Skip to main content

राजकारण

कोणता झेंडा घेऊ?....

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 23/01/2010 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
राजभाषेचा साज असलेला मुकुट डोक्‍यावर लेऊन मंत्रालयासमोर ताटकळणाऱ्या माय मराठीचे गेल्या आठवड्यात चहूदिशांनी धिंडवडे निघाल्याने मराठीचा अवस्था आणखीनच केविलवाणी झाली आहे. शेकडो निरपराधांचे बळी घेणारा आंतरराष्ट्रीय दहशतवादी अजमल कसाब न्यायालयात मराठीतून बोलला, याचा अभिमान वाटावा, की महाराष्ट्राच्या राजधानीतदेखील मराठीचे केवळ कामचलाऊ ज्ञान पुरेसे आहे, असा घूमजाव पवित्रा घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांची कीव करावी, अशा दुहेरी संकटात महाराष्ट्राची माय मराठी सापडली आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस

लेखक jaypal यांनी शनिवार, 23/01/2010 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आज दि.२३ जानेवारी "आझाद हिंद सेनेचे" संस्थापक वंदनिय नेताजी बोस यांची जयंती. या विस्मृतीत गेलेल्या महान नेत्यास माझा मानाचा मुजरा. जय हिंद, जय हिंद, जय हिंद,

वेगळे विदर्भ राज्य आणि महाराष्ट्रातील वीजनिर्मिती

लेखक सुहास यांनी बुधवार, 20/01/2010 05:33 या दिवशी प्रकाशित केले.
वेगळे विदर्भ राज्य आणि महाराष्ट्रातील वीजनिर्मिती आज २० जानेवारीला विदर्भात वेगळ्या विदर्भ राज्यासाठी हरताळ पाळण्यात येत आहे. काही राजकीय पक्षांनी आणि संघटनांनी त्याला पाठींबा दिलाय (यात काँग्रेस आणि (पश्चिम महा)राष्ट्रवादी काँग्रेस देखील सामील आहेत). फक्त स्वतःसाठी एक वेगळे राजकीय कुरण मिळावे हाच या राजकीय पक्षांचा हेतू आहे हे स्पष्ट आहे. मला स्वतःला वेगळे विदर्भ झाल्यानेच तेथील समस्या सुटणार असतील तरच ते वेगळे राज्य व्हावे असे वाटते.. असो.

सध्याचे वाचन ...

लेखक बट्ट्याबोळ यांनी मंगळवार, 19/01/2010 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच पुणे फेरी मधे काही पुस्तके विकत घेउन आलो. तु.मा.सा. इथे डाकवत आहे: १. चर्चबेल लेखकः ग्रेस ललित लघुनिबंध आहेत ग्रेस यांचे. सुंदर भाषा, कधी कधी दुर्बोध वाटणारे ग्रेस यातही तसाच वावर करतात. वाचताना त्यांच्या भावविश्वाची, विविध गोष्टींकडे बघण्याची त्यांची कवी-द्रुष्टी यांची अनुभुती येते. एका निळ्या जगात, जेथे आपण एकटे असतो, तेथे हे पुस्तक आपल्याला घेउन जाते. सुंदर लेखन !! जरूर वाचा. २. पांगिरा. विश्वास पाटिल यांची सुंदर कादंबरी. एका गावाची ही कथा आहे.

२६/११ ला मुंबईवर लादल्या गेलेल्या रक्तलांछित हल्ल्यांपासून आपण काय शिकले पाहिजे?

लेखक सुधीर काळे यांनी गुरुवार, 07/01/2010 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
पाकिस्तानी अतिरेक्यांनी २६/११ ला मुंबईवर केलेल्या रक्तलांछित हल्ल्याचे वर्णन पहातांना, वाचतांना व ऐकतांना असं वाटलं होतं कीं इतक्या लोकांना, पोलिसांना व शेवटी लष्करालाही २-२॥ दिवस तंगवून सोडणारं हे पथक ३०-४० लोकांचं तरी असावं. मग कळलं कीं फक्त दहाच पाकिस्तानी अतिरेक्यांनी इथं येऊन हा अनर्थ केला व असा प्रचंड धुमाकूळ इथं यशस्वीपणे घातला.

अजून एक क्रियाशील आदर्श

लेखक विकास यांनी रविवार, 06/12/2009 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
हे पार्सी बाबा भारताच्या किनार्‍यावर गुजराथच्या बाजूने नक्की कधी आले ते माहीत नाही, पण त्यावेळची एक कथा आत्ता एकदम आठवली. ते त्या भागातील राजाकडे गेले आणि स्वतःच्या देशातील अत्याचारांमुळे विस्थापित झालो आहोत तेंव्हा आम्हाला येथे आश्रय मिळूंदेत म्हणून विनंती केली. राजा काहीच बोलला नाही, फक्त त्याने दुधाने काठोकाठ भरलेला पेला दाखवला. उद्देश हा की आम्ही येथे परिपूर्ण आहोत असे काहीसे दाखवणे. पण त्या समुहाचा म्होरक्या पार्सीबाबा पण हुषार - त्याने त्या दुधात तसेच न बोलता साखर घातली. अर्थात त्याने सांगितले, की आम्ही या काठोकाठ दुधाने भरलेल्या पेल्यात जशी साखर विरघळली तसेच एकरूप होऊन राहू.

(ते जीवच वेडे होते)

लेखक चेतन यांनी शुक्रवार, 04/12/2009 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
क्रांती ताईंची सुंदर गझल ते जीवच वेडे होते वाचुन आणि वर्षअखेर जवळ आल्याने नेहमीप्रमाणे अ‍ॅप्रायझल आठवलं : 8} ~X( असो.. ते जीवच वेडे होते, जुंपुन काम करणारे टेचात पुढे ते येती, मागे पुढे करणारे त्यांच्या न्यायाचा डंका, उंदरास मांजर साक्षी! मागावुन प्रमोशन घेती, काहिच न करणारे आपलेच आपण गाती पोवाडे मर्दुमकीचे, म्यनेजर म्हणवती स्वतःला, 'काडि'चे न कळणारे माहित जरी वरवरचे, आतून रिकामी घोडी, ते देखावे बघणारे, हे देखावे करणारे! नेहमीच पैदा करती, मुद्दाम पंक्ती घोळांच्या अन् पाठ थोपटुन घेती, "आम्हीच घोळ निस्तरणारे!" सुंदर रिसोर्
काव्यरस

जेंव्हा ते पहील्यांदा चालून आले...

लेखक विकास यांनी शनिवार, 14/11/2009 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
मनसेवरून गेल्या दोनचार दिवसात झालेल्या अनेक चर्चांमधे एक प्रकर्षाने वेगळी जाणवलेली चर्चा ही श्री. कलंत्री यांची होती.