मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(भाव(खावू)गीत):फेसबुकमुळे

पाषाणभेद · · जे न देखे रवी...
काव्यरस
(भाव(खावू)गीत):फेसबुकमुळे
तो: जग हे आभासी कोणा न कळे ती: (हो रे, ते खरे, पण) तु अन मी जवळी आलो फेसबूकमुळे ||धृ|| तो: तुझा आयडी होता आयडी हा खरा ती: तुझ्याच आयडीमुळे तुला शोधीला मी बरा तो: होताच लॉगलाईन तेथे प्रित आपली जुळे ||१|| तो: आठव पोस्टला माझ्या केलेस तू लाईक ती: त्यानंतर आपण कितीक फिरवीली बाईक तो: फोटो तुझा आता डिलीट करून टाक गडे ||२|| ती: नकोच फेक आयडी आता नवे नवे ते करणे तो: नकोच तसलेच फोटो पाहून उगाचच झुरणे ती: दोन आयडी नको आता एकच आयडी पुरे ||३|| ती: होईल रे आता स्टेटस अपडेट एकदा तो: नकोच खोटी स्तूती करा सदा सर्वदा ती: कमेंट देण्यासही वेळ आता न मिळे ||४|| - पाषाणभेद

वाचने 1644 वाचनखूण प्रतिक्रिया 3

आत्मशून्य 29/11/2011 - 07:39
.

नरेश_ 29/11/2011 - 10:01
उगाचच नवी म्हण आठवली - गावान इचारीना कालं कुतरं आन फेस्बुकाव हाजार मित्र !!