हॅलोवीन पंपकिन!

लेखनप्रकार
परवाच्या शुक्रवारी हापिसातून घरी आलो तो मुलगा धावत येऊन मिठी मारत म्हणाला " बाबा, आज हॅलोवीनचा पंपकिन कार्व करायचाय!" हो हो म्हणत त्याला थोपवला. जेवणं वगैरे होईपर्यंत चिरंजिवांनी कसाबसा दम काढला. हातांवर पाणी पडताच "मी टूलकिट काढतो!" म्हणत त्याची धाव क्लोजेटकडे गेलीच. टूलकिट म्हणजे दोन वर्षाखाली भोपळा कोरायला आणलेली छोट्या हत्यारांची एक पुडी.

आप्ले भेन्डीभावु

लेखनप्रकार
जामच पाठी लाग्ले.लिव्हा कायत्री म्हनुन. काय लिहाव ते कायच कळेना. मग मनाताल आपन ज्या सौस्थेच काम कर्तो त्येच्याविश्यीच लिहिल तर. त्येव्हड्च माहितीच आदान आनी परदान. मी पुर्वी माहाराष्ट्र अनिसच काम करत होतो. महाराष्ट्र अनिस हि नरेन्द्रजी दाभोलकरान्ची सौस्था आसुन तिचा श्या* दा* यान्च्या नुस्त्या अनिसशी कायच संबंध नाय.

एक ताईचा सल्ला: जो खरच फायदेशीर आहे.

एक ताईचा सल्ला: जो खरच फायदेशीर आहे. आज पराशेठ चा ताईचा सल्ला वाचला अन मला माझी ताई लिहीत असणार्‍या 'साप्ताहीक सदर- ताईचा सल्ला' याची आठवण झाली. हा सल्ला जरी हलकाफूलका, खेळकर वातावरणात लिहीला गेला तरी त्यात माझ्या मते एक अतिशय चांगला सल्ला दिला गेला आहे. आजकाल सगळीकडे विज, पाणी यांच्या भविष्यातील टंचाईबद्दल बोलले जाते. तस पाहिले तर या दोन्ही गोष्टी आपण फारच हलक्या घेतो.

लाडकी लेक

लेखनविषय:
लेखनप्रकार
"अहो, ऐकलंत का? फीचे पैसे कधी मिळणार तुमचे? तुमच्या लाडक्या लेकीला एकही धडका ड्रेस नाही.. तो घ्यायचाय आणि जरा भाजीही आणायची होती." "आली होती पण खर्च झाली. आईला एमटी केलेत पैसे." "खर्च झाली???!!! आईंना आत्ता गेल्याच महिन्यात तर एमटी केलेलीत ना तुम्ही मग आता परत?" "भाऊला लागत होते हातऊसने.." "बास्स.. त्यांच्या उधळपट्टीला ठिगळे लावायला पैसे आहेत पण पोरांना कपडे घ्यायला नाहीत पैसे.. इतक्या दिवसांनी आलेली ती मेली फी, तीही टाकलीत देऊन आणि परत म्हणा मीच कर्कशा म्हणून.." "माझ्याकडे नाहीयेत आत्ता अजिबात पैसे. कडधान्यं कर काही दिवस." "बाबा, आईला का त्रास देता तुम्ही?

आठवणींतले दिवस

लेखनविषय:
लेखनप्रकार
२५-३० वर्षांमागचे ते दिवस आजही तसेच आठवतात. सुट्टी लागली की दुसर्‍या दिवशी गावी पळायचो, मग ती दिवाळीची असो, गणपतीची वा मे महिन्याची. सुदैवाने आजोळ पण याच गावात, अगदी चार उंबर्‍या पल्याड आईच माहेर. आईच्या माहेरचा गोतावळा मोठ्ठा. आईला पाच सख्खे काका आणि एक आत्या. त्यासगळ्यांना किमान ४ मुलं. आता इतक्या मावश्या आणि मामांची मुलं सगळी जमलो की नुसता कल्ला व्हायचा. काही जणांची आजोळं वेगळ्या गावी असल्याने त्यांची सुट्टी विभागली जायची. पण मी आणि बहिण या बाबतित भाग्यवान. प्रत्येक सुट्टीच अस वेगवेगळ वैशिष्ठ्य आसायच. निसर्गाने पण मुक्तहस्ताने उधळण केली आहे माझ्या गावावर.

पाऊस कधीचा पडतो

दुर्दैव, अस्वस्थता या आणि अशा काही संज्ञांच्या व्याख्या जडगोळा तत्त्वज्ञानाची पुस्तके, वर्तमानपत्रांतील लक्षवेधी लेख किंवा थोरामोठ्यांची टाळीबाज व्याख्याने यांतून होतच नसतात. त्या होतात स्वानुभूतीतून. म्हणजे रविवारी ग्यालरीत उभे असताना खालून जाणार्‍या कोळणीच्या टोपलीत ताजा फडफडीत बांगडा दिसावा; बांगड्याची भूक तिला द्यायच्या हाकेच्या रुपाने अगदी स्वरयंत्रापर्यंत यावी आणि अचानक आज संकष्टी असल्याचा साक्षात्कार व्हावा, हे खरे तर दुर्दैव आणि या साक्षात्कारानंतर होणारी 'कसंनुसं' झाल्याची जाणीव म्हणजे अस्वस्थता.

मायेसाठी काहीही!

लेखनविषय:
लेखनप्रकार
अगदी आईबाबांसारखीच माया करणार्‍या मॅथ्यूंच्या घरात घुसले की माझी अखंड टकळी सुरू होऊन जाते आजकाल. रोज धावतपळत का होईना पण किमान एक चक्कर तरी मारायचीच ५-१० मिनिटाचीतरी असा अलिखित नियमच झालाय माझा. माझी त्यांना आणि त्यांची मला खूपच सवय झाली आहे आता. त्यांना त्यांच्या तब्ब्येतीच्या असंख्य प्रश्नांमुळे घराबाहेर पडता येत नाही आणि मला कामानिमित्त हापिसात जावे लागत असल्याने घरात रहायला वेळ मिळत नाही. असे असल्यानेच की काय.. त्यांची बाहेरची कामे मी करायची आणि माझी घरातली काही कामे करण्यात त्यांनी मला मदत करायची, हे अगदी न सांगता आपोआपच जमून आले आहे.

तहान

लेखनप्रकार
कालीदासाने पाठवला हजारो वर्षापुर्वी एक मेघ प्रेयसीकडे प्रेमाचा संदेश घेऊन काल आम्हीही पाठवला मुद्दाम तयार केलेला एक मेघ प्रेमी युगुलांना प्रेमाची स्फ़ुर्ती देणाऱ्या प्रेमपुजाऱ्याकडे आमच्या स्वतःवर असलेल्या गाढ प्रेमाला जपण्याकरता. काय झाले शंभर कीलोमिटर व्यासाचा आणखी एक व्रण उठवला तर? आधीचेच हजारो व्रण त्याच्या चेहऱ्यावर आहेतच! व्रण देऊन धुळीचे टन घेऊन उठला तो मेघ. आमच्या स्वतःवर असलेल्या गाढ प्रेमाचा संदेश तो आता तिथे पसरवेल. त्या अबोल प्रेमपुजाऱ्याला आमचे येवढेच सांगणे आहे, बाबारे, आमची तहान फ़ार मोठी आहे. तुझ्या अंतरंगात छुपवून ठेवलेला थोडासा ओलावा, तो तुला काय कामाचा? आम्ही तो घेऊन दुषीत करा

घर

लेखनविषय:
लेखनप्रकार
टप, टप, टप करत बाजुच्या खिडकिवरचे पावसाचे थेंब जुन्या आठवणींत ओढताहेत. परवा माझ्या नवीन फ्लॅट चा ताबा मिळनार, नवीन फ्लॅट बराच मोठा आणी मस्त सोसायटीत आहे म्हणुन घरचे सर्व जण खुष, आनंद आहे, पण काय माहीत माझ्या सध्याच्या घराला काय वाटत असावे! -------------- खर्रर खर्रर खच्च, घरासमोर ४०७ टेंपो येवुन थांबला, बोलल्याप्रमाणे आज घराचा ताबा घेण्यासाठी दशरथ आला होता.
Subscribe to राहणी