काही बोलून जात होता. राधा अंघोळ करून केस झटकावत बाहेर आली पहाटेची तीव्र किरणे तिच्या चेऱ्यावर पडताच तिने डोळे बंद केले, तसा आनंद तिच्या समोर जाऊन थांबला. अचानक समोर आल्याने राधा थोडी दचकली (तशी राधा खूप धाडशी व जिद्दी होती प्रेमळ स्वभाव असल्याने तिने तिच्या ओवातिभोवती असणाऱ्या सर्व लोकांची मने जिंकली होती. आनंद ही त्यातलाच एक. इंजिनीयरिंग कॉलेज मधली ओळख..