Skip to main content

राजकारण

हे वारिस शाह! - अमृता प्रीतमच्या काव्याचा अनुवाद

लेखक अरुंधती यांनी गुरुवार, 17/06/2010 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
गेले कितीतरी दिवस तिची ती कविता मनात ठाण मांडून बसली आहे. त्या कवितेवर लिहिण्यासाठी अनेकदा सुरुवात केली.... पण त्या अभिजात कवयित्रीच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या त्या काव्याचा अनुवाद मांडताना ''लिहू की नको'' अशी संभ्रमावस्था व्हायची... लिहिताना माझे हात उगाचच थबकायचे!
काव्यरस

धमालरावांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ...

लेखक छोटा डॉन यांनी बुधवार, 16/06/2010 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी उठलो आणि पहिल्याछुट आपण "पुण्यात" नसल्याचे लै दु:ख झाले. मायला पुण्यात असतो तर काय दणका झाला असता की बोलायचे काम नाही. काय ते भल्लेभल्ले होर्डिंग्स, पोश्टर्स, पेप्रात जैराती, केबल टीव्हीवर शुभेच्छांच्या क्लिपिंग्स वगैरे वगैरेचा दणका उडवला असता. आज आमच्या मित्राचा वाढदिवस. नव्हे नव्हे, आमच्या परममित्राचा आणि आंतरजालावरचे एक लोकप्रिय व्यक्तीमत्व व 'कट्टा स्पेशालिस्ट' श्री. श्री. श्री.

अल कायदाचे तीन नंबरचे नेते मुस्ताफा अबुल-याझीद कालवश!

लेखक सुधीर काळे यांनी सोमवार, 07/06/2010 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
अल कायदाचे तीन नंचे नेते मुस्ताफा अबुल-याझीद कालवश! मी २३ जून २००९ साली लिहिलेला अल कायदाचे तीन नंबरचे नेते मुस्ताफा अबुल-याझीद यांची माहिती देणारा लेख लिहिला होता. http://www.misalpav.com/node/8315 गेल्या आठ-दहा दिवसापूर्वी आलेल्या वृत्ताप्रमाणे द्रोणाचार्यांच्या हातून त्यांची अफगाणिस्तान-पाकिस्तानच्या सीमेवरील प्रदेशात हत्या करण्यात आली. त्यांच्याबरोबर त्याचे कुटुंबीयही मारले गेल्याचे वृत्त आहे.

घरगुती सावरकर

लेखक भोचक यांनी शुक्रवार, 28/05/2010 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
सावरकरांच्या संघर्षातील कालखंडाचा लेखाजोखा बराचसा त्यांनी लिहून ठेवला आहे. त्यांच्या विचारांचे मंथनही बरेच झाले आहे. त्यांच्यासह बर्‍याच जणांनी ते केले आहे. परंतु, संघर्षाच्या सुरवातीचा कालखंड ओलांडल्यानंतरचे सावरकर कसे होते, या विषयी फारसे कधी वाचनात आले नव्हते. नुकतंच रवींद्र पिंगेच्या 'देवाघरचा पाऊस' या ललित पुस्तकात सावरकरांचे चिरंजीव विश्वासरावांची मुलाखतवजा लेख वाचायला मिळाला. त्यातून 'घरातले' सावरकर कसे होते, ते कळायला मदत झाली. त्यातल्या माहितीचा हा कोलाज.... सावरकरांचा कर्मकाडांवर विश्वास नव्हता. पण ते जानवे नेहमी घालायचे.

एक प्रचंड अस्वस्थ करणारा लेख

लेखक शिल्पा ब यांनी शुक्रवार, 28/05/2010 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
लोकप्रभात आलेला ब्रिगेडीअर हेमंत महाजन यांचा http://www.loksatta.com/lokprabha/20100604/suraksha.htm हा लेख प्रचंड अस्वस्थ करून गेला...त्यांच्या म्हणण्याप्रमाणे देशात तुकडे झाल्यातच जमा आहेत...सुमारे ३ कोटी बांगलादेशी आपल्या देशात आहेत...इस्लामीकरण वाढत आहे त्याचबरोबर भारतविरोधी कारवायाही वाढत आहेत...खरं तर मी असे लेख वाचायचे सोडून दिलेले आहे कारण आपला नुसताच संताप होतो आणि काहीच करता येत नाही हि जाणीव काही केल्या जात नाही...पण चुकून हा लेख वाचला...खरंच इतकी भयानक परिस्थिती आहे?

सोनिया गांधी : एक चरित्र

लेखक ऋषिकेश यांनी शनिवार, 22/05/2010 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात अनेक व्यक्तींबद्द्ल लोकांना आकर्षण आहे, उत्सुकता आहे, पण जर याची क्रमवारी लावायची ठरवली तर सोनिया गांधींचा क्रमांक फार वरचा ठरावा. सोनिया स्वतः मिडीयासमोर फारच कमी येतात. त्यांनी दिलेल्या मुलाखतीही मोजक्या. जनतेला त्या दिसतात, त्यांचे विचार कळतात ते फक्त जाहीर सभांतून अथवा त्यांच्या निर्णयातून. अश्यावेळी देशातील एका प्रमुख पक्षाच्या अध्यक्षा व त्यांच्या मर्जीनूसार पंतप्रधानपदही ठरविण्याची ताकद असलेल्या महिलेविषयी कुतुहल नसेल तरच नवल. अश्या वेळी जेव्हा वाचनालयात "सोनिया" हे सोनिया गांधींचे चरित्र दिसल्यावर ते घेतल्याशिवाय रहावलं नाहि.