Skip to main content

प्रेमकाव्य

आज हलके वाटले तर

लेखक कहर यांनी मंगळवार, 17/07/2018 या दिवशी प्रकाशित केले.
आज हलके वाटले तर चांदण्या तोलून धर बोल.. पण नयनातुनी उघडू नको देऊ अधर उजळुनी हे विश्व अवघे सावरिशी का पदर होऊ दे गलका उसासा मोकळे कर मूक स्वर जीव घे हासून हलके ओठ हेच धनु नि शर ने कुशीतून कालडोही गुदमरूदे रात्रभर बरस आता अंतरातुनी हो पुरी सारी कसर व्यापूनिया ये तमासम गात्र गात्र नि शांत कर चांदण्या तोलून धर

असाव कोणीतरी

लेखक तृप्ति २३ यांनी रविवार, 08/07/2018 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात कोणाची तरी साथ असणं खूप गरजेचं असत म्हणून कोणीतरी आपल्यासोबत कायम असाव त्याच वर्णन मी या कवितेत केल आहे. तुम्हाला ही कविता कशी वाटली हे तुम्ही कंमेंट ने कळवू शकता. https://www.truptiskavita.com

पहिली नजर

लेखक शब्दानुज यांनी शुक्रवार, 29/06/2018 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्या नजरेतच घातली ही मोहनी माझ्या ह्दयाची तू तर स्वामिनी काय माहिती काय ,काय पुढे होईल पण हा क्षण मिळून , साजरा होइल मी तर इथे , तू ही इथे माझ्या मिठीत ये , ये ना... हे प्रियसी , हे उर्वशी माझ्या मिठीत ये , विसरूनी सारे.. हरएक प्रार्थनेत तुझे प्रेम असे तुजविण ते क्षण माझे , व्यर्थ भासे तुझीच आस मज हदयास असे तुझपासुनी शांतीही , तुझपासुनी प्रितीही.. ज्या दिवशी गवसलीस मजला माझा जीव तो कुठे हरपला हे प्रियसी , हे उर्वशी माझ्या मिठीत ये , विसरूनी सारे हे प्रियसी , हे उर्वशी माझ्या मिठीत ये , ये ना.. वेडापिसा झालो मी ह्या वेदनेने हिसकावले स्वास्थ ह्या प्रेमभावनेने तडफडे प्राण माझे तुझ्
काव्यरस

वाया गेलेली कविता

लेखक कहर यांनी गुरुवार, 28/06/2018 या दिवशी प्रकाशित केले.
प्रहर चालला तो दुपारचा त्यातून घन आलेले दाटून दमट जराशी हवा पसरली लपाछपी खेळतसे ऊन दूर कुठे तो बसून रावा घालीत होता किर किर शीळ उदास होते आयुष्य झाले सरता सरेना आजची वेळ अशाच वेळी बसून एकटा हळूच असे तो निरखत तिजला एक भेंडोळे एक लेखणी होता हाती घेऊन बसला काही अंतरावर ती होती घागर बुडवीत पाण्यामध्ये रेखीव काया लवचिक बांधा वर्ण गोमटा कपडे साधे तिला ना होती जाणीव त्याची गुणगुणतसे आपल्या तंद्रीत आडोशास तो बसला होता काही खोडीत काही लिहीत घागर भरुनी ती निघताना याची लेखणी थांबे पुरी शीळ घालुनी तिज तो बोले तुजवर लिहिले हे वाच सुंदरी निघे गुलाब मग खिशातुनी जशी ती एकेक ओळ वाचता जरा थांबुनी मग ती वद

प्रकाश

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी शनिवार, 23/06/2018 या दिवशी प्रकाशित केले.
त्या हातांचे मेहंदीभरले तळवे तळव्यांमध्ये दिवा दिव्यात तेल तेलावर वात वातीचा प्रकाश अन् प्रकाश थेट चेहर्‍यावर . . . प्रकाशाचा वेगच अफाट |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२२/०६/२०१८)

तुझे डोळे

लेखक कौस्तुभ आपटे यांनी गुरुवार, 07/06/2018 या दिवशी प्रकाशित केले.
सागर पिंजुन रत्न बिलोरी असतील आणले अन जीवनाचे सार ओतुनी भरले चांदणे घडवूनी क्षणभर देव असावा अचंबित ज्यांपूढे तुझे डोळे ...तुझे डोळे ... हे असे ...तुझे डोळे ॥धृ॥ मुग्धता कधी सुमनांची, चारुता कधी चंद्राचि, नयनातुन ती सांडते. गुढता गहन कोड्याची, कल्पना नव्या कवीतेची, नजरेतुन ती मांडते. या तुझ्या लोचनी, खोल गेलो किती, तरीही त्रुप्ती मना ना मिळे. बाळ तान्हे कुणी, मधुरसे हासुनी, जैसे लळा लावते गोजीरे गोजीरे.. तुझे डोळे ..तुझे डोळे ...

तुला साथ हवीय ना माझी ?

लेखक पथिक यांनी सोमवार, 04/06/2018 या दिवशी प्रकाशित केले.
तुला साथ हवीय ना माझी ? मन पाचोळा होवून पसरलंय रानोमाळ धूळ होऊन विखुरलंय चहुदिशा आण ते गोळा करून... नाही जमत ना ? मग शक्य असेल तर तुही हो सैरभैर मग भेटत जाऊ असेच अचानक कधीतरी अनवट वाटांनी

आठवणींचा पाऊस..!!

लेखक विशुमित यांनी गुरुवार, 17/05/2018 या दिवशी प्रकाशित केले.
तू जवळ पाहिजे होतीस ढग आज गरजला होता पाऊस तुला आवडतो हे तो उमजला होता -- बिनधास्त तुझ्यासारखा असा काही तो कोसळतो तू नव्हतीस म्हणून तूझ्यावरचं मीच भिजत होतो. -- माहित नव्हतं भिजायचं तुच मला शिकवलं होतं पावसात कोणाला कळलं नाही अश्रू मात्र ओघळलंं होतं -- थांबला पाऊस वारं सुद्धा मंदावलं होतं तुझ्या आठवणींच्या मातीने मन माझं गंधावलं होतं =====

जे घडलं प्रेमात माझ्या , ते तुला सांगूनही कधी कळलंच नाही

लेखक खिलजि यांनी बुधवार, 02/05/2018 या दिवशी प्रकाशित केले.
नजरेतून पायउतार होणं कधी जमलंच नाही काय शोधत होतो अखेरपर्यंत ते कधी कळलंच नाही तो वेग मंदावला असाच वारा बेभान वाहतच होता धावता धावता कधी थांबलो ते कळलंच नाही खाली जमिनीवरूनच घेतला वेध मी आकाशाचा इच्छा मनात धरिता तारा निखळून पडला काय मागितलं होतं अन काय पदरात पडलं ते समजलंच नाही सांगोपांगी कथा बहू ऐकल्या काही ठेवल्या मनात तर काही ओठात जे घडलं प्रेमात माझ्या ते तुला सांगूनही कधी कळलंच नाही माझं प्रेम माझ्याकडेच राहिलं मला कधी फळलंच नाही {{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}

रानवारा...

लेखक विशुमित यांनी मंगळवार, 03/04/2018 या दिवशी प्रकाशित केले.
रानवारा... माझ्या प्रीतीचा उबारा...!! मन माझं सारखं कलकल करतंय, चूक करून म्हणतंय सलतंय फुंकर घालतो त्याच्यावर, रानवारा... माझ्या प्रीतीचा उबारा...!! तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे, धडपड जशी आत तशी बाहेर आहे, आधार देतो त्याच्यासाठी, रानवारा... माझ्या प्रीतीचा उबारा...!! अवघड किती मिलन तुझं आणि माझं, आड येती दुनियेची रीति रिवाज, जात धर्म मानत नाही, रानवारा... माझ्या प्रीतीचा उबारा...!!