मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वाया गेलेली कविता

कहर · · जे न देखे रवी...
प्रहर चालला तो दुपारचा त्यातून घन आलेले दाटून दमट जराशी हवा पसरली लपाछपी खेळतसे ऊन दूर कुठे तो बसून रावा घालीत होता किर किर शीळ उदास होते आयुष्य झाले सरता सरेना आजची वेळ अशाच वेळी बसून एकटा हळूच असे तो निरखत तिजला एक भेंडोळे एक लेखणी होता हाती घेऊन बसला काही अंतरावर ती होती घागर बुडवीत पाण्यामध्ये रेखीव काया लवचिक बांधा वर्ण गोमटा कपडे साधे तिला ना होती जाणीव त्याची गुणगुणतसे आपल्या तंद्रीत आडोशास तो बसला होता काही खोडीत काही लिहीत घागर भरुनी ती निघताना याची लेखणी थांबे पुरी शीळ घालुनी तिज तो बोले तुजवर लिहिले हे वाच सुंदरी निघे गुलाब मग खिशातुनी जशी ती एकेक ओळ वाचता जरा थांबुनी मग ती वदली "वा रे दादा छान कविता !" गुलाब गेला सुकुनी खिशातच ती लबाड हसली जाता जाता गेली घेऊन भेंडोळेही वाया गेली एक कविता

वाचने 6911 वाचनखूण प्रतिक्रिया 13

विशुमित गुरुवार, 06/28/2018 - 17:55
कहर कविता ... === गुलाब गेला सुकुनी खिशातच ती लबाड हसली जाता जाता गेली घेऊन भेंडोळेही वाया गेली एक कविता त्यावेळेस कवीच्या चेहऱ्यावर नेमके कसे भाव असतील हे डोळ्यसमोर तराळले.

नाखु Wed, 07/04/2018 - 14:27
वाया गेली तरी प्रतिभा उचंबळत असते आणि कवी नव्या जोमाने कामाला सुरुवात करतोच पांथस्थ नाखु

In reply to by प्रचेतस

खी Ss क . सध्या ( 2 वर्ष ) तरी त्यांनी कुठलीशी वटिका , काढा घेतलाय जो त्यांना भलताच लाभदायक ठरलाय . त्यामुळे ती आलेली कळ जराशिक दाबून राहिलेय.