पूर्व दिशेला अरूण पथावर..
लेखनविषय:
- Read more about पूर्व दिशेला अरूण पथावर..
- 23 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
आज अचानक धिंगाणा डॉट कॉम वर जाऊन आवाज चांदण्यांचे -२ या अल्बम मधली गाणी ऐकायचा मूड झाला. मनात आलं आणि मी चालू केली गाणी. ऐकता ऐकता, पूर्व दिशेला अरूण पथावर ध्वज सोन्याचा झळकत सुंदर .. पी. सावळाराम यांनी लिहिलेलं , हृदयनाथ मंगेशकरांचा संगित साज ल्यायलेलं , धर्मकन्या या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या आवाजातलं गाणं ऐकलं.. आणि मन जवळ जवळ २० वर्ष मागे गेलं. नक्की या गाण्यामुळे गेलं की, त्या गाण्याशी जोडलेल्या आठवणींमुळे हे सांगणं खरंच कठीण आहे. आठवणींच्या मळ्याचं एक बरं असतं, वेळी-अवेळी कधीही तिथे जा.. तिथे नेहमीच सुगी असते. दुष्काळ सहसा नसतोच.
काल पु.लंची जंयती आणि त्याच्या एक दिवस आधी सुनीताबाईंच्या जाण्याने अवघे साहित्यविश्व हळहळले. वरुन कडक शिस्तीच्या आणि करारी व्यक्तिमत्वाच्या पण आतुन मृदू स्वभावाच्या सुनीताबाई ‘आहे मनोहर तरी...’ नंतर केवळ पुलंच्या पत्नी म्हणून नव्हे तर एक उत्तम सिद्धहस्त लेखिका म्हणून साहित्यविश्वाला समजल्या. पु.लंच्या जडणघडणीतही त्यांचा वाटा मोठा आहे. आम्हा वाचकांना पु.ल. आणि सुनिताबाई त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातुन आणि थोरा मोठ्यांनी सांगितलेल्या आठवणीतून उमजले, भावले.