मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राहणी

पहिले पाढे पंचावन्न!

चतुरंग ·
लेखनप्रकार
अन्वयचा बाळकडू वरचा लेख वाचला आणि परवाची गोष्ट आठवली ती लिहावी म्हटले. ------------------------------------------------------------------- हा आठवडा चिरंजिवांच्या ह्या शालेय वर्षाचा शेवटचा आठवडा. शनिवारपासून सुट्टी सुरु होईल आणि थेट सप्टेंबरात शाळा उघडेल तेव्हा मुलगा पहिलीतून दुसरीत जाईल. परवाची गोष्ट, मुलाला टेबल्स करुन द्यायचे मनात आले, टेबल्स म्हणजे पाढे. म्हटलं त्यालाच लिहायला लावूयात म्हणजे अनायसे लिहूनही होतील. क्रिएटीविटी चं भूत डोक्यात ना! मनाशी कल्पना घोळवत होतो काय करावे.

एका सोनालीची महालढाई

ज्ञानदा कुलकर्णी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सोनाली नवांगुळ
आजचा सकाळ पाहिला, पहिल्या पानावरच उजव्या कोप-यातील हे शीर्षक वाचले. बाकीचा पेपर टाकला आणि आधी सप्तरंग वाचायला घेतले. पहिल्याच पानावरचा सोनालीचा फोटो पाहीला, केवढी स्मार्टनेस आहे तिच्या चेहे-यावर.

घर पहावं रंगवून!

स्वाती दिनेश ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
घरात रंगकाम काढलं की सामानाची हलवाहलवी, झाकाझाकी, धूळ, आवाज आणि नंतरची आवराआवरी.. सगळं घर ढवळून निघतं अगदी. बर्‍याच हरवलेल्या वस्तू ह्या आवराआवरीत सापडतात तर कित्येक वस्तू आपण का जमवल्यात? असा प्रश्न पडतो. पण त्या फेकून देण्याऐवजी "असू दे, लागेल केव्हा तरी, होईल कशाला तरी.. " असं म्हणून जुने पत्र्याचे, प्लास्टिकचे डबे, प्लास्टिकचे चमचे, बशा, जुने कपडे परत खोकाबंद करून अडगवायला सज्ज होतात. ह्या सगळ्याचा धसका म्हणून की काय, जर्मनीत आल्यापासून 'घर रंगवणे' आतापर्यंत इतकी वर्षे यशस्वीपणे टाळले होते, पण आता मात्र आमच्या घरातील एक खोली अगदी रंगवायला हवीच होती.

होय निगेटीव्हच

विनायक पाचलग ·
लेखनप्रकार
काही दिवसापुर्वी मी लोकप्रभात आलेल्या पराग पाटील यांच्या नकारात्मक मतावर भाष्य करणार्‍या लेखावर माझा प्रतिसाद दिला होता .तोच प्रतिसाद येथे देत आहे. विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे हाच लेख आज प्रतिसादाच्या रुपाने का होइना लोकप्रभात प्रकाशीत झालेला आहे.आज आलेल्या अंकात तुम्ही तो वाचु शकता. मुळ लेख- http://www.loksatta.com/lokprabha/20090501/mind.htm माझा प्रतिसाद- http://www.loksatta.com/lokprabha/20090522/vachak.htm
होय, निगेटीव्हच....।
सध्या 'नकारात्मक मत' या विषयावर प्रचंड उहापोह, साधक-बाधक चर्चा सुरू आहे.

संवादाचा सुवावो

भोचक ·
ज्येष्ठ साहित्यिक, प्रख्यात वक्ते आणि संत साहित्यासह संस्कृत साहित्याचेही गाढे अभ्यासक राम शेवाळकर यांच्या निधनाची बातमी कळाली नि गलबलून गेलो. शेवाळकर नाशिकला नित्य यायचे. नाशिकच्या देशदूत या वृत्तपत्रातर्फे सारडा व्याख्यानमाला होते. त्यात शेवाळकरांचे व्याख्यान ठरलेले असायचे. एकदा या व्याख्यानमालेत त्यांचे ज्ञानेश्वरीवरच्या एका अध्यायावरचे ओजस्वी निरूपण ऐकले नि प्रचंड प्रभावीत झालो. हा माणूस 'ग्रेट' आहे, एवढे जाणवले.

आउटस्टँडिंग

टारझन ·
लेखनप्रकार
णमस्कार्स लोक्स , आउटस्टँगिंगचं विशेषण लागायला तसं अवघ्या एकोणिसावं वर्ष उघडलं .. आता "आउटस्टँडिंग " का ? तर आपण मला भेटलाय का कधी ? ह्म्म .. कळलं असेलंच .. विनंती : पुढील वाक्य टेलेब्रांडच्या मराठीमधे डब केलेल्या जाहिरातींसारखी वाचून ऐकावीत , जसा मोठा होत गेलो .. तसा लांबच लांब वाढलो .. पण फक्त उभाच .. बाकी आम्ही पाप्याचे पितर .. उंची वाढता वाढता ६ फुट क्रॉस करून गेली. ताडा-माडाचं झाड झालो .. आणि हा माझ्या "आउटस्टँडिंग" होण्याकडचा प्रवास. बाबांचा स्वभाव मुळचा विनोदी. एकदा सर्व नातेवाईक आलेले.

मिलपिटास येथील चटपटीत कट्टा - वृत्तांत

धनंजय ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
गेल्या आठवड्यात उत्तर कॅलिफोर्नियामध्ये जाण्याचा योग आला. निघण्याआधी मी "मिसळप्रेमी तितुका मेळवावा" वचनाला अनुसरून चौकशी सुरू केली. आणि सान-होसे बे-एरिया भागातील लोकांनी त्याचवेळी कट्टा आयोजित केला. पहिला खुलासा : सनीव्हेल-सानहोसे म्हणजे अगदी नारायणपेठ-नवसह्याद्री आहे असे म्हणतात, ते खोटे आहे. खडूसपणाची खूणही खरवडून खरवडून सापडली नाही. त्यामुळे लोकहो, सदाशिव पेठेतले घर सोडून इथे येण्याचा विचार खोडा. त्रास होईल. चार पैसे जास्त लागले, तरी आपले कोथरूडच बरे. दुसरा खुलासा : पुढील चित्रांमध्ये "चित" होऊन चेष्टा करणारे सर्व प्रौढ लोक आहेत.

पुस्तक परिचयः कालगणना

नरेंद्र गोळे ·
पुस्तक परिचयः कालगणना, लेखकः मोहन आपटे, राजहंस प्रकाशन, आवृत्ती पहिलीः जुलै २००८, किंमतः रू.२००/- फक्त.
पंचांग आणि खगोलशास्त्र यांचा अतिशय घनिष्ट संबंध आहे. सूर्यनिर्मित ऋतुचक्र किंवा चंद्राचे कलाचक्र यांच्या संयोगानेच पंचांगांची रचना केली जाते. भारतीय पंचांगाचे नाते, आकाशाशी निरंतर जडलेले आहे. म्हणूनच त्यासारखे माहितीदायक पंचांग दुसरे नाही.