या संवादात बायकांवर टीका करण्याचा अजिबात हेतू नाही. एकूण सामाजिक व्यवस्थेवर मात्र आहे. गैरसमज नसावा.
सदू आणि दादू बसस्टॉपवर उभे असतात. एका जुन्या नाटकातले संवाद पुटपुटत असतात.
सदू : बस आली बस.
दादू : कुठाय बस, आपली नाही ती बस!
(तेवढ्यांत त्यांची बस येते. बसमधे चढल्यावर सदू डावीकडच्या पहिल्या सीटवर बसायला जातो.)
दादू : अरे, थांब थांब, ती सीट अपंगांसाठी आहे.
सदू : मग दुसर्या सीटवर बसु या का ?
दादू : नको रे, ती पण अपंगांसाठीच आहे.
सदू : अरेच्चा, एवढ्या सीट खाली असताना का नाही बसायचं ?
दादू : अरे लेका, हा आरक्षणाचा जमाना आहे. तिसरी सीट तान्ह्या बाळांना पाजणार्या आयांसाठी आहे.