सोशल डिस्टन्सिंग

लेखनविषय:
लेखनप्रकार
सोशल डिस्टंन्सिंग एकदा टिळक स्मारकला वसंत व्याखानमालेला गेलो होतो. व्याखान आमच्या मित्राचच. सुरवातीला मी, व्याखाते व आमची एक मैत्रिण असे अनौपचारिक गप्पा संयोजकांशी झाल्या. ऑडिटोरियम मधे गर्दी भरपूर झाली होती. सुरवातीच्या रांगा राखीव होत्या. मैत्रिण तिथे पर्स शेजारच्या खुर्चीवर ठेवून बसली मी तिथे शेजारी बसावे अशा सहजप्रवृत्तीने गेलो. तिने नाईलाजाने पर्स मांडीवर घेतली असावी.( हा आपला अंदाज) काही काळा नंतर तिचे बहुतेक लक्ष लागेना. मग तिने माझ्या उजव्या बाजूला पर्स ठेवून पर्सच्या शेजारी बसली. मगच तिचे लक्ष व्याखानात लागले. मी मनातल्या मनात हसलो. कारण मला एक किस्सा आठवला होता.

रिक्षा आणि सरकार!

लेखनविषय:
लेखनप्रकार
सर्वत्र कोरोनाच्या चर्चा सुरू असतानाही काल एका वेगळ्याच, अनपेक्षित व त्यामुळे धक्कादायक असलेल्या एका बातमीने लोकांची झोप उडाली. खरे तर अशा घटना कुठेकुठे अधूनमधून होत असतात, पण या घटनेची मात्र जोरदार चर्चा सुरू झाली. अनेकांच्या भुवया उंचावल्या, संशयाचे वारेही वेग घेऊ लागले. नेमके याच काळात, जेव्हा सारे लक्ष एखाद्या संकटाचा सामना करण्यावर केंद्रित झालेले असतानाच असे कसे घडले असेही अनेकांना वाटून गेले. त्यावरही कडी म्हणजे, या घटनेत नेमके काय नष्ट झाले असा, जुन्या घटनेत अधोरेखित झालेलाच सवाल पुन्हा एकदा पुढे आला.

कर्फ्यू , कॉफी आणि बरंच काही......

लेखनविषय:
लेखनप्रकार
कर्फ्यू, कॉफी आणि बरंच काही...... २२ मार्चला मोदीजींनी एक दिवसाचा जनता कर्फ्यू जाहीर केला. फक्त एक दिवस देखील बाहेर न पडता घरीच राहायचे ही कल्पना अनेकांना अशक्य वाटू लागली. ह्या एका दिवसात घरी पासून काय करत येईल ह्याचे मेसेजेस यायला लागले. हा शिंचा कोरोना लवकर आटोक्यात येणार नाही असे दिसताच '"न भूतो न भविष्यती" असा चक्क २१ दिवसांचा लॉकडाऊन २५ मार्चपासून भारतभर जाहीर झाला. समर्थांच्या "जे जे आपणांसी ठावे, ते ते इतरांसी सांगावे । शहाणे करून सोडावे, सकळ जन" उक्तीनुसार लोकांनी व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड करण्याचा धडाका लावला.

वळण

गुलमोहरांच्या आपल्या त्या कावळ्या चिमण्यांच्या ओट्यावर. काल तु म्हणालीस 'वाट बघ' आता आपलं कसं म्हणून पुस्तकांची पानं उचकत आतल्या आत गोठून गेलो एका पानावर, मोगर्‍याच्या वेलीशी, फांदी सोडून घेतेय आपले हात. दारातून दिसतेय मला, आयुष्याचा हिशेब बोटांच्या कांड्यावर मोजणारी म्हातारी, आणि हळद लावून बसलेली भेदरलेली नवरी. शहरापासून मरणा अगोदर कोण पोहोचतो, म्हणुन. भूके कंगालांचे तांडे सरकताहेत हळू हळू गावांकडे. सगळीच तीर्थस्थाने, महापुरुष आठवून कोणीच येत नाही डोळ्यासमोर, हडबडून, गडबडून, घामाने चिंब होऊन. टीटवीचा आवाजही देह चिरुन जातो. आपलं ठरलंय, विना आणाभाकांचं.

मन्त्र,स्तोत्र आणि आपण..

श्रद्धा क्रमांक:-१)वेद/पुराण स्तोत्र आणि मंत्रामधून, मंत्रांना असलेल्या स्वरांमुळे येणाऱ्या लहरींचा भौतिक,जैविक स्वरूपाचा परिणाम आपल्या (शरीरावर) होतो श्रद्धा क्रमांक:-२)वेद/पुराण मन्त्र व स्तोत्र म्हटल्यामुळे त्या त्या स्तोत्रा/मंत्रात-असलेल्या देवता विशिष्ट शक्तीच्या स्वरूपात आपल्याजवळ येतात.

लॉक्ड इन : आयुष्यातली एक अपूर्व संधी !

लेखनविषय:
लेखनप्रकार
गेली ३० वर्ष मी घरुन काम करतोयं त्यामुळे जे लिहीलंय तो सगळा स्वानुभव आहे. लॉक्ड इन ही आयुष्यातली एक अपूर्व संधी आहे. कोणतीही घटना ही कायम वस्तुस्थिती असते, तिच्याकडे जो संधी म्हणून पाहातो त्याचं आयुष्य उजळतं, जो आपत्ती म्हणून बघतो त्याला फक्त वेळ कधी संपते याची वाट बघावी लागते. ' जीवन म्हणजे इतकी वर्ष ' अशी अत्यंत चुकीची धारणा आयुष्यात कोणताही बदल घडू देत नाही, कारण जीवन म्हणजे ' एक दिवस गुणीले काही हजार वेळा ' असा हिशेब आहे. थोडक्यात ज्याला आयुष्यात रंग भरायचेत त्याला आजच्या चोवीस तासांच काँपोझिशन बदलायला लागतं.

'जाण' आणि 'भान'!

लेखनविषय:
लेखनप्रकार
राजकीय नेत्यांनी कोणत्या प्रसंगी काय बोलावे, संभ्रमात भर पडेल असे बालणे टाळण्याचे भान ठेवावे, ही समज जागी करण्याची गरज आहे. अशा वेळी, वाजपेयी आठवतात! *** माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे वक्तृत्व म्हणजे सप्तरंगी इंद्रधनुष्य होते. त्याच्या भाषणात कधी काव्य दिसायचे, कधी राजकारण दिसायचे. कधी कनवाळू ममतेची झाक दिसायची तर कधी धारदार कठोरपणा दिसायचा. विद्वत्ता हा तर त्यांच्या वक्तृत्वाचा गाभाच होता. त्यांच्याही वक्तृत्वात शब्दांची सुंदर अनुप्रासयुक्त गुंफण असायची. ‘गंभीर’पणातही विश्वसनीय व आश्वस्त ‘खंबीर’पणा भरलेला असायचा.

चला माणसाप्रमाणे वागूया !

लेखनविषय:
लेखनप्रकार
माननीय आणि प्रिय रसिक वाचक , *सप्रे* म नमस्कार ! आपण सगळ्यांनी / काहींनी माझे लेख , कविता , स्केचेस , पेंटिंग्ज , अभिनयाच्या व गाण्याच्या clips , गझल्स , पुस्तक वाचलं असेल.पण आज मी एक वेगळ्याच विषयावर हा लेख लिहितो आहे. गेले काहि आठवडे जगभरामधे आणि आपला भारत पण जगाचाच एक भाग असलेल्या आपल्या देशात — कोरोना विषाणूमुळे भयंकर आरोग्य समस्या निर्माण झाली आहे.

हातावरील पोट

लेखनविषय:
लेखनप्रकार
तसं पाहिलं तर मिपावरून जवळपास मी रजाच घेतली आहे. माझ्या दोन लेखांवरील काही आक्रस्ताळ्या, मुजोर आणि हीनतेचा तळ गाठणारी एक प्रतिक्रिया यामुळे मी लिहिणं आणि प्रतिसाद देणं थांबविलं आहे. सहसा प्रवाहाविरुध्ध मतं मांडताना अवहेलना हि अपेक्षितच असते. परंतु कधी कधी आब राखणं आपल्या स्वतःच्या स्वास्थ्यासाठी आवश्यक असते. त्यामुळेच असा निर्णय मी घेतला आहे. आता या लेखाच्या निमित्ताने मी प्रकट होत आहे त्याचे कारणच तितके महत्वाचे आहे. कष्टकरी लोकांची आपल्याला आठवण सर्वसाधारण पावसाळ्यात होतेच होते.

कृतघ्न -5

याआधीचे भाग भाग 1 : https://www.misalpav.com/node/46154 भाग 2 : https://www.misalpav.com/node/46159 भाग 3: https://www.misalpav.com/node/46183 भाग 4: https://www.misalpav.com/node/46203 आता पुढे माऊली विचारात पडला कि या बाबतीत स्वतः हस्तक्षेप करावा कि नाही, रामदास ला तुकाराम च्या भरोश्यावर सोडून द्यावे कि आपण मदत करावी. मुलांच्या आणि बायकोच्या कानावर हि गोष्ट कळली तेव्हा त्यांनी या भानगडीत न पडण्याचा सल्ला दिला. त्यांचं तरी काय चुकीचं होत?? ज्यावेळी संधी होती तेव्हा रामदास ने सर्व विसरून चुकीच्या माणसांना निवडले आणि आता वाईट वेळेत आता आपण कश्याला मदत करावी?
Subscribe to समाज