मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राजकारण

नकटीच्या लग्नाला...

आपला अभिजित ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
बरेच दिवस झाले तरी नकटीचं लग्न ठरत नव्हतं. वधूपित्यानं संभाव्य वर शोधून ठेवले होते. आपणच मुलीचा सांभाळ केलाय, असं म्हणविणारे काके-मामेही प्रयत्न करून थकले होते. पण "कुलस्वामिनी' कौल देत नव्हती. काही ना काही अडचण सतत येत होती. नकटीच्या लग्नापायी बऱ्याच जणांचं घोडं अडलं होतं. त्यांच्या सामाजिक कार्याच्या लालसेत अडथळा येत होता. समाजाच्या सेवेसाठी आयुष्य वाहून घेणाऱ्या त्या बिचाऱ्या प्रामाणिक गांधीवाद्यांचं, राष्ट्रवाद्यांचं सगळं अवसानच गळाल्यासारखं झालं होतं. इच्छा असूनही संधी न मिळाल्यानं समाजासाठी काही करता येत नव्हतं.

राष्ट्राय स्वाहा: इदं न मम!!!!

सौरभ वैशंपायन ·
लेखनप्रकार
भारतात अनेक अश्या व्यक्ती झाल्या कि ज्यांचे कर्तृत्व असामान्य आहे. त्या ज्या क्षेत्रात काम केले ते मैलाचा दगड ठरले. आजही त्या हजारो व्यक्तींना १०० करोड व्यक्ती आदर्श मानत आहेत आणि राहतील. थोडक्यात भारतभूचे सुपूत्र या सदरात ते येतात. मात्र भारतभूचे सुपूत्र होणे इतके सोपे आहे का? प्रचंड उलथापालथी नंतर भारताच्या सुपूत्रांपैकी ४ जण माझ्या डोळ्यांसमोर रात्रं-दिवस येत आहेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या आधी आणि त्यांच्या नंतर भारतात किंवा भारता बाहेर हजारो आदरणीय व्यक्ती झाल्या वा होतील पण या चौघांचे स्थान एकमेवाद्वितीय आहे. या चौघांचाहि कालखंड भिन्न आहे.

रशिया-जॉर्जिया युध्दातील विरोधाभास

चिन्या१९८५ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
रशिया आणि जॉर्जियातील युध्द आज थांबले आहे.पण जसे हे युध्द सुरु झाले तसेच या युध्दातील विरोधाभास स्पष्टपणे दिसुन येउ लागला.मुळात रशियातील जे परदेशी नागरीक व इंग्रजी भाषा समजारे व आंतरराष्ट्र्यि मिडियाचे दर्शक असणारे रशियन नागरीक यांना तर या युध्दाने एकदमच confuse करुन टाकले.त्यामुळे युध्द सुरु करण्यात हात नक्की कुणाचा होता हे अजुनही येथे स्पष्ट झालेले नाही.

'कम्युनल' विरोधाच्या नावाखाली चालणारा संधिसाधुपणा

चिन्या१९८५ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
भारत देशात जरी हिंदु बहुसंख्य असले तरी त्यांच्यासाठी बोलणारा 'कम्युनल' म्हणजे सांप्रदायिक ठरतो.आणि हे ठरवणारे म्हणजे भारतातील बहुतांश धर्मनिरपेक्ष पक्ष आणि धर्मनिरपेक्ष पत्रकारीता.पण जर का याचा नीट अभ्यास केला तर अस दिसुन येत की सांप्रदायिक शक्तींना विरोधाचे कारण पुढे करुन प्सुडोसेक्युलर पक्ष संधिसाधुपणा करतात्.यामधे अनेक उदाहरणे देता येतील्.सध्याचच सगळ्यात गाजणार उदाहरण म्हणजे समाजवादी पक्ष्. समाजवादी हा मुळात मुस्लिम लोकांमधे प्रसिध्द असलेला पक्ष्.या पक्षातील नेत्यांनी हिंदुंवर कारसेवा करायला गेले म्हणुन गोळ्याही झाडल्या होत्या.मागच्या लोकसभेच्या निवडणुकांपुर्वी 'आम्ही ज्यांना पाठींबा देउ त

मोरारजी आणि जेठमलानी

अजय ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
राजकारण म्हणजे विरोधाभासाचं आगार.... त्यातही दिल्लीतलं राजकारण म्हणजे महाभयंकर... ही राजकारणीमंडळी एकमेकांवर सदैव कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असतात. या नादात तत्वांना कधी तिलांजली दिली जाते, द्यावी लागते हे त्यांनाही कळत नाही. अर्थात, हे आपल्यालाही जाणवते. पण कधीतरी या तत्वच्युतीला आदर्शवादाचं समर्थन घेण्याचा प्रयत्न केला जातो. या साऱ्या प्रकारांना वेगळ्या चष्म्यातून पाहिलं कधी कधी विनोदी चित्र पाहावयास मिळतं. त्यामुळे बाबूंच्या सरकारीपणाचे किस्से आपल्याला प्रत्यक्ष दिसतात. पण राजकारणीमंडळींचे किस्से कळायला चांगलं माध्यम लागतं. त्याशिवाय ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही.

सैतानाची बाळे

हेरंब ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
स्थळ : - सैतानाची कंट्रोलरुम. एका भव्य ,गोलाकार ,सुसज्ज ,बंदिस्त जागेमधे सैतानाची बाळे गोलाकार बसली आहेत. प्रत्येकाच्या समोर एक संगणकाचा पडदा. प्रत्येक बाळ आपल्याला नेमून दिलेले काम अतिशय आनंदाने चित्कारत करत आहे. सैतानाची फेरी दिवसातून एकदाच होत असते. काम व्यवस्थित चालले असेल तर न बोलताच, पण एका विलक्षण जरबेच्या वातावरणात ती पार पडते. प्रत्येकाच्या वाट्याला (वाट लावायला) एकेक देश दिलेला आहे. पृथ्वीवर काही बाळे 'सिव्हिलायझेशन्स्' वा तत्सम नांवाचे गेम्स् खेळतात तसेच. पण फरक इतकाच की हे खोटे नसतात. त्या त्या देशांत, प्रत्येक खेळी प्रत्यक्षांत येत असते.

अनादि मी अनंत मी...

विकास ·
लेखनविषय:
अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला, मारील रिपू जगती असा कवण जन्मला... असे म्हणणार्‍या आणि लहानपणीच शिवाजीच्या थाटात "देशाच्या स्वातंत्र्याकरता मारीता मारीता मरेतो झुंझेन" अशी शपथ घेणार्‍या स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज म्हणजे २८ मे ला, १२५ वी जयंती आहे. आज म.टा. मधे त्यांच्यावर विशेष ऑनलाईन पुरवणी काढण्यात आली आहे. त्यातील श्री. भारतकुमार राउत यांचा "तात्यांच्या सहवासात" हा लेख वेगळ्याच अनुभवावर आधारीत असल्याने वाचनीय वाटला.

रंगपंचमी (उत्तरार्ध)

बट्ट्याबोळ ·
लेखनप्रकार
(पात्र व घटना काल्पनीक) रफ़िक शेख आले खरे, पण रातच्याला वशाट जास्त झाल्याने आणि सकाळीच "समाधान" चा कटींग मारल्याने त्यांना जरा अवळून आलं. आल्या आल्या ते लागलीच निघून गेले. सेनावाल्यांनी एकमेकांकडे "ह्यांनी दाखवली आपली ...." अशा थाटात पाहिलं, आणि "आयला महाराष्ट्रात एकच मर्द" अस म्हणून मा.शि.बा.ठां. ना एकदा मनातल्या मनात नमन केलं. "माझा लढा ... विठ्ठल ... **डवे (ब?)..." असही काहीतरी पुटपुटले. चिखलात पाय पडून बाजूचं पाणी जस गढूळ व्हाव, तशी गढूळता क्शणभर पसरली. खर कारण"समाधान" हे होतं हा भाग वेगळाच. इकडे "आळेकर टावर" मधून पोट्टी जमत होती. र्हावल्या पन आला. नाश्ता करून.

आपली बस

हेरंब ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
या संवादात बायकांवर टीका करण्याचा अजिबात हेतू नाही. एकूण सामाजिक व्यवस्थेवर मात्र आहे. गैरसमज नसावा. सदू आणि दादू बसस्टॉपवर उभे असतात. एका जुन्या नाटकातले संवाद पुटपुटत असतात. सदू : बस आली बस. दादू : कुठाय बस, आपली नाही ती बस! (तेवढ्यांत त्यांची बस येते. बसमधे चढल्यावर सदू डावीकडच्या पहिल्या सीटवर बसायला जातो.) दादू : अरे, थांब थांब, ती सीट अपंगांसाठी आहे. सदू : मग दुसर्‍या सीटवर बसु या का ? दादू : नको रे, ती पण अपंगांसाठीच आहे. सदू : अरेच्चा, एवढ्या सीट खाली असताना का नाही बसायचं ? दादू : अरे लेका, हा आरक्षणाचा जमाना आहे. तिसरी सीट तान्ह्या बाळांना पाजणार्‍या आयांसाठी आहे.

अपयशाचे व्यवस्थापन

विकास ·
माजी राष्ट्रपती अब्दूल कलाम यांचे व्हार्टन इंडीया इ़कॉनॉमिक फोरम मध्ये भाषण झाले. (२२ मार्च २००८) ते सर्वच वाचण्यासारखे आहे. पण त्यातील खालील भाग मला विरोपातून मिळाला. आवडल्यामुळे त्याचे स्वैर भाषांतर करून येथे देत आहे: प्रश्नः आपण सांगू शकाल का की नेतृत्वाने अपयशाचे व्यवस्थापन कसे करायचे असते ते? डॉ. कलामः मी तुम्हाला माझ्याच अनुभवावर आधारीत याचे उत्तर देतो. १९७३ साली मी इस्रोचा एसएलव्ही-३ प्रकल्पाचा डायरेक्टर झालो.