समाज
ग्राम"पंचायत" लागली..!! -4
http://www.misalpav.com/node/40963
http://www.misalpav.com/node/41040
http://www.misalpav.com/node/41296
'शांती'मामा ने मला आवाज दिला, " भाच्याबा, चला मिटिंगला."
"कुठे आहे मिटिंग?", मला अचूक अंदाज आला होता.
"मारुतीच्या देवळासमोर".
माझा अंदाज खरा ठरला होता.
ग्राम"पंचायत" लागली..!! -3
http://www.misalpav.com/node/40963
http://www.misalpav.com/node/41040
नानांचे भाऊ कधीच त्यांच्या कारभारपणाच्या आड आले नाहीत.
नाना तीन नंबरचे, पण सगळे भाऊ त्यांच्याशी अदबीने वागत. धाकटा तात्या अजून पण त्यांच्या समोर थांबत नाही.
भावजयांची त्यांच्या समोर एक शब्द बोलायची टाप नव्हती.
मोठ्या दोन भावांनी मागच्या वर्षीच कचरेवाडीला कायमचा टाटा बाय बाय केला आहे.
पुतणे मात्र सगळे चमत्कारिक. नेहमी धोतराला पाण्यात पाहत.
बुलेट घेतल्यापासूनचे सुखद क्षण
रोज ऑफिसला बुलेटवरच जातो. मनमोकळ्या स्वभावाच्या माझ्या बॉसशी ऑफिसात गप्पा मारताना सहजच म्हणालो, हैद्राबादपासून तीन-चारशे किलोमिटरच्या परिघात मी सर्वत्र बुलेटवर फिरलोय. एक स्कोडा, एक व्हॉल्वो, दोन टोयोटा आणि इतर किरकोळ, ही कौटुंबिक वापराची वाहने असलेल्या बॉसच्या डोळ्यात मनोमन कौतुक आणि (मी प्रवासाला वेळ काढू शकतो म्हणून की काय,) किंचित हेवा तरळला. त्यानं माझ्या पाठीवर थाप मारली व म्हणाला, “तू साला बहोत ऐश करता है!”
***
ऑफिसला जाताना मालकिणीला शाळेत सोडतो.
बळी [शतशब्दकथा]
रणरणतं ऊन, तापलेला रस्ता. सामसूम सोसायटी. हा रस्त्याच्या कडेने चाललेला....उपाशीपोटी. काहीतरी खायला मिळेल या आशेवर.
समोर एक मुलगी त्याच्याकडेच पाहत राहिलेली. हा बावरला. भलतीकडे आल्यासारखे वाटले. जवळच्या झाडाच्या आडोशाला गेला. कानोसा घेऊ लागला. अजून माणसं जमली. सारे रोखून त्याच्याकडे पाहत होते. कुजबुजत होते. हा घाबरला, अंग चोरू लागला.
..................................
लोक जवळ आले. हा टकामका त्यांच्याकडे पाहत होता. त्याला समजायच्या आत दणादण् दणके त्याच्या अंगावर कोसळले. नजरेसमोर अंधारी आली. कळवळला. जमिनीवर गडाबडा लोळू लागला. दणके वाढले.
अविश्वसनीय सत्यकथा - डीएनए मिसमॅच
मुलांचे (मुलगा आणि मुलगी दोन्हीचा यात समावेश आहे) डीएनए त्यांच्या जैविक मातापित्यांशी जुळतात हे विज्ञानाने सिद्ध झालेले आहे. त्यातही एखाद्या वेळेस पिता कोण आहे हे सिद्ध करायला डीएनए टेस्ट लागेल पण जन्मदाती आई तर कोण आहे हे सिद्ध करायला डीएनए टेस्टची सुद्धा गरज भासू नये.
पण लिडिया फेअरचाईल्ड नावाच्या एका आईच्या बाबतीत एक अविश्वनीय घटना घडली. तिला २ मुले होती आणि तिसऱ्या वेळेला ती गर्भवती असताना तिने आणि तिच्या नवऱ्याने घटस्फोट घ्यायचे ठरवले. कोर्टाने मुलांच्या पालनपोषणाचा हक्क ठरवण्यासाठी आई वडील आणि मुलांची डीएनए टेस्ट करायचे आदेश दिले.
प्रिय नर्मदेस
( आज सरिता दिन. त्या निमित्त.....)
प्रिय नर्मदेस,
कारण काहीही असो, माणूस अनिकेत होतो तेव्हा पाण्यापाशी पोहचतो. मी तुझ्यापाशी पोहचले. अजून ती पहाट आठवते. मध्यरात्री कधीतरी मराठी मुलुख मागे पडला. दुसरा मुलुख लागला हे एसी गाडीतही कसं कळतं? पण कळतं. माणसं निराळी भासू लागली. हळूहळू अनोळखी भाषा कानावर पडू लागली. लक्ष देऊन ऐकलं कि कळतेय असं वाटायचं. पण थकून गेले. किती वेळ कान ताणणार? उन्हाळ्यातील पहाट म्हणजे तशी सकाळच. एकदम गाडीचा आवाज बदलला. कुणी म्हणालं, ‘नर्मदाजी’. मी फट्कन खिडकीवरचा जाड पडदा बाजूला सारला. बाहेर पाहिलं ....... गाडी तुझ्यावरच्या एका अजस्त्र पुलावर उभी होती. टोल भरायला.
बदलाच्या गतिचे नवे नियम मांडणारा: 'न्युटन'
भारत बदलतो आहे, सत्तर वर्षांच्या प्रवासात असंख्य खाचखळग्यांतून, काट्याकुट्यातून वाट काढताना, जुन्या समस्यांवर विजय मिळवत नव्या समस्यांना तोंड देताना सतत कात टाकून नविन रुपडे घेतोय. काही बदल इतके क्रांतीकारी की त्यांच्याशी जुळवून घ्यायलाच शक्तिचा अफाट व्यय होतो अन काही इतके धीमे की 'काही होतंच नाही' अशी निराशा व्हावी. कित्येक प्रामाणिक लोक व्यवस्थेला आव्हान देता देता थकून जाऊन परत व्यवस्थेचाच भाग होऊन राहतात अश्या वेळेला धीमी पण आश्वासक पावले टाकत काही शिलेदार मात्र आपल्या परीने लढत राहतात. न्युटन ही अश्याच एका शिलेदाराची कथा आहे.
स्पर्शाला पारखा... पुरुष
स्पर्श ही सुद्धा एक संवादाची भाषा आहे असं म्हंटलं जातं.
चित्रपट, मालिका यांतली पात्र अनेकदा एकमेकांना स्पर्श करताना दाखवतात, अनेकविध नात्यातले (मैत्री) स्त्रीपुरुष हातात हात घेतात , कधी आलिंगन देतात , कधी स्नेहाने, प्रेमाने, कधी सांत्वन करण्यासाठी , तर कधी धीर देण्यासाठी..काही वेळा तर रोज 'गुड मॉर्निंग/नाईट' म्हणत 'हग करणे' ही दाखवतात. आणि यात पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसी हे तर आलेच पण त्याशिवाय आई-वडील आणि मुलगा/गी, मैत्रमैत्रिणी, आजी आजोबा आणि नातवंड इतकेच काय तर कधी दीर-वहिनी वगैरे वगैरे असे अनेक नात्यात होणारा स्पर्श अगदी सहज दाखवतात. मला त्यावर अजिबात टीका करायची नाही.
ग्राम"पंचायत" लागली..!! -2
ग्राम"पंचायत" लागली..!! -1
यंदा बिनविरोध होणार नाही, हे माझ्या अगोदर नानांनी त्या होलपाटण्या मन्याला का सांगितले असावे?
घरातल्या माणसांना किंमतच नाही दिली कधी नानांनी. कधी कोणासमोर चांगल्या कामाचे कवतुक नाही केले. स्वतःला सांगलीच्या आबांचे पाईक समजत राहिले आयुष्यभर. वडाच्या झाडाखाली रोपटे येत नाही हे मान्य पण कोणालाच वर येऊन नाही द्याचे, असे एकंदरीत वडाचे लॉन्ग टर्म धोरण असावे बहुतेक.
कधीच कुठल्या मिटिंग मध्ये सहभागी होऊ नाही दिले.
मिसळपाव