Skip to main content

पुणे ते शिडि प्रवास वणन

पुणे ते शिडि प्रवास वणन

Published on बुधवार, 16/01/2019 प्रकाशित मुखपृष्ठ
वर्ष २०१५ जानेवारी ०९ वेळ रात्री ११ वाजता भेटलो ते थंडीचे दिवस होते .व अचानक दुसर्‍या दिवशी शिर्डीला बाईक वर जायचे ठरले.त्यानुसार आम्ही सर्वजण ( ४ मित्र) १० तारखेला दुपारी १:३० मिनी.मोटारसायकलवर शिर्डीला जाण्यास सज्ज झालो व बांबांचे नाव घेऊन मोटारसायकल सुरु करुन आम्ही निघालो.जाताना रुबी हॉल (पुणे स्टेशन ) इथे नाष्टा करुन मग पुढे निघालो वाघोली नगर रोड मार्गे.मजल दर मजल करीत गप्पाटप्पा करित कधी आम्ही संध्या.५:०० ते ५:३० च्या सुमारास नगरमध्ये पोहचलो ते कळले पण नाही.मग नगरला चहापाण्यासाठी थांबुन आम्हीमग शनीशिगंणापुर मार्गे शिर्डीला जाण्याच नगरवरुन निघालो.शनीशिगंणापुरला संध्याकाळी ७:०० ते ७:३० च्या दरम्यान पोहचलो.पोहचल्यावर (स्वागत कमानी पासुनच ) एक आश्चर्य ते म्हणजे तेथील घरांना किंवा दुकांनाना दारे नाहीत म्हणजे ति उघडी असतात.रात्रंदिवस आम्ही याआधी नुसते ऐकले होते पण आज ते प्रत्यक्षात अनुभवले.त्यानंतर आम्ही एक पुजासाहित्य दुकानात पुजा साहित्य घेऊन मोटारसायकल दुकानासमोर लावुन शनीमहाराजांच्या दर्शनाला निघालो.मंदिरात पाऊल ठेवताच मन प्रसन्न होऊ लागले होते तिथले वातावर बघुन.मग आम्ही जे शनिमहाराजांना वाहला नारळ घेतले होते ते आम्ही तेथील नारळ ठेवण्याच्या जागी ठेवले.( नारळ फोडु दिले जात नाहीत) व जे तेल घेतले होते ते तिथे ठेवलेल्या कुंडात टाकले.व एक सोय अशी आहे की तुम्ही त्या कुंडात टाकलेले तेल बरोबर नळीने शनीमहाराजांच्या डोक्यावर पडते अभिषेक होतो.कारण तुम्हाला प्रत्यक्ष शनीमहाराजांच्या चौथर्‍यावर जाता येत नाही म्हणुन ही सोय.शनिमहाराजांचे दर्शन घेतल्यावर अगदी मन प्रसन्न झाले.तिथल्या दुकानदाराला विचारले की तुम्हाला भिती नाही वाटत तुम्ही दुकाने घर उघडी ठेवाता.तेव्हा तो म्हणाला की आम्ही घाबरत नाही कारण इथे शनी महाराज आहेत ना.मग तिथुन प्रसाद म्हणुन खुप सुंदर लागणारी खोबरा वडी घेऊन गाडिला किक मारुन शिर्डीला जाण्यास निघालो साधारण ८ च्या सुमारास रात्री.मग गप्पा टप्पा करित कधी रस्ता चुकलो शिर्डीचा ते कळलेच नाही.मग एका पेट्रोलपंपावर पेट्रोल भरायला थांबल्यावर कळले की आम्ही खुप लांब आलो आहे.म्हणजे त्या पेट्रोलपंपापासुन नगर फक्त ३० मिनींटावर होते.व शिर्डी अजुन खुप लांब होती(अंदाजे २ तासांवर) मग त्या पेट्रोलपंपावर मार्ग विचारुन आम्ही निघालो शिर्डीला.(पेट्रोल संपले म्हणुन आम्हाला मार्ग विचारता आला नाही तर आम्ही पुन्हा नगर ला आलो असतो.पण बाबांची लिला अगाद आहे) पण ज्या रोडवरुन निघालो होतो.तो रोड अगदी निरमनुष्य कारण त्या रोडवर दोन्ही बाजुला मोठमोठाली झाडे,शेती व व कमीत कमी जाणारी वाहने.थोडे त्या रोडवरुन पुढे घेल्याबर एका ठिकाणी हातचरक्यावर उसाचा रसगृह व काही लोक थंडीमुळे शेकोटीजवळ बसलेले दिसले.आम्ही तिथे रस पिण्यासाठी थांबलो व रसाचे ग्लास हातात घेऊन त्या शेकोटी जवळ उबेसाठी थांबलो असता त्या लोकंनी विचारले की तुम्ही कुठून आलात कुठे चालला आहात या थंडीच्या वातावरणात मोटासायकलवर.तर आम्ही सांगितले की शनीशिगंणापुरवरुन आलो आहे व शिर्डीला चाललो आहे बाबांच्या दर्शनाला.तेव्हा ते म्हणाले की तुम्ही शनीशिगंणापुरला निवास करायचा होता व सकाळी निघुन जायचे होते शिर्डीला.आम्ही विचारले की असे का म्हणत आहात तर ते म्हणाले की तुम्ही आला आहात तो रोड व तुम्ही जाणार आहात तो रोड अगदी निर्मनुष्य आहे.त्यारोडवर वाहने पण कमी जातात रात्रीच्यावेळी कारण त्यारोडवर लुटमारीचे प्रकार जास्ती होतात.पण आता आलास आहात तर लवकर निघा टाईमपास करत बसु नका.मग आम्ही त्यांचा निरोप घेऊन बाबांचे जाव घेऊन पुढे मार्गस्थ झालो.शेवटी तो निर्मनुष्य रस्ता सोडुन जेव्हा मुख्य रस्त्याला आलो तेव्हा बरे वाटले व मग जेव्हा आम्हाला शिर्डी नावाची पाटी दिसली तेव्हा खुपच आनंद झाला कारण आम्ही तेव्हा साईबाबांच्या नगरीत होतो.पण बाबांच्या कृप्रेने त्या निर्मनुष्य रस्त्यावर आम्हाला काही पण झाले नाही व सुखरुप रात्री १० वाजता शिर्डीनगरात पोहचलो.मग सुरु झाले निवास व्यवस्था शोधणे.भक्तनिवासात चौकशी केली तर तीपण फुल होती.मग एका मित्राला आठवले की त्याचा एक मित्र त्यांचे पुजा साहित्य दुकान तिथे आहे.मग काय त्याला फोन लावुन त्याला आमची निवासाची अडचण सांगीतली व त्याने ती सुटकीसरशी सोडवली.त्याच्या अोळखीने आम्हाला एका हॉटेलात एका रात्री पुरती रुम मिळाली. त्या रुमवर बॅगाटाकुन आम्ही मोर्चा खाण्याकडे वळवला होता कारण रस्ता चुकल्यामुळे व वाटेत जास्ती हॉटेल नसल्यामुळे पोटात कावळे अोरडायला लागले होते.मग पोटपुजा करुन रुमवर झोपायला गेलो कारण सकाळी ५:०० वाजता उठुन बाबांच्या दर्शनाला जायचे होते.म्हणतात ना ' ' ' ' याससाठी केला होता अठ्ठाहास '. पण आम्हाला रुमसुध्दा अगदी मंदिराजवळच मिळाली होती तेथुन शेजारती काकड आरती सर्व कार्यक्रम स्पष्ट ऐकु येत होते.आम्ही सर्व जण खुप दमल्यामुळे कधी निद्रेच्या आहारी गेलो कळलेच नाही.पहाटे लवकर उठुन सर्व क्रियाक्रमे उरकुन एकदाचे आम्ही ज्यांच्यादर्शनासाठी आलो होतो त्या बाबांच्या दर्शनासाठी रांगेत पहाटे ५:३० उभे रायलो.साईनामाचा जप करीत कधी आम्ही बाबांच्या समाधी पुढे आलो ते कळलेच नाही.रांगेत असताना सुध्दा बाबांच्या नावाचा गजर व बाहेर सुध्दा पुजा साहित्य बाजारात पण सीडीवर बाबांच्यानावाचा गजर ' साईराम साई श्याम साई भगवान ' ही धुन ऐकु येत होती. त्यामुळे पुर्ण शिर्डीच साईमय झाली होती.मग रांगेत असताना आम्हाला संस्थानतर्फे बुंदीचा प्रसाद देण्यात आला होता.समाधीपुडे आल्यावर आम्ही नतमस्तक झालो तेव्हा खरच जीवन धन्य झाल्यासारखे वाटले.कारण कालपासुन मोटारसायकलवर मार्ग चुकून सुध्दा ज्यांनी आम्हाला दर्शनाचा मार्ग दाखवला त्यांचेच दर्शन घेताना धन्य वाटत होते.समाधीचे दर्शन घेऊन नंतर द्वारकामाई ,चावडी (जिथे बाबा बसुन भक्ताच्या शंकाचे निरसन करत )गुरुस्थान दर्शन करुन संग्रहालयात घेलो जिथे बाबांनी वापरलेल्या वस्तु जतन करुन ठेवल्या आहेत.उदा.बाबांची कफनी,ज्यात बाबा भक्तांसाठी खिचडी बनवायचे ते पातले.ई.आम्ही मंदिरातुन निघुन मग नाष्टा मिळतो तिथे आलो.संस्थानतर्फे अल्प दरात भाविकांसाठी चहा नाष्टा व्यवस्था आहे तिथे पुरी मटकीची उसळ व खोबरा वडी अशी नाष्टा व्यवस्था असते.व तो नाष्टा पोटभर झाल्यामुळे दिवसभर भुकच लागली नाही.सर्व दर्शन वैगेरे करुन प्रसाद घेऊन व ज्या मित्राने आम्हाला शिर्डीत मदत केली त्याची भेट घेऊन पुण्याच्या दिशेने प्रस्थान केले.व जाताना पुन्हा बाबांच्या समाधी मंदिरावरील कळसाचे दर्शन घेतले.करतर मनाची अवस्था अशी झाली होती की येथुन निघुच नये.इथच बाबांच्या सानिध्यातच रहावे.पण कायकरणार निघावे तर लागणारच होते.मग आम्ही राहुरी मार्गे पुण्याला येण्यास निघालो.येताना नगरचा सुप्रसिध्द खवा व चिवडा घेऊन आल्याशिवाय राहवलेच नाही.येताना वाटेत असे कळले की शिरुरपासुन काही अंतरावर घोडनदी तिरी एक पुरातन रामलिंग महादेवाचे स्वयंभु मंदिर आहे.मग वाट वाकडी करुन तिथे भेट देयला स्वारी निघाली.शांत वातावरण मन अगदी प्रसन्न होते दर्शन घेतल्यावर.गोंगाट नाही की कसला गोंधळ नाही एकदम शांत वातावरण होते मंदिरात.तेथुन दर्शन झाल्यावर पावळे वळाली ती म्हणजे पुणे नगर रस्त्यावर असलेल्या रांजणगावातील महागणपतीचे दर्शन घेयला.आम्ही पोचलो ते महागणपतीच्या मंदिरात एकदम शांत वातावरण गर्दी कमी.त्यामुळे निवांत व मस्त दर्शन झाले.प्रसन्न मंगलमुर्तीचे देखणे स्वरुप पाहुन भान हरपुन गेले होते.कारण संकटनिवारण करणार्‍या गणेशामुळेच पुर्ण शिर्डी शनीशिंगणापुर सहल कोणत्याही संकटाशिवाय पुर्ण करुन गणेश दर्शनाला आलो होतो.गणेश मंदिरात थोड्यावेळ नामजप करुन कळसाचे दर्शन घेवुन कोणतेही संकट पुण्यापर्यंत परत जाताना येऊ नये व तुझी नामरुपीसेवा घडत रहो हिच विनंती गणेशचरणी करुन आम्ही सर्वजण परत निघालो.व सुखरुप बाबांच्या ,गणेशाच्या , शनीदेवाच्या कृपेने कोणतेही विघ्न न येता रात्री ८ वाजेपर्यंत मनात सर्व आठवणी साठवत पुण्यात परत आलो. कारण बाबांनी सांगितले आहेस की ' तु निश्चींत जा मी पाठीशी आहे '© S.Mukund
लेखनप्रकार

याद्या 18775
प्रतिक्रिया 49

In reply to by mukund sarnaik

बर्‍याच जागी चुकले आहे. एक वानगीदाखल देतो.
बांबांचे नाव घेऊन मोटारसायकल सुरु करुन
या वाक्यात" बाबांचे" शब्दात अनुस्वार चुकीच्या जागी पडला आहे. व्याकरणाच्या तर भरपुर चुका आहेत. एक विचारतो. : तुम्ही अमराठी आहात का?

In reply to by mukund sarnaik

मग असे मुद्दाम चुकीचे का लिहीत आहात....पहिली दुसरीतली मुले करतात तश्या शुद्धलेखनाच्या चुका आहेत

In reply to by mukund sarnaik

मग मराठी मी हा शब्द मि असा लिहीत नाहीत , मराठि हा शब्द मराठी असा लिहीला जातो हे साधे कसे लक्षात येत नाही. तुमच्या सगळ्या वेलांट्या र्‍हस्व च का आहेत?

In reply to by विजुभाऊ

विजुभौ त्यांनी मराठीतील तत्सम इ-कारान्त आणि उ-कारान्त शब्द दीर्घान्त लिहावेत या नियमाला विरोध म्हणुन सर्व शब्द र्‍हस्व लिहिले असावेत असे वाटते. तुमचं त्याबद्दल काय मत आहे. बाप रे, आज मिपा संस्थापक तात्यासेठ मिपावर असते तर त्यांनी आपल्याला बॅन केलं असतं. -दिलीप बिरुटे

In reply to by mukund sarnaik

मी पण मराठीच आहे. आपण जवळ जवळ ९९.९९ टक्के लोक मराठी असतो पण इंग्रजी बोलतो हे चूक आहे. आपण सर्वांनी जमेल तसं मराठीत लिहितं राहिलं पाहिजे. -दिलीप बिरुटे (आपला झी मराठी)

In reply to by mukund sarnaik

एक, आधी ते शनीशिगंणापुर असे नसून, शनिशिंगणापूर असे आहे. दोन, लिहिल्यानंतर आपण स्वतः वाचूनही पाहावे हा प्रेमळ सल्ला! पटला तर घ्या नाहीतर…
Sandy

In reply to by चांदणे संदीप

संदीप भौ. ते बहुतेक जाणून बुजून लिहीत असावेत. मोकलाया दाही दिशा चे रेकॉर्ड तोडायचे असेल त्याना

In reply to by विजुभाऊ

विजुभौ, सही ओळखलं. आपल्याकडे पण अशा लै आयड्या आहेत. उद्या झलक दाखवतो. -दिलीप बिरुटे

In reply to by mukund sarnaik

सर्वप्रथम शिर्षकातच चुका आहेत... पुणे ते शिडि प्रवास वणन हे “पुणे ते शिर्डी प्रवास वर्णन” असे असायला पाहीजे होते. कृपया साहीत्य संपादकांशी संपर्क करून ह्या चुका दुरूस्त करून घ्या.

In reply to by mukund sarnaik

शुध्दलेखन कुठे चुकले सांगाल का मला पुणे ते शिडि प्रवास वणन ह्या लेखाच्या शीर्षकापासूनच सुरुवात करा. :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मिपाच्या मध्यंतरीच्या "जाणीवपूर्वक प्रयत्न करुन अशुद्धलेखन" काळात हा लेख आला असता तर धुरीण लेखाला आणि लेखकाला डोक्यावर घेऊन नाचले असते. अंमळ सात वर्षे उशीरा आला आहे. वाचकांची पत्रेवाला नाखु

In reply to by mukund sarnaik

शुद्धलेखन वगैरे या सर्व अंधश्रद्धा आहेत. तुम्ही लिहिलं आम्हाला पोहचलं यात सर्व आलं. तुम्ही काय कोणाचं मनावर नका घेऊ. लिहित राहा. शुद्धलेखन नियम सहज म्हणुन इथे बघा. -दिलीप बिरुटॅ

पहाटे लवकर उठुन सर्व क्रियाक्रमे उरकुन हा हा हा .... नक्की दर्शनाला गेला होता कि कोणाला पोचवायला

एक सुचवू का? आम्ही चुका काढण्यापेक्षा तुम्हीच एकदा त्याचे अभिवाचन करा.. आणि तरी पण नाही कळलं तर 9वी चा निबंधलेखनाचा एक कोर्स करा

In reply to by आनन्दा

+१ बाकी काही नाही...रसभंग होतो हो वाचताना. वेलांटी वा उकार पहिला कि दुसरा ह्याला तेवढं महत्व नाही पण निदान शब्द तरी बोध होण्या ईतपत असावेत ही अपेक्षा!

भिमाशंकर-व्हाया शिडी घाट, या नावाचे ट्रेकवॄतांत येतात तसेच "पुणे-व्हाया शिडी" असे काहीतरी प्रवासवर्णन असेल असे शिर्षकावरुन वाटले. :)

लिहण्याची सवय नसेल तर चुका होतात .पण मानवी मेंदूला जी शक्ती प्राप्त आहे त्या शक्तीला फक्त पुढचा आणि शेवटचा शब्द काय आहे हे माहीत पडलं की पूर्ण वाक्य काय असेल हे ओळखायला त्रास होत नाही मातृभाषेत लिखाण असेल तर

In reply to by Rajesh188

हे रोमन लिपीसाठी शक्य होते. असे सरसकट विधान करू नका. मराठी सारख्या अक्षर म्हणजे उच्चाराचे चित्र असणार्‍या लिपीसाठी एखाद्या वेलांटी पात्रेनेही अर्थ बदलतात उदा : दिन आणि दीन , पाट आणि पाठ , अनेकाक्षरी शब्द घ्यायचे झाल्यास महाराज्याभिषेक आणि महापातकनाशक. वेदनादायक , वेदनाशामक वेलांटी उकारात बदल झाल्यास काहीकाही शब्द तर अनर्थ करतात. उदा : टिकाऊ/ टाकावू , मादक / मोदक वादातीत / वादग्रस्त वगैरे.

No Comment .

"लेखावरच्या प्रतिसादांच्या संखेवरून लेखाची पात्रता ठरते", असा (गोड गैर-)समज असल्यास, तुमचा हेतू पूर्णत्वाला जाऊ लागला आहे. :)

मुकुंद सरनाईक साहेब, मिपाकर दुत्त दुत्त आहेत, नवीन मान्साला धिर द्यायचे सोडून लेकब्नानाचि भीती घालत्यात, तुम्ही अजिव्बात हताश होउ नका, अजुन शेगाव, अक्क्लकोट, गाणगापुर, नरसिंहवाडी, आळंदी अशी मायंदाळ ठीकान पदली आहेत, लगेच तिकडे विजीट करुन इथे धागा टाका पुडिल लेकनासाटि पुस्पगुच्च !

बाबांच्या कृप्रेने त्या निर्मनुष्य रस्त्यावर आम्हाला काही पण झाले नाही. मग रस्ता चुकले तेव्हा बाबाची अवक्रुपा झाली होती काय ? पण बाबांची लिला अगाद आहे, त्याच लिलेचा वापर करुन गाडीत पेट्रोल भरता आले नसते काय ? बाबांनी सांगितले आहेस की ' तु निश्चींत जा मी पाठीशी आहे '© प्रवासाच्या सुरवातीलाच बाबाने सांगितले असते की," तु निश्चिंत ये,मी पाठीशी आहे" तर कोणतेही संकट आलेच नसते ना ? चला, अजुन तरी भारतात बाबा-बुवांची चलती अशीच राहणार असे दिसते.

मुकुंदसेठ, तुमचा अनुभव वाचून मलाही माझा अनुभव लिहावा वाटतोय. बाबांनी बुद्धी दिली तर उद्या माझाही प्रवास अनुभव लिहितो. तुमचा फोटो टाका ना प्लिज. -दिलीप बिरुटे

मिपावर एक तै होत्या. कुठून तरी शिर्डीला पदयात्रा काढायच्या त्यांचे अनुभव मला खूप आवडायचे. हल्ली कुठेयत काय माहिती नै. पण....आवडायचं त्यांच वेड मला. -दिलीप बिरुटे

बरं ते शुद्धलेखन बिद्धलेखन जाऊ द्या, हे सांगा तुम्ही गाडी कुठली नेली होती? त्यात इंजिन ऑईल कुठलं टाकता? हायवेला किती average मिळतं,

In reply to by स्थितप्रज्ञ

मलाही हेच प्रश्न पडलेत. -दिलीप बिरुटे

ओ हे असे विच्रायचं नस्तय. अध्यात्माच्या गाडीला भक्तीचे इंधन. आत्म्याला नसते अ‍ॅवरेजचे बंधन.