Skip to main content

प्रवास

तुझे शहर

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 02/07/2019 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या नकळत तुझे शहर फिरून आलेय – डोळे न उघडता तुला पाहून आलेय रस्ते ओलांडताना तुझा हात धरला आहे – तुझा हात घामेजला आहे मंदिरातले कासव ओलांडले आहे – तुझ्या हातावर तीर्थ ठेवले आहे दर्ग्यातल्या जाळीतून डोकावले आहे – लोबानचा गंध दरवळत आहे मिठाईच्या दुकानात इमरती घेतली आहे – हात चिकट, तोंड गोड झाले आहे भर बाजारात चिक्कीच्या बांगड्या घेतल्या आहेत – तुझे डोळे चमकत आहेत रसवंतीत पांढऱ्या मिशीचा रस प्याले आहे – तुझा रुमाल पुढे, हसू मागे आहे त्या झाडाखाली क्षणभर थांबलो आहोत – तू सावली, मी नि:श्वास झालो आहोत लाचा घेताना मी गोंधळले आहे – तू म्हणतोस, रंग जाऊ दे, आठवणी राहू देत

' गोव्यातील गणेशोत्सव '

लेखक mukund sarnaik यांनी शुक्रवार, 03/05/2019 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
गोवा हे राज्य विवीध समृध्दतेने व हिरवाई ने नटलेले राज्य या राज्याची खासियत म्हणजे हिथले समुद्र किनारे.इथे विवीध जातीचे धर्माचे लोक एकत्र राहतात.त्याचबरोबर इथे सर्व सण संभारभ मोठ्या धुमधड्याक साजरे होत असतात.पण हिथे दिवाळी सारखाच मोठ्या धुमधड्याक सार्वजनिक तसेच घरोघरी वाड्यावाड्यावर साजरा केला जाणारा उत्सव म्हणजेच ' गणेशोत्सव '.

(दाराआडची आई)

लेखक चांदणे संदीप यांनी शुक्रवार, 05/04/2019 00:51 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा...अर्थातच एक आई दाराआडून बघते आहे बाहेर किती बाहेर? कॉलनीच्या बाहेर, ग्राऊंडच्या पार जिथे एक मुलगा खेळतो आहे मुग्ध.... करत असेल का तो तिचा काही विचार? येत असेल का तो ही खेळण्यातून बाहेर, ग्राऊंडच्या अलीकडे? आईला दाराआडून बाहेर यायचं नाही... मग ती वेताची काठी हळूच चाचपते, ती काठी पाठीत घेऊन मुलगा अविश्रांत कोकलत राहतो.... काठी सापडलेली आई सताड उघडलेल्या दाराआडून सुतत राहते... सुततच राहते.... -चमचमचांदन्या

पुणे ते शिडि प्रवास वणन

लेखक mukund sarnaik यांनी बुधवार, 16/01/2019 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
वर्ष २०१५ जानेवारी ०९ वेळ रात्री ११ वाजता भेटलो ते थंडीचे दिवस होते .व अचानक दुसर्‍या दिवशी शिर्डीला बाईक वर जायचे ठरले.त्यानुसार आम्ही सर्वजण ( ४ मित्र) १० तारखेला दुपारी १:३० मिनी.मोटारसायकलवर शिर्डीला जाण्यास सज्ज झालो व बांबांचे नाव घेऊन मोटारसायकल सुरु करुन आम्ही निघालो.जाताना रुबी हॉल (पुणे स्टेशन ) इथे नाष्टा करुन मग पुढे निघालो वाघोली नगर रोड मार्गे.मजल दर मजल करीत गप्पाटप्पा करित कधी आम्ही संध्या.५:०० ते ५:३० च्या सुमारास नगरमध्ये पोहचलो ते कळले पण नाही.मग नगरला चहापाण्यासाठी थांबुन आम्हीमग शनीशिगंणापुर मार्गे शिर्डीला जाण्याच नगरवरुन निघालो.शनीशिगंणापुरला संध्याकाळी ७:०० ते ७:३

रम्य ही स्वर्गाहून लंका

लेखक आशुतोष-म्हैसेकर यांनी सोमवार, 03/12/2018 03:07 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात एखादी गोष्ट पहिल्यांदा घडणार असेल तर त्याबद्दल आपण प्रचंड उत्साहित असतो. प्रथमच परदेश वारीचा योग आला की आपला उत्साह निराळाच. माझ्या नौकरीच्या निमित्ताने मला श्रीलंका दर्शनाची संधी मिळाली होती, त्याच उत्साहात सगळ्यांसारखा मी उत्साहात होतो. पहिल्यांदा विमानात बसणार ते पण थेट कोलंबोच्या म्हणून मी विमान उडण्याच्या आठवडा भर आधीच आकाशात जाऊन पोचलो होतो. श्रीलंका म्हणजे काय, भारताने टाकलेला पोलिओ ड्रोप म्हणून आपण भारतीय हिणवणार. ज्याची गणना आपण रावणाची लंका म्हणून करतो त्या देशाचे चित्र मनात रंगवताना अवघड जात होते.

मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग ४.

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 15/10/2018 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
यापूर्वीचे कथानक: मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग १,२,३ https://www.misalpav.com/node/43228 लोरेंझो जेरार्दिनीची रोजनिशी : किल्ल्याच्या दिशेने मी निघालो खरा, परंतु मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याला तोंड देत अंधारातील अनोळखी, निसरड्या पायवाटांवरून चालणे शक्य नव्हते.

निघताना....

लेखक शिव कन्या यांनी गुरुवार, 23/08/2018 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
मी हळूहळू पण निश्चितपणे पार दिसेनाशी होईन तेव्हा तू चौकट ओलांड, आणि निघताना..... आपल्या हसल्याबोलल्या आवाजांची फूले घेऊन ये आपल्यातल्या गहिवरांचे कढ, न हिंदकळता आण मी न ओलांडलेली अंतरे तू सहजच पार करुन ये माझे न उच्चारलेले नाव चारचौघांत सरळच घे सगळे उठून जातील तेव्हा आपल्यातल्या शब्दांची आरास मांड त्यानंतर आपोआप दिवा लागेल तुझ्या डोळ्यांतले पाणी विझेल मग मी मुक्त होऊन रेषा होईन तुझ्या तळहातांवर खोल रुतेन.. तू हळूहळू पण निश्चितपणे पार दिसेनासा होऊन माझ्याजवळ पोहचेपर्यंत... Shivkanya

स्वनातीत व्यापारी विमानप्रवास... पुन्हा सुरू होणार !

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी सोमवार, 28/05/2018 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
स्वनातीत (आवाजापेक्षा जास्त म्हणजे सुपर-सॉनिक वेगाने ) उडणारी विमाने ही काही नवीन गोष्ट अजिबात नाही. मात्र, लढाऊ विमानांच्या बाबतीत स्वनातीत वेग ही सामान्य गोष्ट असली तरी व्यापारी तत्त्वावर केल्या गेलेल्या स्वनातीत विमानसेवेच्या (commercial supersonic air-travel) मार्गात सतत मोठमोठे अडथळे येत राहिले आहेत. सर्वसामान्य माणसांच्या मनात तर स्वनातीत प्रवास केवळ एक स्वप्न म्हणूनच राहिला आहे. १९६९ ते २००३ या कालखंडात व्यापारी तत्त्वावर चाललेली पहिली वहिली स्वनातीत काँकॉर्ड विमानसेवा बंद पडून आता १५ वर्षे लोटली आहेत. त्या सेवेला सुरुवातीपासूनच अनेक प्रकारच्या समस्यांनी ग्रासले होते.

फुलांचा फोटो

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 11/05/2018 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
‘ती आज येईल, तेव्हा तिला सांगेन,’ मनोहर कॅमेऱ्याची लेन्स पुसता पुसता स्वतःशीच म्हणाला. ‘तिला कळत नसेल, असं नाही, पण तिच्या लक्षात आलं नसेल. आपल्यातरी कुठं लक्षात आलेलं आधी!?’ सोनेरी फ्रेममधून त्याने बाहेर नजर टाकली. पाचगणीचा table land सकाळच्या कोवळ्या उन्हात फार लोभस दिसत होता. आज या batchला घेऊन जायचं होतं. आधी या मैदानावरून एक चक्कर, मग दऱ्याखोऱ्यात , जंगलात .....निसर्गाची प्रत्येक फ्रेम सुंदर, कशाचेही फोटो काढा! .... अठरा मुलंमुली, वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या. आज तिसरा, उद्या शेवटचा दिवस. उद्या संध्याकाळी सगळे पांगतील. पुन्हा गाठ पडतील, न पडतील.... मनोहरला हे नवे नव्हते.

एस्टी कार्यशाळा भेट-चित्रफित

लेखक आलमगिर यांनी शनिवार, 21/04/2018 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
एस्टी कार्यशाळेच्या भेटीची व्हिडियोलिंक https://m.youtube.com/watch?v=VS4z2KLqPf0 लेखाची लिंक http://www.misalpav.com/node/42039 अल्प ओळीच्या धाग्यासाठी क्षमस्व आलमगिर (प्रणव जोशी)