मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

साहित्यिक

परदु:ख शितल

डॉ. सुधीर राजाराम देवरे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
- डॉ. सुधीर रा. देवरे माझा एक तरूण अभ्यासू मित्र... दहशतवादी आणि नक्षलवाद्यांबद्दल तो सुप्त सहानुभूती बाळगून होता. (ही सहानुभूती त्याला तथाकथित अभ्यासांतीच आलेली.) ज्याच्यावर अन्याय होतो तो दहशतवादी होतो असे त्याचे तत्वज्ञान. (अन्याय तर संत ज्ञानेश्वरांवर झाला होता. संत तुकारामांवर झाला होता. महात्मा गांधींवर झाला होता. बाबासाहेब आंबेडकरांवरही झाला होता.) मुंबईतले बाँम्बस्फोट त्याला खूप मोठे वाटले नाहीत (मृतांची आणि जखमींची संख्या सर्वश्रुत.). मुंबई दहशतवादी हल्ला त्याला खूप मोठा वाटला नाही. (मृतांची आणि जखमींची संख्या सर्वश्रुत.). अमेरिकेतला हल्ला त्याला मोठा वाटला नाही.

स्मरणदिवा

रायबा तानाजी मालुसरे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आता शाळा सोडून कितीतरी वर्ष उलटली, पण अजूनही रंगपंचमीच्या आसपास हवा अशी काही बदलते की मला वार्षिक परिक्षेचे वेध लागतात. 'आभ्यास कर आभ्यास कर' म्हणून आईचं मागे लागणं, बाबांचं रोज संध्याकाळी घरी आल्यावर 'आज किती झाला आभ्यास?' म्हणून विचारणं असं सगळं सगळं आठवतं. परिक्षा काय, जाते तशीच जायची पण परिक्षा संपल्याच्या दुसर्‍या दिवशी माझं आजोळी जाणं मात्र ठरलेलं असायचं. आजोळचा जुना वाडा. या अशा भल्यामोठ्या खोल्या! पलीकडे स्वयंपाकघर. स्वयंपाकघरातच एका कोपर्‍यात मोरी. कोणी मोरीत गेलेलं असलं म्हंजे स्वयंपाकघराचं दार बंद. अशाच वेळी भावंडांपैकी कुणाला तरी काहीतरी खायला हवं असायचं. मग आजीला हाका.

दांडी मारणे - एक विलक्षण कला

किसन शिंदे ·
खासगी किंवा सरकारी कार्यालयात काम करताना इतर चांगल्या-वाईट अनुभवांसोबत एका वेगळ्या गोष्टीचा अनुभव सगळ्यांनाच असतो, तो म्हणजे दांडी मारण्याचा आणि त्यासाठी अफलातून अशी कारणे देण्याचा वा शोधण्याचा. दोन्ही ठिकाणी वरिष्ठ पदावर काम करत असलेल्या व्यक्तीला त्याच्या हाताखाली असलेल्या कर्मचार्‍याकडून अचानकपणे दांडी मारण्याची अनेक कारणे दिली जातात. काही वेळेला ती खरी असतातही, तर काही वेळेला ती निव्वळ खोटी आणि मजेशीरही असतात.

गोविंदराव तळवळकर

विकास ·
आत्ताच कळले आणि नंतर वाचले की महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार-विचारवंत गोविंदराव तळवळकर यांचे ह्युस्टन येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ज्या एका व्यक्तीमुळे आजही जालावर मराठी वृत्तपत्र पहायला गेलो की आपोआप महाराष्ट्र टाईम्सचे पान उघडले जाते अशी एक विचारवंत व्यक्ती आज काळाच्या पडद्याआड गेली. महाराष्ट्राच्या आणि त्यातही खासकरून मुंबई-पुण्याच्या वृत्तपत्रीय जगताची स्वातंत्र्यपूर्व काळात टिळक-आगरकर, काळकर्ते परांजपे, न.चिं केळकर आदी अनेक दिग्गजांनी एक जडणघडण घातली. त्याच काळात आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळातही सुरवातीस आचार्य अत्रे, ह.रा. महाजनी आदींनी वैचारीक जडणघडण चालूच ठेवली.

नवे नवे शोध

डॉ. सुधीर राजाराम देवरे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
- डॉ. सुधीर रा. देवरे मी आठवी नववीत असेल तेव्हा. एका लहानश्या विरगाव नावाच्या खेड्यातल्या मराठी माध्यमाच्या शाळेत ‍शिकत होतो. शाळेत आम्ही काही मित्र त्यावेळी स्वत:ला हुशार समजत होतो. पहिला नंबर मिळवण्यासाठी आमच्यात स्पर्धाही असे. विज्ञानाच्या रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र या तिन्ही शाखा तसेच भूगोल, खगोल, गणित अभ्यासताना आतापर्यंत लागलेल्या विविध शोधांवर आमचं एकमेकांमध्ये बोलणं व्हायचं. अशा प्रकारची एकदा शोधांची चर्चा सुरू असताना एक मित्र सहज बोलून गेला, ‘आपल्या जन्माआधीच शास्त्रज्ञांनी सर्व शोध लावून ठेवलेत.

मराठी भाषा दिन २०१७: अनुक्रमणिका

संपादक मंडळ ·
1

अनुक्रमणिका

१) भाषा आणि बोली

लेखक: अमोल४५७२ (भाषा व बोली परस्पर संबंध याबद्दल लेख)
पूर्वी आदिमानव अप्रगत होता, त्या काळात हातवारे, खुणा करून त्याचं मनोगत व्यक्त करत असे. नंतरच्या काळात तो जसजसा प्रगत होत गेला, शेती करू लागला, गटागटाने राहू लागला, तसतसा हातवारे व खाणाखुणा यापेक्षाही जास्त तोंडाने विविध आवाज काढून व्यक्त होऊ लागला.

जनार्दन केशव म्हात्रे -व्यक्ति परिचय

माहितगार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
विकिपीडियाचे माध्यम गवसल्याच्या उत्साहात अनवधानाने काही विकिपीडियन्सकडून स्वतः बद्दल लेखन होत असते. ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेची निश्चिती असेल तर ते ठेवले जाते. मराठी भाषेत विवीध क्षेत्रातील व्यक्तींची दखल घेण्या जोग्या पुरेशा नोंदींच्या अभावी ज्ञानकोशीय उल्लेखनीयता निश्चित करणे अवघड होते. किंवा सर्व व्यक्ति / विषय मराठी विकिपीडियनना परिचीत असतातच असे नाही. असाच एक लेख नवे मराठी विकिपीडियन जनार्दन केशव म्हात्रे यांच्या बद्दल लिहिला गेला आहे. ज्ञानकोशीय उल्लेखनीय पुरेसा मजकुर स्वतंत्र स्रोतातून दुजोरा मिळे पर्यंत ती माहिती दुजोरा मिळवण्यासाठी मिसळपाव डॉट कॉमवर स्थानांतरीत करीत आहे.

मराठी दिन २०१७ (बोलीभाषा सप्ताह) आवाहन

विशेषांक ·
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी! दर वर्षी कुसुमाग्रजांच्या जन्मदिवशी, म्हणजे २७ फेब्रुवारीला जागतिक मराठी दिन साजरा होतो. मिपावरही कमी-अधिक प्रमाणात दर वर्षी काही उपक्रम केले जातात. गेल्या वर्षी आपण मराठी भाषा दिनानिमित्त बोलीभाषा सप्ताह साजरा केला होता आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळाला होता. काही काही अगदी अपरिचित बोलींमधील लिखाणही प्रकाशित झाले होते. तसेच आंतरजालावर हा अभिनव उपक्रम असल्याने वृत्तपत्रातही त्याची दखल घेतली गेली होती. प्रमाणभाषेबरोबरच बोलीभाषा जगल्या पाहिजेत, फुलल्या पाहिजेत. त्यासाठी पुढच्या पिढ्यांना बोलीभाषेची ओळख असली पाहिजे.

ब्रम्मा

पराग देशमुख ·
लेखनप्रकार
निराकार, निर्विकार, अनासक्त आणि एकूणच सांगायचं झाल तर अनामिक असा मी एक नदीपात्रातील गोटा. तसा मुळात मी घाटी पण सह्याद्री, मंद्राद्री, निलगिरी नि सातपुडा वगैरे कौतुक आमच्या नशिबात अपवादानेच सापडतील. महाराष्ट्राच्या हृदयस्थानी असणाऱ्या मराठवाड्याच्या मध्यबिंदूशी माझी मुळ अजून घट्ट रुजलेली आहेत.