नेमका प्रॉब्लेम काय असतो काही लोकांचा
मिसळीवर अनेकदा उत्तम चर्चा सुरु असतात. त्यातून खूप चांगली माहिती मिळते. कमेंटमधूनही विषयाचे नवे नवे पैलू उलगडले जातात. म्हणूनच हे संस्थळ मराठी इंटरनेट विश्वात आपले वेगळेपण टिकवून आहे. पण ते हे बलस्थान राखलेही पाहीजे.
नवीन धागा आला की धाग्याच्या अगदी अंगणात काही जण घाण करून ठेवतात. "मी धाग्याच्या दारात पहिली जागा पटकावली आणि घाण केली" असे वर अभिमानाने सांगतात. काही जण तर चर्चा विषय कोणताही असूद्या, " मी पॉपकॉर्न घेऊन बसलो आहे" असे लिहीतात.
मी ग्यारंटीड सांगतो. पुन्हा पुन्हा पॉपकॉर्न घेऊन बसल्याने आरोग्य(मानसिक) बिघडणारच आणि पुन्हा ते धाग्याच्या अंगणात घाण करणारच. त्यामुळे आपल्या आरोग्याची त्यानी स्वतःच काळजी घेतली पाहीजे. नेहमी डॉक्टर येणे शक्य नसते. अशा वेळी मागील अनुभवावरून हे शक्य होवू शकते.
विशेषतः काही सदस्यांच्या धाग्याच्या अंगणात तर ठरवून पॉपकॉर्न खावून घाण करुन ठेवण्याचे प्रकार झाले आहेत.
आपल्या अंगणात कुणी तरी पॉपकॉर्नची घाण करून ठेवतंय म्हणून काही जण दार लावून धागे टाकणे बंद करतात किंवा घर तरी बदलतात. नव्या जागी तिकडेही जावून पॉपकॉर्नवाले आपला गुण दाखवतात का ते मला माहीत नाही.
मिसळीच्या नियंत्रकांनी यासाठी पूर्वी बरेच प्रयत्न केल्याचे आठवते पण बहुधा हस्तक्षेपाच्या ऐवजी स्वयंनियंत्रणाची अपेक्षा इथे बाळगली जाते. ते योग्यही आहे. पण क्वचित फारच तब्येत बिघडलेल्याची मिपा नियंत्रकांनी काळजी घेण्याची गरज असते.
अशा लोकांमुळे सगळ्याच मिसळीची तब्येत नकोय बिघडायला. संस्थळाला शुभेच्छा !
याद्या
7662
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
...
कोणी नावे ठेवायला नकोत.....
डिपी छान आहे
In reply to कोणी नावे ठेवायला नकोत..... by कपिलमुनी
चाललांत काय?
...
In reply to चाललांत काय? by अभ्या..
. . .
In reply to चाललांत काय? by अभ्या..
यांच्या एका धाग्यावर पुर्वी
...
In reply to यांच्या एका धाग्यावर पुर्वी by उपेक्षित
...
In reply to यांच्या एका धाग्यावर पुर्वी by उपेक्षित
...
In reply to यांच्या एका धाग्यावर पुर्वी by उपेक्षित
वाघाचे पंजे.....
गुमान झोपा आता गोधडीत.
...
In reply to गुमान झोपा आता गोधडीत. by Ram ram