खादाडी
गेल्या रविवारी गुळपीठ अन् मी दोघेच घरी होतो. आमच्या मुदपाकखान्यातील कौशल्याची मजल झक्कास म्यागी, उकडलेली अंडी, चहा या सीमांमध्ये मर्यादित आहे. दिवसभर याच सिद्धहस्त पाककृती आलटून पालटून सादर केल्यावर संध्याकाळी आम्ही भेळ खायला गेलो. गावाकडं म्हणजे संगमनेरला बराच फेमस असलेलं घुले भेळ सेंटर इकडं आंबेडकर नगर ला सुरु झालय.......
घुले साहेबांशी गप्पा मारताना लहानपणी संगमनेरात मिळणारी रामदास नढे कडची ओली भेळ आठवली. शनिवारी नढे काका ओली भेळ द्यायचा नाही, कारण त्याच्या चवीची ओली भेळ बनवायला वेळ लागायचा अन बाजारच्या दिवशी हे चोचले त्याला परवडत नसत.
मिसळपाव