हॅलोवीन पंपकिन!
लेखनप्रकार
- Read more about हॅलोवीन पंपकिन!
- 30 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
परवाच्या शुक्रवारी हापिसातून घरी आलो तो मुलगा धावत येऊन मिठी मारत म्हणाला " बाबा, आज हॅलोवीनचा पंपकिन कार्व करायचाय!"
हो हो म्हणत त्याला थोपवला. जेवणं वगैरे होईपर्यंत चिरंजिवांनी कसाबसा दम काढला.
हातांवर पाणी पडताच "मी टूलकिट काढतो!" म्हणत त्याची धाव क्लोजेटकडे गेलीच.
टूलकिट म्हणजे दोन वर्षाखाली भोपळा कोरायला आणलेली छोट्या हत्यारांची एक पुडी.