गेले सोळा आठवडे अमेरिकेत राहून नुकताच मी मायदेशी परत आलो. साहजीकच मला अमेरिका कशी वाटली असे लोक विचारतात, त्याचे उत्तर काय द्यावे याचा विचार पडतो. तिकडे ज्या गोष्टी चांगल्या वाटल्या त्यांना त्या चांगल्या आहेत असे कोणी म्हंटले की "तंकडचं सगळं लय भारी हाय हे आयकून आमाला आत्ता कंट्टाला आला हाये!" अशी प्रतिक्रिया एकाद्याकडून येते किंवा त्याचा बादरायण संबंध आपली संस्कृती, अस्मिता वगैरेशी जोडून राष्ट्राभिमान, देशभक्ती, धर्मनिष्ठा वगैरेवरले बौध्दिक दुसरा कोणी सुरू करतो.