हॅलोवीन पंपकिन!
लेखनप्रकार
परवाच्या शुक्रवारी हापिसातून घरी आलो तो मुलगा धावत येऊन मिठी मारत म्हणाला " बाबा, आज हॅलोवीनचा पंपकिन कार्व करायचाय!"
हो हो म्हणत त्याला थोपवला. जेवणं वगैरे होईपर्यंत चिरंजिवांनी कसाबसा दम काढला.
हातांवर पाणी पडताच "मी टूलकिट काढतो!" म्हणत त्याची धाव क्लोजेटकडे गेलीच.
टूलकिट म्हणजे दोन वर्षाखाली भोपळा कोरायला आणलेली छोट्या हत्यारांची एक पुडी. त्यात दोन छोट्या करवती, भोपळा कोरून त्यातल्या बिया काढायला असलेला एक प्लॅस्टिकचा 'हात', एक टोचणी, एक प्लॅस्टिकचा दातेवाला मार्कर (करंज्या कातायची कातणी असते ना तसा - ह्याने भोपळ्यावर मार्किंग करता येते)
हा सगळा जामानिमा एका पुठ्ठ्याच्या शीटवर घेतला.
त्याच दिवशी त्याला शाळेतून मिळालेला एक छोटा भोपळा घेऊन स्वारी आली. गेल्या वर्षी आम्ही मार्केट बास्केट मधून मोठा भोपळा आणून कोरला होता, त्यामानाने हा अगदीच छोटा होता त्यामुळे कोरायला थोडा अवघड वाटत होता.
करवत घेऊन आधी भोपळ्याच्या देठाजवळची चकती कोरुन काढली आणि बाटलीचे टोपण काढावे तसा भोपळा वरुन उघडला.
मग मुलाने आतल्या बिया आणि थोडा गर कोरुन काढून भोपळा मोकळा केला.
भोपळा धुवून पुसून पुढल्या तयारीला सज्ज झला. स्केचपेनने डोळे, नाक, तोंडाच्या खुणा करुन घेतल्या. कातणी चालवून खुणा ठळक केल्या.
मुलालाच भोपळा कोरायचा होता त्यामुळे मी फक्त करवत खुपसून देणे आणि अधून मधून सूचना देणे ह्या व्यतिरिक्त काही करु शकलो नाही!
माझ्या अपेक्षेपेक्षा लेकाने चांगले कोरीवकाम केले. मग मी शेवटचा हात फिरवून थोडी साफसफाई उरकली.
भोपळ्याच्या डोक्यातून कधी एकदा आत पणती घालतोय आणि ती पेटवतोय असं होऊन गेलं होतं चिरंजिवांना.
पणती पेटवल्यावर तातडीनं सगळ्या खोल्यात अंधार करुन फोटो काढायला कॅमेरा घेऊन आलाही तो!
हे पहा फायनल प्रॉडक्ट!
विकट हसणार्या राक्षसाचा चेहरा बघून लेक मात्र कमालीचा आनंदी दिसत होता!
हॅप्पी हॅलोवीन!!
-चतुरंग

वाचने
5845
वाचनखूण
प्रतिक्रिया
30
:)
हिहाहाहा!!!
In reply to हिहाहाहा!!! by बिपिन कार्यकर्ते
लाकशशकाका,
In reply to लाकशशकाका, by ३_१४ विक्षिप्त अदिती
+१
In reply to +१ by मुक्तसुनीत
+२
अप्रतिम
लाक्कश....
मजा आहे एका मुलाची
In reply to मजा आहे एका मुलाची by धनंजय
--(स्मायली
वा!
In reply to वा! by चित्रा
मलाही
In reply to मलाही by रेवती
हाहाहा!!!
In reply to हाहाहा!!! by बिपिन कार्यकर्ते
अनावश्यक
In reply to अनावश्यक by श्रावण मोडक
हम्म्म!!!
In reply to हम्म्म!!! by बिपिन कार्यकर्ते
शेवटचे अवांतर
व्वा!
आमच्या
छान.
उत्तम
मस्त आहे कंदिल
चल रे भोपळ्या
अरे वा
सही रे
वा. मस्त
मस्त झालाय
छान!!!
वा सर्वच
मस्त
छान. ******************
रंगाशेठ