सोशल डिस्टंन्सिंग
एकदा टिळक स्मारकला वसंत व्याखानमालेला गेलो होतो. व्याखान आमच्या मित्राचच. सुरवातीला मी, व्याखाते व आमची एक मैत्रिण असे अनौपचारिक गप्पा संयोजकांशी झाल्या. ऑडिटोरियम मधे गर्दी भरपूर झाली होती. सुरवातीच्या रांगा राखीव होत्या. मैत्रिण तिथे पर्स शेजारच्या खुर्चीवर ठेवून बसली मी तिथे शेजारी बसावे अशा सहजप्रवृत्तीने गेलो. तिने नाईलाजाने पर्स मांडीवर घेतली असावी.( हा आपला अंदाज) काही काळा नंतर तिचे बहुतेक लक्ष लागेना. मग तिने माझ्या उजव्या बाजूला पर्स ठेवून पर्सच्या शेजारी बसली. मगच तिचे लक्ष व्याखानात लागले. मी मनातल्या मनात हसलो. कारण मला एक किस्सा आठवला होता. मराठी विज्ञान परिषदेत एक व्याखान होते. त्याचा विषय होता शरीरातील जीवजंतू व आपण- डॊ. अपुर्वा बर्वे यांचे व्याखान होते. त्यांनी तो किस्सा सांगितला होता. त्या परदेशात गेल्या होत्या.एका एअर पोर्टवर त्या लाईनीत एका माणसाच्या मागे उभ्या होत्या. समोरचा मनुष्य फार अवस्थ वाटत होता. म्याडमला काही कारण कळेना. शेवटी त्या माणसाने नम्रपणे सांगितले madam you are consuming my space.मग त्यांच्या लक्षात आले कि त्या भारतीय सवयीनुसार कमीत कमी अंतर ठेवुन त्या माणसाच्या मागे उभ्या होत्या.सुरक्षित अंतर हे केवळ सुरक्षिततेसाठी नसत तर ते मानसिक स्वास्थ्यासाठीदेखील असत. करोना निमित्त असलेल्या सोशल डिस्टन्सिंग निमित्त आठवल एवढच. त्याला लगेच मी सामाजिक दुरावा असे म्हणणार नाही.
वाचने
3528
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहज आठवलं...
अर्थ लागत नाही
In reply to सहज आठवलं... by Nitin Palkar
अहो त्यांना रांग म्हणायचे आहे
In reply to अर्थ लागत नाही by प्रकाश घाटपांडे
आता सुधरलं! आदुगर वाटल यांचे
In reply to अहो त्यांना रांग म्हणायचे आहे by मोदक
ओ पी नय्यर यांची अशीच एक सवय
या बद्दल माहिती नाही, पण
In reply to ओ पी नय्यर यांची अशीच एक सवय by चित्रगुप्त
नख वाढवू फेम, गिनिज बुक
In reply to ओ पी नय्यर यांची अशीच एक सवय by चित्रगुप्त