मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मैत्री

navinavakhi · · जे न देखे रवी...
काव्यरस
खळखळणारे पाणी भिडे कातळाला सांगे गुज मनीचे त्या स्थितप्रज्ञाला तोही मग हलकेच घेई कवेत त्याला पाणीही मग सरसावे आलिंगनाला हळुवार बोलणे त्यांचे वाटे खळाळता झरा शुभ्र लाटाही मग उठाती त्यांच्या साथीला चाले संवाद त्यांचा क्षणोक्षणी, दर एक ऋतूत निसर्गही मग देई दाद त्यांच्या मैत्रीला

वाचने 1467 वाचनखूण प्रतिक्रिया 5

सुहास झेले 23/11/2011 - 12:07
सुंदर... एक विनंती - कविता/लेख पोस्ट करताना मध्ये दोन - चार दिवसांचे अंतर ठेवले तर बर् होईल....नाहीतर बाकी धागे दुर्लक्षित होतात. धन्यवाद :)

पियुशा 23/11/2011 - 17:01
अर्र............ ताई ,माई, अक्का जरा उसन्त द्या की १-२ दिवसाची ! सगळ एक साथ ,कमाल आहे ब्वॉ तुमची ;) कविता छान :)

प्रभाकर पेठकर 23/11/2011 - 19:26
हया प्रेमकाव्य, कविता, शृंगार प्रकारात प्रकाशित झालेल्या कवितेत लग्ना आधीच निसर्गही मग देई दाद त्यांच्या मैत्रीला म्हणजे परिस्थिती फार बिकट होऊन जाईल की.

विदेश 24/11/2011 - 08:56
कवितेतील हलकं प्रेम आणि हळुवार शृंगार आवडला.