Skip to main content

राजकारण

~*~*~*~ राजीव'जींना भावपूर्ण श्रद्धांजली ~*~*~*~

लेखक मृगनयनी यांनी शुक्रवार, 21/05/2010 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
राजीव गांधी!... आपल्या सर्वांचं एक आदरणीय आणि लाडकं व्यक्तिमत्व! भारताचे यशस्वी -माजी पंतप्रधान! २१ मे १९९१, रोजी रात्री, कोणाच्याही ध्यानीमनी नसताना तामिळनाडू येथे घडवून आणलेल्या मानवी बॉम्ब-हल्ल्यात झालेला राजीव'जींचा मृत्यू केवळ भारतीयांनाच नव्हे तर संपूर्ण विश्ववासीयांना मोठा मानसिक आघात देऊन गेला!..... राजीवजींच्या स्मृतीला विनम्र अभिवादन! ..... *~*~*~* STILL WE MISS YOU.... RAJEEV'JI...... LOVE YOU.......

राष्ट्रीय विज्ञान-तंत्रज्ञान दिनानिमित्त... वरुण यंत्र - तंत्राचा जाहीर निषेध

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 11/05/2010 13:59 या दिवशी प्रकाशित केले.
राष्ट्रीय विज्ञान-तंत्रज्ञान दिनानिमित्त... वरुण यंत्र - यज्ञ तंत्राचा जाहीर निषेध मिठाच्या आहूतींनी वरुण देवरायाला आळवण्याच्या हास्यास्पद प्रकाराला प्रतिबंध करावा.
आज (दि ११ मे २०१०) राष्ट्रीय विज्ञान-तंत्रज्ञान दिनानिमित्त दै. सकाळ पेपरमधे कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी वरुण यंत्राचा वापर हा लेख पान १ व११ वाचून...
मित्र हो, ही आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाची क्रूर चेष्टा तर नाहीना असे विचारावेसे वाटू लागले. बिरबल-अकबराच्या गोष्टीतील 'खिचडी पकाने के लिए' अती दूर ठेवलेली चूल काही कामाची नाही.

"संधी दृष्टीकोन बदलण्याची....!!"

लेखक डावखुरा यांनी शनिवार, 08/05/2010 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
"लोकांची सत्ता येईल तेव्हाच लोकशाही मजबुत होईल. लोकांच्या हितासाठी कायदे येतील तेव्हाच लोकसत्ता येईल." कायदा कितीही उपयुक्त बनला तरीही तो अंमलात आणण्याची राजकीय ईच्छा शक्तीही तितकीच महत्त्वपुर्ण आहे. पण या नोकरशाही-भ्रष्टाचारयुक्त समजात योजनांचा लाभ गरजुंपर्यत पोहोचवणे ही स्वप्नवत भासणारी गोष्ट केवळ अशक्यप्राय आहे.

हे मराठी ? ? ? ?

लेखक निरन्जन वहालेकर यांनी मंगळवार, 04/05/2010 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
हे मराठी ? ? ? ? बाळगुंडे आज सत्तेतली घोष करती “ मराठी मराठी ” पाद्यपूजा नित्य दिल्लीश्वरीची अन सांगती “ आम्ही मराठी “ भेदिले तख्त दिल्लीचे ज्यांनी धन्य धन्य “ ते मराठी ” सांभाळति जोडे आज दिलीश्वराचे हाय रे दुर्दैव “ हे, मराठी ” ! ! !

रेड सन च्या निमित्ताने

लेखक आळश्यांचा राजा यांनी मंगळवार, 20/04/2010 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
ओरीसाचे सध्याचे डी जी पी पूर्वी राज्याचे गुप्तचर प्रमुख होते. राज्याच्या नक्षलग्रस्त भागाची पाहणी करून त्यांनी एक सूचना प्रसारीत केली – रात्रीच्या वेळी गस्त घालताना किमान दोन पोलीस एकत्र असायला हवेत. एके रात्री साहेब सहज बाहेर फिरायला पडले. साध्या वेषात. भुवनेश्वरमध्येच. रात्रीचा दीड दोनचा सुमार असावा. एका पोलीसाने हटकले. बंदूक रोखली. साहेब थांबले. त्याला जवळ येऊ दिला. एका क्षणात त्याची बंदूक यांच्या हातात आली. त्याच्यावर रोखून विचारले, दुसरा कुठे आहे? तर तो दुसऱ्या गल्लीत होता. साहेब हताश झाले. सूचना बाजूला राहू देत; कॉमन सेन्स नको का?

भांडवलशाही

लेखक इनोबा म्हणे यांनी मंगळवार, 20/04/2010 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा - शुचि यांची अप्रतिम चांदणशब्द आणि दुर्बीटणेबैंची भांडणशब्द भांडवलशाही मधाळ वाणी॥१॥ कैक आमिषे ठायी ठायी॥२॥ कुटील निती पांढरपेशी॥३॥ लाल-शहांची नुसती वळवळ॥४॥ टवाळ फौजा हीन व हिणकस॥५॥ हिरव्या नाण्याची व्यर्थ हि खणखण॥६॥ कोण कुणाचे कुणा कळेना॥७॥ सोयीतून ही केवळ अडचण||८|| बाकी चालू देत...