टू द लास्ट बुलेट-भाग १
टू द लास्ट बुलेट-विनिताताई कामटे यांनी विनीताताई देशमुख यांच्या सहकार्याने लिहिलेल्या पुस्तकाचा परिचय
२६/११/२००९ला "मुंबई हत्याकांड (Mumbai Massacre)" म्हणून ओळखल्या जाणार्या दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष झालं. त्याच दिवशी श्रीमती विनीता कामटे यांनी वीरगती प्राप्त झालेले आपले पती हुतात्मा अशोकजी कामटे यांच्याबद्दल विनीता देशमुख यांच्या सहकार्याने लिहिलेले "To the last bullet" हे पुस्तक प्रकाशित झाले. २८-२९ नव्हेंबरला मला ते पुण्यातल्या पुस्तकविक्रेत्यांकडे मिळाले व मी ते घेतले. अर्धेअधीक पुण्यातच वाचून झाले व उरलेले मी अमेरिकेच्या विमानप्रवासात वाचले.
विनीताताईंनी खरंच फारच ताकतीने आपलं दु:ख गिळून अतीशय सुंदर व अर्थवाही पुस्तक लिहिलेले आहे. घडी उलगडताना प्रत्येक घडीबरोबर जसं एकाद्या साडीचं सौंदर्य झळकू लागतं तसंच प्रत्येक वाक्यागणिक/पानागणिक अशोकजींचं लोभसवाणं - करारी, शिस्तप्रिय व त्याच वेळी अतीशय सहृदय, कनवाळू - असं व्यक्तिमत्व उजळत जातं. हे पुस्तक वाचल्यावर त्यांच्याबद्दल माझ्या मनात एकच विशेषण आलं ते म्हणजे "पुरुषोत्तम"!
हे पुस्तक वाचायच्या आधी मला त्यांना वीरगती कोणत्या परिस्थितीत मिळाली याची फारशी माहिती नव्हती. विनीताताईंनी लिहिल्याप्रमाणे स्वत:चा नाकर्तेपणा किंवा हलगर्जीपणा (किंवा दोन्ही!) लपविण्यासाठी अशोकजींच्या वरिष्ठ अधिकार्यांनी व राजकीय नेत्यांनी एक गैरसमज पसरवला होता कीं हेमंत करकरे, सालसकर व अशोकजी या तीघांना त्यावेळची परिस्थिती किंवा तिचे गांभिर्य कळलेच नाहीं व एकाद्या नवशिक्या व अपरिपक्व अधिकार्यांसारखे अविचारी धाडस दाखवत ते एकाच गाडीत बसून पुढे गेले व अतिरेक्यांच्या गोळ्यांना बळी पडले. पण २१ नव्हेंबरला मी भारतात परत आल्यावर दूरचित्रवाणीवर या हल्ल्याबद्दल सखोल संशोधनावर आधारलले बरेच कार्यक्रम पहायला मिळाले व त्यातून हे गैरसमज दूर होऊ लागले होतेच. पण विनीताताईंचे हे पुस्तक वाचल्यावर मात्र उरली-सुरली कोळिष्टके क्षणात दूर झाली व अनेक नवे (व छुपे) खलनायक समोर येऊ लागले. विनीताताईंनी जरी खूपच सडेतोडपणे हे पुस्तक लिहिले असले तरी कांहीं ठिकाणी त्यांनी जरासा ’आवरता हात’ घेतलाय् असेही वाटले. सुदैवाने विनीताताईंनी त्यांचा तसेच विनीताताई देशमुख यांचाही इ-मेलचा पत्ता दिला होता त्यांना मी बरेच प्रश्न विचारले. अद्याप विनीताताई कामटे यांचे उत्तर आलेले नाहीं पण विनीताताई देशमुख यांनी कामटे मॅडमच उत्तर देतील असे लिहिले आहे. कदाचित् पोलीसखात्याच्या मर्यादांमुळे त्यांनी हात आवरता घेतला असेल. याबाबतीतील मला वाटलेल्या कुशंका माझ्या लेखनात पुढे सविस्तरपणे येतीलच.
हा सत्य परिस्थिती लपविण्याचा प्रारंभ होतो हुतात्मा करकरेंच्या बुलेटप्रूफ जॅकेटच्या हरवण्यापासूनच. म्हणजे ते जॅकेट योग्य व आंतरराष्ट्रीय दर्जाचे होते कीं हलक्या प्रतीचे होते याचा शोध तिथेच संपला! अगदी प्रेसिडेंट केनेडींचा मेंदू वॉल्टर रीड इस्पितळातून "नाहींसा" झाल्याच्या घटनेची आठवण करून देणारी ही घटना आहे. तो नाहींसा झाल्यामुळे केनेडींना लागलेली गोळी मागून झाडलेली होती कीं पुढून झाडलेली हे कळलेच नाहीं, तसाच हा प्रकार. "त्या दिवशी हेमंत करकरेंनी जर आंतरराष्ट्रीय दर्जाचे जॅकेट वापरले असते तर ते आज हयात असते कां हा प्रश्न मला जन्मभर भेडसावीत राहील" असे श्रीमती कविता करकरे यांनी आपल्या प्रस्तावनेत म्हटलेलेच आहे. पुढे त्या म्हणतात कीं हुतात्मे कांहीं एका दिवसात तयार होत नाहींत तर त्याला आयुष्यभराची निष्ठा व धैर्य लागते व ते त्यांनी अशोकजींच्या कारकीर्दीत जवळून पाहिले होते.
आपल्या "थेट हृदयापासून" या परिचयपर ’दोन शब्दां’त विनीताताईही म्हणतात कीं हा हल्ला असामान्य असाच होता. या हल्ल्याला कसे तोंड द्यायचे याचे प्रशिक्षणही मुंबई पोलिसांना नव्हते, त्यांची शस्त्रेही अद्ययावत् व पुरेशी नव्हती, तरीही कांही पोलीस अधिकार्यांनी व कर्मचार्यांनी ही एक जास्तीची जबाबदारी समजून असामान्य नेतृत्व व असाधारण धैर्य दाखवून परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न केला. त्या पुढे म्हणतात कीं याउलट मुंबई पोलीस संघटनेचे बरेच अधिकारी त्या दिवशी या संकटाला सामोरे जायला कचरल्याचे जाणवते. भित्र्या पोलीस अधिकार्यांना किती सुरेख "शालजोडीतला आहेर" दिलाय् विनीताताईंनी!
अपुरी शस्त्रास्त्रे व अपुरे प्रशिक्षण यांमुळे प्रतिकूल परिस्थितीत असलेल्या पोलिस हवालदारांना पुढे न पाठवता या तीन अधिकार्यांनी स्वत:च पुढाकार घेऊन या हल्ल्याला तोंड दिले. या अधिकार्यांनी दबा धरून बसलेल्या (ambush) अतिरेक्यांवर गोळीबार करून त्यांपैकी कसाबचे दोन्ही हात निकामी केले ज्यामुळे आणखी नरसंहार टळला. पुढे चौपाटीवर हुतात्मा ओंबळे व इतर पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून या जखमी कसाबला पकडले. अशा तर्हेने छत्रपती शिवाजी टर्मिनल ते चौपाटी दरम्यान या सर्व अधिकार्यांनी दाखविलेल्या शौर्यामुळेच एक अतिरेकी आज आपल्या हाती लागला. वरिष्ठांनी त्यांच्या या शौर्याला 'अविचारी धाडस' किंवा 'अज्ञाना'चा मुलामा चढवायला नको होता.
या सर्वांचे व त्यातल्या त्यात अशोकजींचे असाधारण काम व त्यांचा दुर्दैवी मृत्यू रंगभवन गल्लीत कोणत्या परिस्थीतीत झाला यामधील दडवून ठेवलेले रहस्य उलगडून ते जनतेसमोर एका पुस्तकाच्या रूपाने ठेवण्याचा त्यांनी निर्धार केला होता व त्यातूनच या पुस्तकाचा जन्म झाला.
त्यांना पोलीस संघटनेकडून सहकार्य तर नाहींच मिळाले पण याउलट पदोपदी त्यांच्या मार्गात अडथळेच आणले गेले याचे त्यांना आश्चर्य व दु:ख झाले. साधा पोस्टमॉर्टेमचा रिपोर्टही त्यांना दिला गेला नाहीं.
जर त्या दिवशी करकरे यांच्या आज्ञा पाळल्या गेल्या असत्या व त्यांनी केलेली व्यूहरचना पाळली गेली असती तर हे शूर अधिकारी असे धारातीर्थी पडलेच नसते. गोळी लागल्यावरही रक्तबंबाळ स्वरूपात त्यांना रस्त्यावर पडलेले रंगभवन गल्लीत रहाणार्या रहिवाशांनी पाहिले होते व त्यांनी १०० नंबरवर फोन करून ही माहिती पोलीस कंट्रोल रूमला दिलीही होती. तरीही कसे कुणी मदतीला आले नाहीं, एक पोलीसची लाल दिवा असलेली गाडी तिथून गेली त्यातील अधिकार्यांनीही त्यांना कशी मदत केली नाहीं याचेही वर्णन त्यांनी केले आहे. करकरे याच्या व्युहरचनेबरहुकूम करवाई झाली असती तर बरेच अतिरेकी हाती लागले असते व या शूर अधिकार्यांचा मृत्यूही टळला असता असे त्यांनी नमूद केले आहे.
हे रहस्य त्यांनी कसे परिश्रमपूर्वक उलगडले, त्यांना पोलीस संघटनेकडून कुणीही कशी सुखासुखी माहिती दिली नाहीं व शेवटी RTI द्वाराच त्यांनी ही माहिती कशी मिळविली हा व इतर हृदयद्रावक भाग पुढील कांहीं भागात.
शेवटी एक विनंती. प्रत्येक स्वदेशाभिमानी भारतीयाने हे पुस्तक वाचनालयातून वाचायला न आणता विकत घेऊन वाचावे जेणे करून तिच्या आवृत्यावर आवृत्या झटपट विकल्या जातील व विनीताताईंच्या लिखाणाचे चीज होईल.
याद्या
14376
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
वाचावंच लागेल.
ह्म्म्,काय
चांगला
आभारी...
जनतेची स्मरणशक्ती नेहमी क्षणभंगुर नसते
धन्यवाद!
गफूरसाहेबांची सदसद्विवेकबुद्धी आता जागृत झाली आहे?
In reply to धन्यवाद! by अनिरुध्द
हे विनीताताई देशमुखांकडून मला आले आहे. इटॅलिक्स अक्षरे माझी!
संघटना?
अवांतराबद्दल क्षमस्व...!
In reply to संघटना? by प्रकाश घाटपांडे
पोलिस मित्र संघटना
In reply to अवांतराबद्दल क्षमस्व...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बातमी
In reply to पोलिस मित्र संघटना by प्रकाश घाटपांडे
पोलीस दल.....
In reply to संघटना? by प्रकाश घाटपांडे
हं...वाचायल
धन्यवाद..सुधीरजी..
धन्यवाद..सुधीरजी..
जीते रहो!
In reply to धन्यवाद..सुधीरजी.. by वात्रट
वाचतीये.
वाचायचे आहेच...
चांगली
अशा प्रकारचे.. ?
In reply to चांगली by डॉ.प्रसाद दाढे
ते पुस्तक आले आहे.....
In reply to अशा प्रकारचे.. ? by भडकमकर मास्तर
धन्यवाद काळे काका!
अतिशय रंजक आणि वाचनीय दिसते आहे पुस्तक!
विनीताताईंच्या या रहस्यस्फोटाने कांहीं चांगले घडून येवो!
In reply to अतिशय रंजक आणि वाचनीय दिसते आहे पुस्तक! by चतुरंग
उत्तम चर्चा
विनीताताईंनी यावर प्रकाश टाकला आहे
In reply to उत्तम चर्चा by सहज
हा नकाशा पुढच्या भागात वापरला जाईल. पाहून ठेवावा.
थोडे हेही वाचा!
धन्यवाद.
In reply to थोडे हेही वाचा! by श्रावण मोडक
काय सांगता?
In reply to धन्यवाद. by सुधीर काळे
होय. हे खरे आहे
In reply to काय सांगता? by श्रावण मोडक
काही मुद्दे
ऑडिट होत राहिले पाहिजे
In reply to काही मुद्दे by प्रकाश घाटपांडे
जर कामटे साहेबांचा दु:खद बळी गेला नसता तर पोलीस दलातील त्रुटी...
In reply to काही मुद्दे by प्रकाश घाटपांडे
वा, वाहीदा!
In reply to जर कामटे साहेबांचा दु:खद बळी गेला नसता तर पोलीस दलातील त्रुटी... by वाहीदा
सुधीरभाऊ, ल