Skip to main content

प्रवास

प्रवासात लागणार्‍या वस्तूंची यादी

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 21/12/2019 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
मागे मिपावर प्रथमोपचार पेटी - First Aid Box असा धागा काढला होता. त्याचा कितपत अन कुणाला उपयोग झाला ते माहीत नाही पण मराठीत असा शब्द शोधतांना किंवा मराठीत चर्चा करतांना याचा उपयोग झाला असावा. होते काय की कायप्पावर लिहीलेले कायमचे राहत नाही. म्हणून कुठेतरी कायमस्वरूपी असण्यासाठी मिपावर लेखन असावे असे वाटते. कायप्पावर झालेल्या चर्चेचा धागा व्हावा असे वाटत असल्याने येथे लिहीतो आहे. तर आपण नेहमी किंवा अधेमधे, सतत किंवा कधीकधी प्रवास करतो. तो प्रवास अगदी काही तासांपासून काही दिवसांपर्यंतचा असू शकतो.

Use Dipper at Night: हाय बीम लो बीम, अप्पर- डिप्पर बीम बाबत चर्चा

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 12/12/2019 19:01 या दिवशी प्रकाशित केले.
Use Dipper at Night: हाय बीम लो बीम, अप्पर- डिप्पर बीम बाबत चर्चा मिसळपाव.कॉम म्हणा किंवा शेजारचे मराठी सोशल फोरम म्हणा, त्यात महत्वाचे चर्चेचे विषय लिहीले जातात की जे समाजाला उपयोगी पडू शकतात. मागे वाहनांसंदर्भात हेल्मेटचा विषय आला असता, त्यातील विचार बरेच इतर ठिकाणी कॉपी केले होते. इतर ठिकाणी ज्यांनी वाचले ते त्यांच्या उपयोगी आले असेल तर आपल्या या सोशलीझमचा फायदाच म्हणायचा.

आणि आषाढी पावली...

लेखक महामाया यांनी गुरुवार, 10/10/2019 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
या वर्षी आषाढी एकादशीला मी नागपूरला होतो...रात्र सरता सरता आलेला अनुभव आषाढी पावल्याची पावती होता...तो इथे देत आहे... रवींद्र दत्तात्रय तेलंग काही प्रसंग आठवणीत घर करून जातात. 12 जुलैला आषाढ़ी एकादशी होती...उपासाचा दिवस...मी नागपुरहून शिवनाथ एक्सप्रेसनी बिलासपुरला परत येत होतो. त्रिमूर्तिनगरहून आम्ही रात्री 11 वाजता निघालो...गाडी 11.55 ची होती. इतवारी स्टेशनावर पार्किंगला ही गर्दी...स्टेशनाच्या दारापर्यंत पोचायला वीस मिनिटे लागली. कोच नंबर होता एस-9. बर्थ 65, 68. दाेन्ही लोअर बर्थ होत्या.

वयास माझ्या पैंजण घालित....

लेखक शिव कन्या यांनी गुरुवार, 05/09/2019 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
शुभ्र रुपेरी हव्यात लाटा बटाबटांच्या डोक्यावरती नकोच तेव्हा काळीकुरळी बट डोळ्यावर सळसळणारी शेलाटीशी रेघ वक्रशी हातावरती उमटून जावी टिचकी मारून गिरकी घेता झोका माझा खाली यावा डोळ्यांवरती जरा खालती ग्रहण हवे मज चंद्राचे त्या ग्रहणाला मोक्ष नसावा, केवळ अनुभव साक्ष असावा नाजुक साजुक पेरांवरती खोडावरचे रिंगण यावे साल कोवळी मधुमासाची गंध फुलांचा उडून जावा पोटामधले उदंड पाणी खळखळ अवघी डोळ्यांमधली एक मोजता दुजी उठावी लाट बोलकी मिटून जावी पाठीवरच्या पानावरचा रंग केशरी विराट व्हावा त्यावर हलते माळ मण्यांची ताठ कण्याची पाठ रहावी हळुच यावे जरा बसावे आस्ते आस्ते कवेत घ्यावे वयास माझ्या

शोक कुणाला? खंत कुणाला?

लेखक शिव कन्या यांनी रविवार, 25/08/2019 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
हरिण शावक हत्ती चित्ते, सळसळ धावे नाग सर्पिणी धडधड धडधड रान पेटते...... शोक कुणाला? खंत कुणाला? चोची माना तुटल्या ताना,भकभक काळे पंखही जळती लपलप लपलप ज्वाला उठती...... शोक कुणाला?खंत कुणाला? पिंपळ कातळ खोड पुरातन, चट्चट् जळते गवत कोवळे भडभड भडभड पाने रडती.... शोक कुणाला? खंत कुणाला? पिले पाखरे भकास डोळे, हा हा करती समूह भाबडे चरचर चरचर डोळे झरती...... शोक कुणाला? खंत कुणाला? कुणी लावली कशी लागली, आग शेवटी जाळ काढते करकर करकर शाप जीवांचे, थरथर.... इथवर ऐकू येते..... -शिवकन्या

त्सो मोरिरी : एक समृद्ध अनुभव

लेखक हर्मायनी यांनी गुरुवार, 15/08/2019 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या वर्षी २५ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या काळात लेह लडाखला जाण्याचा योग आला. या अविस्मरणीय ट्रिप बद्दल सविस्तर लिहिण्याचा विचार आहे पण तूर्तास एक अशी घटना जी मनात कायम कोरलेली राहील.. शीत वाळवंट असलेल्या लडाखचे निसर्ग सौन्दर्य एकदम वेगळेच.. आधी कधीच न पाहिलेले.. राखाडी आणि तपकिरी रंगाच्या छटा बघताना निसर्गाच्या पॅलेट मधला मधला हिरवा रंग हरवलेलासा वाटला. एक प्रकारची गूढ शांतता, ठिकठिकाणी रचलेले दगडांचे मनोरे आणि बौद्ध धर्माचे मंत्र वाऱ्याद्वारे आसमंतात पसरवणाऱ्या रंगीत पताका संपूर्ण प्रवासात साथ देत राहिल्या.

पावसाळ्यातील एक प्रवास!

लेखक लई भारी यांनी मंगळवार, 06/08/2019 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यात काही महत्वाच्या कारणांमुळे भर पावसात मुंबई-पुणे-निपाणी आणि परत पुणे असा प्रवास करावा लागला. त्या दरम्यान आलेले काही अनुभव लिहावे म्हटलं! तस म्हटलं तर खूप काही वेगळं, थरारक नाही पण माझ्यासाठी तरी बऱ्याच गोष्टी कायम लक्षात राहतील अशा होत्या. मुंबई मध्ये पाऊस वाढू लागला आणि शनिवारी दुपारी मी पुण्यासाठी बसने निघालो. प्रचंड पाऊस अपेक्षित असल्यामुळे रस्त्यावर तुलनेने गर्दी कमी होती, पण एकंदरीत पावसामुळे वेळ लागलाच. एका बोगद्यात आम्ही पोचायच्या आधी एक कार पलटी झालेली बघितली आणि धस्स झालं! घाटामधून दिसणारे धबधबे बघत ४ तासात पोचलो.

आमची धमाल मसुरी - ऋषिकेश सहल!

लेखक समीरसूर यांनी बुधवार, 24/07/2019 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
आमचा दहा जणांचा गृप. त्यापैकी आठ जण (किरण, दीपक, सचिन, धनंजय, आनंद, केदार, संतोष, आणि मी) एकाच अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियंते झाले. अस्मादिक त्या आठपैकी एक. राहिलेले दोन जण (गजानन, संजय) नंतर मित्र झाले. अगदी जवळचे! आजदेखील आमचा हा गृप अभेद्य आणि अखंड आहे. काही "सामायिक सद्गुणांच्या आणि आवडींच्या" भक्कम पायावर ही मैत्री गेली २३ वर्षे टिकून आहे. नुसती टिकलेलीच नाही तर बहरलेलीदेखील आहे आणि चविष्ट लोणच्याप्रमाणे मुरलेलीदेखील आहे. इतकी मुरलेली आहे की कुणी नुसतं "कधी?" असं विचारलं की बाकीच्या सगळ्यांना लगेच अचूक संदर्भ लागतो.