२६/११ ला मुंबईवर लादल्या गेलेल्या रक्तलांछित हल्ल्यांपासून आपण काय शिकले पाहिजे?
पाकिस्तानी अतिरेक्यांनी २६/११ ला मुंबईवर केलेल्या रक्तलांछित हल्ल्याचे वर्णन पहातांना, वाचतांना व ऐकतांना असं वाटलं होतं कीं इतक्या लोकांना, पोलिसांना व शेवटी लष्करालाही २-२॥ दिवस तंगवून सोडणारं हे पथक ३०-४० लोकांचं तरी असावं. मग कळलं कीं फक्त दहाच पाकिस्तानी अतिरेक्यांनी इथं येऊन हा अनर्थ केला व असा प्रचंड धुमाकूळ इथं यशस्वीपणे घातला. खरं तर केवळ दहाच जणांनी केलेल्या या नरसंहारावर अद्यापही विश्वास बसत नाहीं आणि जर हुतात्मा ओंबळे यांनी जिगरीने स्वतःचा जीव देऊन कसाबला जिवंत पकडले नसते तर "ते किती होते" याबद्दलची उलट-सुलट चर्चा अद्यापही चालू राहिली असती.
परवा डीट्रॉईट (Detroit) या मोटरगाड्यांच्या राजधानीच्या (car capital) विमानतळावर उतरणार्या विमानाला उडवून लावण्याचा प्रयत्न उधळून टाकणार्या आणखी एका 'डच ओंबळें'ची शौर्य-गाथाही अशीच रोमांचकारक आहे.
त्या विमानात '19A' या डावीकडील खिडकीलगतच्या (पंखावरील ) खुर्चीत बसलेल्या आत्मघाती अतिरेक्याची (उमर फरूक अब्दुलमुतल्लबची) बॉम्ब पेटविण्याची हालचाल पहाताच उजव्या बाजूला 18H या खुर्चीत बसलेल्या 'अलेन घोंडा' (Alain Ghonda) या एका अमेरिकन इस्टेट एजंटने पट्टा बांधायची आज्ञा झुगारून व उभे राहून 'आग, आग' अशा आरोळ्या जिवाच्या आकांताने ठोकायला सुरुवात केली. 18H च्या दोन ओळी मागे (20Aवर) बसलेल्या डच व्हीडियो फिल्म निर्माता 'यास्पर शुरिंगा'ने (Jasper Schuringa) डाव्या व उजव्या रांगांमधील ३-४ खुर्च्यांवरून छलांग मारून मुतल्लबला धरून ठेवले व विमान कर्मचार्यांना अग्निशामक उपकरणे आणण्याची आज्ञा दिली. विमानातल्या हवाई-सुंदरींनी व इतर 'केबिन क्रू' (cabin crew) च्या सभासदांनी प्रसंगावधान ओळखून मधे-मधे अडकलेल्या भयग्रस्त व 'पॅनिक'ग्रस्त प्रवाशांना मुष्किलीने बाजूला सारून अशी अग्निशमनाची उपकरणे मिळवली व अब्दुलमुतल्लब, त्याची पेटलेली पँट व 'यास्पर शुरिंगा' या शूराला पाण्यात नखशिखांत भिजवून काढले व आगीवर ताबा मिळवला. (चित्र पहा)
मुतल्लबला पकडून ठेवणारा खरा-खुरा वीर (Real-Life Hero) यास्पर शुरिंगा
९/११ च्या कुप्रसिद्ध हल्ल्यानंतर वरील प्रसंगांव्यतिरिक्तही विमानाच्या प्रवाशांनी एकीने व आपापसातल्या चांगल्या संतुलनाने टाळलेले असे आणखी चार प्रसंग आहेत. पहिला प्रसंग घडला ९/११ रोजीच. 'युनायटेड ९३' या विमानातील लोकांनी चांच्यांवर एकजुटीने प्रतिहल्ला केला व ते विमान अर्ध्या वाटेतच पाडले. असं वाचल्याचंही स्मरतंय् कीं ते विमान 'व्हाईट हाऊस'वर डागले गेले होते, पण या विमानावरील शूरवीर प्रवाशांनी स्वत:कडे कुठलीही शस्त्रे नसतांना व कुठलेही प्रशिक्षण नसताना शस्त्रधारी अतिरेक्यांवर मात करून हा मोठा अपघात टाळला. याचे कौतुक करावे तितके थोडेच!
या घटनेनंतर तीनच महिन्यांनी "शू-बॉम्बर" या उपनावाने (कु)प्रसिद्ध रिचर्ड रीड या अतिरेक्यालाही १५-२० माणसांनी एकसमयावच्छेदे घेरून व संगीत ऐकण्याच्या हेडफोनच्या तारांनी त्याला बांधून त्याच्या स्वत:च्या बुटातील स्फोटकें पेटविण्याच्या इराद्यालाही यश येऊ दिले नव्हते.
२००७ साली एका बंदूक 'पाजळणार्या' हवाई चांच्याला दहा-बारा प्रवाशांनी असेच पकडले व त्याचा विमान अपहरणाचा उद्देश हाणून पाडूला.
गेल्या नोव्हेंबरमध्येही सोमालियावरून जाणार्या विमानातील चांच्यावरही असाच एकीने प्रतिहल्ला करून प्रवाशांनी त्याचा मनसुबा धुळीला मिळविला होता.
या सर्व शौर्य दाखविणार्या प्रसंगातून जवळ-जवळ ६०० लोकांचे प्राण या नि:शस्त्र व कुठलेही प्रशिक्षण नसलेल्या वीरांनी वाचविले. या सर्व वीरांना खरं तर रोख बक्षिसें व पदकं दिली गेली पाहिजेत.
अधीक माहितीसाठी वाचा TIME च्या ११ जानेवारीच्या एशिया आवृत्तीतील हा दुवा: http://www.time.com/time/nation/article/0,8599,1950576,00.html
अचानक घडलेल्या घटनेने स्वत:चा घाबरगुंडा होऊ न देता (panic-stricken) प्रसंगावधान व संतुलन राखून व "मी अमूक करीत असतांना दुसरा दूर उभा असलेला माणूस काय करेल" याची अचूक अटकळ बांधण्याच्या गुणाचा (anticipation) वापर करून हे साध्य झाले.
आता वळू २६/११ कडे! बोरीबंदर येथील शिवाजी टर्मिनसवर केवळ दोन अतिरेक्यांनी जो अभूतपूर्व गोंधळ घालून जबरदस्त रक्तपात केला त्यात अशा तर्हेचे शौर्य कुणीच का नाहीं दाखविले?
तीच गोष्ट आहे ताज व ओबेरॉय हॉटेल्सची.
आरामखुर्चीत बसून मी हा प्रश्न विचारतोय् असं म्हणून कांहीं लोक कुत्सित टोमणेही मारतील, पण हा प्रसंग टोमणे मारण्याचा नसून आत्मपरिक्षण करण्याचा व भयावर विजय मिळवून परिस्थितीवर स्वार होण्याचा आहे. जे झाले ते होऊन गेले, पण असं पुन्हा होऊ नये म्हणूणूसखोल विचार करून आपला action plan व SOP आपण मुकर्रर केलीच पाहिजेत.
ज्यांनी गर्भगळित व भयभीत होऊन पळण्याचा मार्ग अंगिकारला त्यातलेही किती तरी (कदाचित बहुसंख्य) लोक मृत्युमुखीच पडले असतील. किती जीव पळून जाऊन जीव वाचवू शकले याची आकडेवारी मिळणे कठीणच, पण पळणे व जीव वाचविणे यात १:१ असा नक्कीच परस्परसंबंध (correlation) नसणार.
अशा पळून जाणार्यांपैकी कांहीं लोकांनी शांत डोके ठेवून अतिरेक्यांच्या मागील बाजूने ’धोबीपछाड’ पकडीने एकाद्याला कां पकडले नाहीं? हुतात्मा ओंबळेंनी हेच केले, एकट्याने केले ते एक प्रचंड जमाव कां करू शकला नाहीं?
याची दोन-तीन कारणे असू शकतात.
पश्चिम युरोपात प्रत्येक देशात प्रत्येक तरुणाला सक्तीचे दोन वर्षांचे लष्करी प्रशिक्षण घ्यावेच लागते. माझ्या युरोपच्या अनेक 'वार्यां'मधे मी शनिवारी-रविवारी असे अद्याप मिसरूडही न फुटलेले पण त्यांच्या crew-cut मुळे सहज ओळखू येणारे किती तरी 'कोवळे' सोजीर मी पाहिले आहेत. असे सक्तीचे लष्करी प्रशिक्षण त्यांना असे एरवीही उपयोगी पडते कां?
केवळ पोलीस किंवा सैन्यावर अवलंबून न रहाता प्रत्येक भारतीय नागरिकाला होमगार्ड पद्धतीचे प्रशिक्षण द्यायची गरज आज उघड-उघड दिसत आहे कां?
आणखी एक अवघड व बर्याचदा निरुत्तर करणारा प्रश्नही मला भेडसावतो. असं मृत्यूला घाबरून पळ काढण्याचा आपणा हिंदूंचा पिंडच आहे कां? काश्मीरमधून मुकाट्याने नेसत्या वस्त्रानिशी बाहेर पडलेले अल्पसंख्य काश्मिरी हिंदूही आजही जम्मू प्रांतात व दिल्लीत निर्वासितांसारखे 'मुकी बिचारी कुणि हाका' पद्धतीने रहात आहेत. याउलट फाळणीनंतर अल्पसंख्य झालेले भारतीय मुसलमान आजही त्यांच्या एकजुटीमुळे व निर्भय वृत्तीमुळे आपले पाय घट्ट रोवून इथं खंबीरपणे व कौतुकास्पदपणे उभे राहिले आहेत. एके काळी ज्यू धर्मीयही याच न्यूनगंडाने पछाडलेले होते व त्यामुळे त्या जमातीचा अनन्वित छळ झाल्याच्या कथा किती तरी आपण वाचतो. लियॉन युरीसच्या दुसर्या महायुद्धावरील कादंबर्यात अशी किती तरी अंगावर शहारे आणणारी उदाहरणे आहेत. आउश्वित्ससारख्या (Auschwitz) concentration camps मध्ये झालेल्या ज्यूंच्या शिरकाणाबद्दलही आपण वाचलेले आहे व चलच्चित्रपटांतही पाहिले आहे. पण आत्मपरीक्षण करून स्वत:च्या दोषांचा व कमकुवत बाजूचा अभ्यास करून आज याच ज्यूंनी इस्रायलमध्ये एक लढाऊ राष्ट्र उभे केलेले आहे. तसेच आपणही - हिंदू, मुसलमान, शीख व ख्रिस्ती अशा सर्व भारतियांनी - आत्मपरीक्षण करून निर्भय लोकांच्या वृत्तीचे अनुकरण करून किंवा इतर कुठल्याही सोयीच्या मार्गाने आपल्या भयगंडावर विजय मिळवून अशा अतिरेकी हल्ल्यांना तोंड द्यायला नको कां?
सामान्य भारतीय नागरिकांसाठी सरकारने किंवा "रास्वसं"सारख्या पिंडानेच लढाऊ असलेल्या संस्थांनी असले प्रशिक्षण सार्या भारतीय जनतेला दिले पाहिजे व सर्व जनतेनेही असले प्रशिक्षण स्वयंस्फूर्तपणे स्वीकारून स्वत:ला अतिरेक्यांबरोबर लढायला, निदान पोलीस व लष्कर येईपर्यंत खिंड लढवायला शिकले पाह्जे.
हुतात्मा ओंबळे यांनी स्वत:ची प्राणाहुती देऊन सार्या भारताला हाच एक अनमोल धडा शिकवला आहे असंच मी मानतो व त्याच्यासारखे वागून आपण त्यांच्या स्मृतीला वंदन केले पाहिजे.
२६/११ च्या मुंबई हत्याकांडाबद्दल वाचताना व पहातांना मला एका पुस्तकाची सतत आठवण येत राहिली व ते म्हणजे टॉम क्लॅन्सी (Tom Clancy) या लेखकाचे रेनबो-६ (Rainbow-6) हे पुस्तक. प्रत्येक भारतियाने हे पुस्तक वाचावे असाच प्रेमळ आगप्रेकमीत कमी मिपाकरांना मला करावा असं वाटतं.

याद्या
10985
प्रतिक्रिया
53
मिसळपाव
हाडीमासी खिळलेली
you said it.
In reply to हाडीमासी खिळलेली by चतुरंग
एकमेकांवरं विश्वास ...
संयम
"रास्वसं"सा
In reply to संयम by विकास
श्री रा रा विजुभौंशी
In reply to "रास्वसं"सा by विजुभाऊ
म्हणूनच म्हणले...
In reply to श्री रा रा विजुभौंशी by jaypal
बाबरी ढाचा
In reply to "रास्वसं"सा by विजुभाऊ
"पनामा
In reply to बाबरी ढाचा by विनायक रानडे
का आले नाही
In reply to "पनामा by विजुभाऊ
विनायकराव
In reply to का आले नाही by विनायक रानडे
संदर्भ?
In reply to "रास्वसं"सा by विजुभाऊ
हिटलरकडे
In reply to संदर्भ? by विकास
अजूनही
In reply to हिटलरकडे by विजुभाऊ
व्वा विकासजी!
+१
In reply to व्वा विकासजी! by सुधीर काळे
सहमत!
In reply to +१ by सहज
लेख छान आहे!
चांगला लेख
हम्म
पिंड
>>पाश्चात्य
In reply to पिंड by चिरोटा
थेट लायकी ?
In reply to >>पाश्चात्य by II विकास II
सहमत
In reply to थेट लायकी ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वरील
In reply to सहमत by विकास
एका मिपा सभासदाचा मला ई-मेलवर आलेला प्रतिसाद
समारोप?
ठोस चर्चा आवश्यक, वाद टाळावेत
हे ठीक...
हेतू होता 'मिपा' सभासादांना ते पुस्तक घ्यायला प्रवृत्त करण्याचा!
In reply to हे ठीक... by श्रावण मोडक
बरं बरं...
In reply to हेतू होता 'मिपा' सभासादांना ते पुस्तक घ्यायला प्रवृत्त करण्याचा! by सुधीर काळे
भ्रमनिरास करणारा अजीबात नाहीं
In reply to बरं बरं... by श्रावण मोडक
एक सुंदर
भारतीय
सनथ फोन्सेकांची शिकवणी
In reply to भारतीय by डॉ.प्रसाद दाढे
ह्या धाग्यावर आम्हा भारतियाची इथेच्छ टिंगल
थट्टा की बट्टा?
सामान्य माणसे
In reply to थट्टा की बट्टा? by डॉ.प्रसाद दाढे
देव हा सामान्य व्यक्तींच्या रुपातूनच आला
In reply to सामान्य माणसे by विकास
>>पण आपल्या
In reply to देव हा सामान्य व्यक्तींच्या रुपातूनच आला by सुधीर काळे
जरासं
In reply to >>पण आपल्या by II विकास II
ते अविनाश
In reply to जरासं by सुधीर काळे
धन्यवाद
In reply to ते अविनाश by II विकास II
अविनाश
In reply to धन्यवाद by सुधीर काळे
दुव्याबद्
In reply to अविनाश by शाहरुख
एकदिवस बंद
एकदिवस बंद
समारोपाच्या प्रश्नांवर मत द्यायच तर...
शिस्त बाणवायला दोन वर्षें प्रत्येकाने देशाला द्यावीतच!
In reply to समारोपाच्या प्रश्नांवर मत द्यायच तर... by ऋषिकेश
लेख आवडला!
वाSSSव!
धर्माधिकार्यांचे "दहशतवाद आणि नागरिकांचे कर्तव्य" यावरचे भाषण
आज उरलेले (५, ६, ७, ८, ९, १० आणि ११) पाहिले