"टू द लास्ट बुलेट" - भाग २
"टू द लास्ट बुलेट" - भाग २
कामटेसाहेबांचा जन्म पोलिस 'कुटुंबा'त झाला होता. त्यांचे वडील व आजोबाही सैन्यात/पोलिसात होते. आजोबा तर महाराष्ट्र राज्याचे पहिले आय.जी. होते. विनीता कामटे यांचेही घराणे उच्चशिक्षणविभूषित होते व त्या कुटुंबातले बहुसंख्य लोक वकील व न्यायाधीश अशा जागांवर होते. कामटेसाहेबांच्या आईचा जन्म शीख पिता व ब्रिटिश आई यांच्या पोटी झालेला होता. त्यामुळेच कदाचित्त् कामटेसाहेब 'गोर्या' साहेबासारखे दिसत. खाण्याची मनसोक्त आवड पण तितकेच शारीरिक धडधाकटपणाकडे (physical fitness) कटाक्षाने लक्ष अशा दुहेरी उत्तम सवयींमुळे त्यांचे व्यक्तिमत्व सर्वांवर छाप पाडणारे होते.
त्यांना शर्मिला नावाची सख्खी बहीण आहे जी दुबईला असते. दुर्दैवाने त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होत व त्यामुळे त्यांची आई दिल्लीला वेगळी रहात असे. पण कामटेसाहेब मात्र आपल्या आईवर अतोनात प्रेम करीत असत व नेहमी तिला भेटत असत. शर्मिलाताई तर त्यांना वडील भावापेक्षा पितृस्थानीच मानत असत.
आय्.पी.एस्.ची परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांची पहिली नेमणूक नक्षलवाद्यांचा सुळसुळाट असलेल्या भंडारा येथे झाली. नवख्या अधिकार्याच्या दृष्टीने ही एक कसोटीचीच नियुक्ती. त्यावेळी त्यांचे 'बॉस' होते श्री अरान्हा. (पोर्तुगीज भाषेत हा उच्चार 'अरानिया' असा करतात). अरान्हासाहेबांनी कामटेसाहेबांना त्यांच्या कामगिरीवर खुष होऊन महाराष्ट्र सरकारतर्फे खास गौरवाचे बक्षिसही त्यांना देवविले होते. अरान्हासाहेबांवर कामटेसाहेबांचा खूप जीव होता. हुतात्मा करकरे हेही त्यावेळी शेजारच्याच जिल्ह्यात कार्यरत होते व त्यांचे व करकरे यांचेही नजीकचे व सौहार्द्राचे संबंध होते असे विनीताताई लिहितात.
२६ नव्हेंबरलासुद्धा त्यांचा दिनक्रम नेहमीसारखाच सुरू झाला, फक्त फरक इतकाच कीं अरान्हासाहेब त्या दिवशी कामटेसाहेबांच्या घरी पाहुणे म्हणून रहाणार होते व दोघे रात्रीचे जेवण एकत्र घेणार होते. नेहमीप्रमाणे घरी आल्यावर आपला 'तालमी'चा (gym) नित्यक्रम संपवून ते दोघे जेवायला चेंबूरच्या गोल्फ़ क्लबवरील रेस्टॉरंटमध्ये (रेस्तोराँ) जेवायला गेले व परत येतांना त्यांना ताजच्या आसपासच्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलेल्या त्यांच्या नातेवाइकांचे गोळीबाराचा आवाज ऐकून आश्चर्यचकित झाल्यामुळे "हे काय चाललेय्" अशा अर्थाचे फोन आले. त्यांनी नियंत्रण कक्षाकडे चौकशी करून "गँगवॉर आहे. आहे तिथेच बसून रहा व रस्त्यावर येऊ नका" असा सल्ला दिला. गॅंगवॉरचा संशय आल्यामुळे त्यांनी आपल्या अधिकारक्षेत्रातील परिस्थिती बिघडू नये म्हणून आपल्या अंमलदारांना योग्य त्या आज्ञा देऊन अरान्हासाहेबांसह ते घरी पोचले.
येवढ्यात श्री गफूरसाहेबांचा त्यांना फोन आला कीं त्यांनी ताबडतोब दक्षिण मुंबईकडे प्रयाण करावे व गफूरसाहेबांना ताजमधील ट्रायडेंट हॉटेलशेजारच्या "ऑपरेशन सेंटर"मध्ये भेटावे.
अरान्हासाहेबांना आश्चर्य वाटले कीं कामटेसाहेबांच्या अधिकारक्षेत्रात सर्व आलबेल असतांना त्यांना दुसर्याच्या अधिकारक्षेत्रात जाण्याची आज्ञा का दिली जातेय्! पण वरिष्टांची आज्ञा प्रमाण मानून कामटेसाहेब मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जवळच्या मार्गाने ट्रायडेंट हॉटेलशेजारील ऑपरेशन सेंटरकडे निघाले. (नकाशा पहा)
_____________________________________________________________________________________
कामा इस्पितळाभोवतीचा परिसर
_____________________________________________________________________________________
जसे ते ताजच्या जवळ आले तेंव्हां परिस्थिती झपाट्याने बदलत असल्याचे त्यांना कळून आले असावे. कारण त्यांनी "मी कुठे रिपोर्ट करू, ट्रायडेंट कीं इतर कुठे" असा प्रश्न नियंत्रण कक्षाला (मारियांना) विचारला. ध्वनीफितींनुसार नियंत्रण कक्ष गफ़ूरसाहेबाशी संपर्क साधू शकला नाहीं म्हणून मारियांनी थेट संदेश दिला कीं कामा इस्पितळात गोळीबर चालू आहे, तरी कामटेसाहेबांनी कामा इस्पितळाकडे जावे. २३:२४वा आलेल्या या आदेशानुसार ते चार मिनिटात तिथे पोचले. या दरम्यान करकरेसाहेबही शिवाजी टर्मिनसला पोचले होते. तिथे त्यांना कळले की अतिरेकी 'टाइम्स गल्ली'च्या पुलावरून पळाले होते. त्यांनी आपले बुलेटप्रूफ जॅकेट व हेल्मेट परिधान केले व आपल्या कनिष्ठ लोखांना उत्साह देत तेही तिकडे गेले व त्यांनी 'नियंत्रण कक्षा'ला तसे कळविले.
यावेळी करकरेसाहेबांनी जी माहिती कंट्रोल नियंत्रण कक्षाला जो परिस्थितीचा अहवाल दिला तो परिपूर्णतेचा व सुबोधतेचा (comprehensiveness and lucidity) सुंदर नमुना आहे. ते म्हणाले कीं 'ATS QRT'चे व 'क्राईम ब्रॅंच'च्या तुकड्या (teams) आता कामा इस्पितळाच्या मागील फाटकाशी जय्यत तयार आहेत. हॉस्पिटलमधून ए.के.-४७मधून गोळीबार व ’हातबाँब्स’चा (grenades) मारा सुरू आहे. व ए.सी.पी. (मध्य मुंबई) श्री दाते जखमी झाले आहेत, कॉन्स्टेबल टिळेकरांना आम्ही मागचे फाटक तोडून बाहेर यायला मदत करून त्यांना इस्पितळातही पाठविले आहे. आम्ही मागील फाटकाशी आहोत तरी पुढील फाटकाशी कुमक पाठवून ते बंद करून अतिरेक्यांना वेढून टाकावे. एवढेच नव्हे तर या गोळीबारात उत्तम समन्वय साधून पोलिसांचाच एकमेकांवर गोळीबार होणार नाहीं (crossfire)याची खात्री केली पाहिजे. तसेच प्रसादसाहेबांना सांगून लष्कराकडून कमांडो मागवायला सांगावे. (यावरून त्यांना एव्हाना परिस्थितीचे गांभिर्य पूर्णपणे कळून आले होते.)
खरंच किती विचारपूर्वक आदेश दिले होते करकरेसाहेबांनी! आणि तरीही त्या तीघांच्या हौतात्म्यानंतर ते स्वत:चे समर्थन करू शकत नाहींत म्हणून या तीघांवर "त्यांना परिस्थितीचे गांभिर्यच समजले नाहीं" असे मूर्खासारखे आरोप त्यांच्या वरिष्ठांनी व राजकीय नेत्यांनी केलेच नसते!
२३:२४ला (म्हणजे कामटेसाहेब तिथे पोचण्याच्या आधीच) करकरेसाहेबांनी दिलेल्या या आदेशाला उत्तर म्हणून नियंत्रण कक्षाकडून निरोप आला "सर, म्हणजे तुम्हाला 'कामा'च्या पुढच्या फाटकाकडे मदत पाहिजे, होय ना?". म्हणजे निरोप या पोलीस कर्मचार्याला नीट समजला होता हे सिद्ध होते! याला उत्तर म्हणून करकरेसाहेबांनी पुन्हा हाच आदेश २३:२८ वाजता पुन्हा दिला. त्याला २३:३० वा. नियंत्रण कक्षाकडून "Noted, Sir" अशी पोचही आली.
२३:४५ वा. धुरगुडे नावाचे इन्स्पेक्टर जिथे पहापालिका मार्ग व रंगभवन गल्ली मिळतात तिथे सेंट झेवियर कॉलेजच्या (पोर्तुगीज भाषेत हा उच्चार 'शाविये' असा करतात) कोपर्यावर आले. कामा इस्पितळाच्या समोरच्या दरवाजातून झट्कन बाहेर पडलेल्या व फूटपाथवर चालणार्या दोघा तरुण अतिरेक्यांना त्यानी हटकले. उत्तरादाखल त्या दोघांनी त्यांच्यावर गोळ्या चालवल्या व त्यांना ठार केले. जर करकरेसाहेबांच्या आदेशाचे पालन झाले असते तर धुरगुड्यांचे व या तीघांचे प्राणही असते वाचले असते व या दोघाना तिथेच पकडता आले असते. मारुती फाड नावाचा ड्रायव्हर, जो त्यावेळी त्याच्या साहेबांसाठी गाडी घेऊन चालला होता, त्याने धुरगुड्यांना गोळी लागलेली पाहिली. पण पुढच्याच क्षणी त्याच्यावर गोळीबार झाला व त्यात त्याचे एक बोट उडवले गेले. प्रसंगावधान दाखवून त्याने गाडी ’सेंट्रल लॉक’ केली व स्वत: सीटच्या खाली पडून राहिला. त्याला मेलेला समजून अतिरेकी पुढे गेले व रंगभवन गल्लीत शिरले.
करकरेसाहेबांच्याकडे फारसे विकल्प नव्हतेच. कारण वेळ कुणासाठीच थांबत नाहीं. बेधुंद गोळीबार चाललाच होता, श्री दाते जखमी अवस्थेत होतेच व नियंत्रण कक्षाकडून २३:२४ वा. दिलेल्या त्यांच्या आदेशानुसार कारवाई झालेली आहे कीं नाहीं याबद्दल काहीच उत्तर नव्हते. पण वेळ घालविणेही चुकीचे होते.
करकरेसाहेब व कामटेसाहेब वेगवेगळे आले असले तरी कामाच्या मागे एकमेकांना भेटले होते व त्यांनी विचारविनिमय करून घेतलेला निर्णय (अधीक वेळ न घालवता रंगभवन गल्लीतून पुढच्या फाटकाकडे जाण्याचा) बरोबरच होता. (विनीताताईंना सत्यशोधनात कामटेसाहेबांच्या वरिष्ठांकडून आणले गेलेले अडथळे वाचा भाग-३मध्ये)
याद्या
11378
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
भाग ३ लवकर
CNN वर दाखविलेला एक सुंदर अनुबोधपट
वाचत आहे.
दुसरा भागही मस्त
धोतरांची पीतांबरे झाली होती?
मराठी - अमराठी
श्री
In reply to मराठी - अमराठी by प्रकाश घाटपांडे
मी पोलिसांबद्दल बोलतोय्. सेनादलांबद्दल नाहीं
In reply to श्री by दशानन
मराठी - अमराठी पोलीस हा वाद गैरलागू आहे.
In reply to मी पोलिसांबद्दल बोलतोय्. सेनादलांबद्दल नाहीं by सुधीर काळे
आपल्या, घाटपांडेसाहेबांच्या व राजबाबूंच्या मताची नोंद घेतली आहे
In reply to मराठी - अमराठी पोलीस हा वाद गैरलागू आहे. by चतुरंग
काही काळापूर्वी
In reply to आपल्या, घाटपांडेसाहेबांच्या व राजबाबूंच्या मताची नोंद घेतली आहे by सुधीर काळे
वाय पी सिंग
In reply to काही काळापूर्वी by चतुरंग
हे दोन दुवे वाचण्यासारखे आहेत
एक कटाक्ष
हाही दुवा वाचण्यासारखा आहे. गफूर यांनी असे का केले?
श्री.
In reply to हाही दुवा वाचण्यासारखा आहे. गफूर यांनी असे का केले? by सुधीर काळे
याचीही सत्यासत्यता पडताळून पाहिली गेली पाहिजे
In reply to श्री. by धमाल मुलगा
सगळी चर्चा
SOP ही कधीच 'त्रिकालाबाधित' नसते
In reply to सगळी चर्चा by श्रावण मोडक
तरीही
In reply to SOP ही कधीच 'त्रिकालाबाधित' नसते by सुधीर काळे
SOP अशीच बदलली जाते
In reply to तरीही by श्रावण मोडक
हाहाहाहा
In reply to SOP अशीच बदलली जाते by सुधीर काळे
मतांची देवाण-घेवाण झाली तितकी पुरेशी आहे
In reply to हाहाहाहा by श्रावण मोडक
श्री रा रा
In reply to मतांची देवाण-घेवाण झाली तितकी पुरेशी आहे by सुधीर काळे
ऑ
In reply to श्री रा रा by अवलिया
ठीक आहे
In reply to मतांची देवाण-घेवाण झाली तितकी पुरेशी आहे by सुधीर काळे
इतर धंदे आणि पोलिस, अंतर्गत सुरक्षा...
सहमत
In reply to इतर धंदे आणि पोलिस, अंतर्गत सुरक्षा... by प्रसन्न केसकर
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
धन्यवाद
In reply to इतर धंदे आणि पोलिस, अंतर्गत सुरक्षा... by प्रसन्न केसकर
उत्तम प्रतिक्रिया
In reply to इतर धंदे आणि पोलिस, अंतर्गत सुरक्षा... by प्रसन्न केसकर
घाटपांडे काका चर्चेत आल्याने बरे वाटले.
In reply to उत्तम प्रतिक्रिया by प्रकाश घाटपांडे
योग्य माहिती
In reply to घाटपांडे काका चर्चेत आल्याने बरे वाटले. by प्रसन्न केसकर
+१