Skip to main content

समाज

दवणीय अंडी - अंडे ३रे - शाळेची ऊब

लेखक आदिजोशी यांनी मंगळवार, 07/11/2017 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
आज कैक वर्षांनी शाळेच्या गॄपने त्यांच्या बॅचचे स्नेहसंमेलन करायचे ठरवले होते. तसा बाब्या इतक्या वर्षांनी सगळ्यांना परत भेटण्यास शष्पभरही उत्सुक नव्हता. प्रत्यक्ष शाळेत असतानाही बाब्याची शाळेत जायची अजिबात इच्छा होत नसे. एक तर ह्या शाळेच्या गॄपने त्याला वात आणला होता. रोज सकाळी गुरु = देव, शाळा = देवालय, विद्यार्थी = दगड, शिक्षक = मूर्तीकार असले मेसेज वाचून त्याचं डोकं उगाच सरकायचं. लोकांना शाळेच्या आठवणीने भरून वगैरे यायचं, आपण आज आहोत ते शाळे मुळे वगैरे जिलब्या तर नेहेमीच्याच होत्या. पण आपल्या आजच्या कारकुनी आयुष्यात शाळेचे योगदान नक्की काय हे बाब्याला न सुटलेले कोडे होते.

हे टाळता आले असते?- २ एअर कॅनडा फ्लाईट १४३

लेखक लाल टोपी यांनी सोमवार, 06/11/2017 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
वारिग फ्लाईट २५४ चा लेख आपण मिपाच्या दिवाळी अंकात वाचला असेलच. मुळात या विषयावर एक मालिका करण्याचा विचार होता मात्र तसा उल्लेख करणे राहून गेले होते. त्यानुसार या मालिकेतील दुसरा लेख प्रकाशित करीत आहे... दिनांक २३ जुलै, १९८३ एयर कॅनडा ची फ्लाईट १४३ विमान वाहतूक क्षेत्रातील एका असामान्य घटनेची साक्षीदार आहे. canada वैमानिक पियर्सन आणि सहवैमानिक क्विंटल त्या दिवशी सकाळी मॉंट्रेयलहुन एडमॉन्टन ला नियमित जाणारे विमान उड्डाणासाठी तयारी करीत होते.

ग्राम"पंचायत" लागली..!! -6

लेखक विशुमित यांनी शुक्रवार, 03/11/2017 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/40963 http://www.misalpav.com/node/41040 http://www.misalpav.com/node/41296 http://www.misalpav.com/node/41316 http://www.misalpav.com/node/41364 "आरं आपल्याला नको हे राजकारण. आपल्या गरिबाच काम नाही आहे हे. कुठे फेकून देतील आपल्याला कळनार पण नाही ".

दवणीय अंडी - अंडे २रे - नात्यांची श्रीमंती

लेखक आदिजोशी यांनी शुक्रवार, 03/11/2017 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
एसीने थंडगार झालेल्या आपल्या रूममधल्या गुबगुबीत गादीवर ब्लँकेट ओढून झोपलेल्या बंड्याने अजून एकदा कूस बदलली. त्याला काही तरी टोचल्याची भावना झाली. अर्धवट झोपेत असल्याने 'सुख टोचत असेल' असा विचार मनात येऊन त्याने ब्लँकेटखाली हात घातल्यावर टोचणारी वस्तू सुख नसून चार्जरची पीन आहे हे त्याच्या लक्षात आले. आजकाल बंड्या जरा अस्वस्थच असे. ह्याच्याशी त्याला पडलेल्या केट्यांचा काही संबंध नव्हता. इन जनरच आयुष्य वैराण आहे अशी भावना त्याच्या मनात दाटून येत असेल. सद्ध्या फेबु आणि वॉअॅ वर वाजवीपेक्षा जास्तच पडीक असल्याने ही भावना वरचेवर त्याला छळत असे.

दवणीय अंडी - अंडे १ले - एक कॉल स्वतःला

लेखक आदिजोशी यांनी बुधवार, 01/11/2017 17:52 या दिवशी प्रकाशित केले.
'दवणीय अंडे' हा वाक्प्रचार मराठी भाषेला अर्पण करणार्‍या समस्त गुरुजनांच्या उलट्या पायांना कोपरापासून नमस्कार करून ह्या लेखमालेतील पहिले अंडे आपल्यासमोर घालताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.

अंडे १ले - एक कॉल स्वतःला

फार दिवसांनी परवा कट्ट्यावर जायचा योग आला. सगळे उटाणटवळे भेटले. पण मध्यंतरीच्या काळात आम्ही कार्यमग्न असल्यामुळे आमच्यात आणि त्यांच्यात एक अदॄष्य अशी कम्युनिकेशन गॅप तयार झाली होती. नक्की काय बिनसलंय हे कळत नव्हतं. कालौघात काही गोष्टी बदलल्या होत्या...

...मी दोन काटं खाल्ल्यात कळकीच

लेखक हेमंत ववले यांनी बुधवार, 01/11/2017 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
“काही तरीच बरका ! तुमच वय ९० वर्षे असणे शक्यच नाही”, रामा धनगराला मध्येच थांबवत मी जरा मिश्किलपणे म्हंटले. त्यावर रामा धनगर थोडा थबकला. आता त्याच्या पुढे प्रश्न होता की कस काय पटवुन द्यायचे की त्याचे वय ९० ची आसपासच आहे असे. पश्चिमघाटाच्या घाटमाथ्यावर भोर्डी गावात आम्ही दोन वर्षापुर्वी बांबु(मेस जातीचा) ची लागवड केली. रविवारी पर्यटकांची पुण्यात रवानगी केल्यावर मी आणि सुनिल सिंगापुर रोड कडे फेरफटका मारुन, बांबुंची वाढ कशी आहे ते पाहण्यासाठी आमच्या जागेत गेलो. सगळ्या शिवारात फेरफटका मारुन झाला. वाटेने पुन्हा चढ चढुन सिंगापुर रोड ला येण्यासाठी थोडी चढण होती. त्यामुळे आमचा वेग कमी थोडा मंदावला.

ग्राम"पंचायत" लागली..!! -5

लेखक विशुमित यांनी शनिवार, 28/10/2017 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ "मंगेश कारभारी इकडे या", नानांनी त्यांच्या २ नंबरच्या भावाच्या नातूला हाक मारली. आजोबा वारल्या नंतर चुलत्याबरोबर समांतर कारभारपण त्याच्या वाट्याला आले होते. अर्थातच हा युतीचा कारभार कुरबुरीचा होता. उभ्या आयुष्यात पोपटमामा नानांशी बोललेला मी पाहिला नाही. कारण सिम्पल होते. त्याचे लग्न नानांनी त्याला पोरगी न दाखवताच परस्पर लावून दिले होते.

माणसातील तील निसर्ग जागा होईल का कधी?

लेखक हेमंत ववले यांनी सोमवार, 23/10/2017 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवार रविवार नेहमीप्रमाणे कॅम्पिंग ट्रिप च्या नियोजनासाठी वेल्ह्याला जाणे झाले. अगदी अचानक ठरल्यामुळे एकट्यावरच सगळी जबाबदारी आली. एकटाच असल्यामुळे दुचाकी वर जाणेच पसंत केले. पुणे बेंगलोर महामार्ग सोडुन वेल्ह्याकडे निघालो. तस पाहता चेलाडी-वेल्हे-केळद(-महाड) हा देखील राज्य महामार्गच आहे. रस्त्यावर गाड्यांची वर्दळ होतीच. दुचाकी असल्याने वेग मर्यादीत होता. त्यातच आपल्याकडे रात्रीच्या वेळी वाहने चालवताना समोरच्या गाडीच्या हेडलाईट चा झोत डोळ्यावर आल्याने डोळे दिपुन जात होते. त्यातच हेल्मेट घातले होते, त्यामुळे रस्त्यावर किंवा आजुबाजुला फारसे पाहता येत नव्हते किंवा दिसत ही नव्हते.

कागदाचे झाड

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 21/10/2017 08:59 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय जिब्रान खलील, माझ्या लाडक्या मुला, कसा आहेस? देवाने तुला आता भरपूर कागद दिले असतील. पण आता तुला लिहायची इच्छा नसेल, कि अजूनही आहे? माहित नाही. आज तुला पत्र लिहावेसे फार फार वाटत आहे. काल रात्रभर तुझी आठवण येत राहिली, येतच राहिली. तू छोटासा. अरेबिक शब्द, वाक्यं लिहायचा छंद तुला. आईला म्हणालास, ‘आई, मला कागद दे ना आणून! मला लिहायचेय!’ तिने आजूबाजूला पाहिले. घरावर जप्ती येऊन ते दुसऱ्याच्या ताब्यात गेलेले. नवरा तुरुंगात. पदरात छोटी मुले.धर्माची बंधने. बाहेर अंदाधुंदी. छोटीमोठी कामे करून कशीबशी हातातोंडाला गाठ घालीत असे. तिने एकवार तुझ्याकडे असे पाहिले....