मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नृत्य

गणपती बाप्पा मोरया

पाषाणभेद ·
गणपती बाप्पा मोरया मंडळी आपला नेहमीचाच हिरो आन हिरवीन आहे. या हिरोच्या गल्लीत सार्वजनीक गणपती बसतो आहे. हिरो (चांगल्या स्वभावाचा) भाई आहे अन टपोरी पोरे घेवून फिरतो.

युगलगित: रानातले खेळ जरा खेळू

पाषाणभेद ·
युगलगित: रानातले खेळ जरा खेळू हिरो: अग ए मैना जरा इकडं ये ना जावूया राना नको म्हणू नको ना गंमत म्हणून जरा खेळ खेळू ना
गोड गोड पोळं झाडावर उभं काढायंचं कसं म्हणतीस का गं कडेवर तुला घेतो अन लाव त्याला हातं टपटप मध चोखून घे ना चल मधमाश्यांचे पोळं जरा काढू ना आता नको नको म्हणू नको ना गंमत म्हणून जरा रानातले खेळ खेळू ना
हिरवीन: नको रे सजना आले मी राना कुणा सांगता विना सांगल कुणी तर माझा बा येईल ना (दांडकं घेवून माझा बा येईल ना)

मिटींग - मिटींग

टारझन ·
णमस्कार्स पिपल्स , डिस्क्लेमर्स : लेखात टेक्निकल बाबींचा उल्लेख असेल त्याचा खुलासा करण्यात येणार नाही. लेख एंजॉय करुन विसरायचा ! कळ्ळं ? आज गुरुवार.. उदया गुड फ्रायडे ची सुट्टी .. मोठ्ठा विकांत .. पुण्याला घरी पळण्याचे वेध प्रत्येक मुंबैत जॉब करणार्‍याला लागलेले असतात. लंच नंतर कसला ही काम करायचा मुड नसतो. आणि एका मिटींगचा कॉल येतो. मी एका सॉफ्टवेयर कंपनीत काम करतो जी बँकांसाठी सॉफ्टवेयर सर्व्हिस देते. आणि ऑनसाईट पाठवल्याने मी बँकेच्या आयटी सेंटरात बसतो. मोठ्या सरकारी बँकांत प्रोजेक्ट्स खुप मोठे असतात आणि खुप वेगवेगळे सॉफ्टवेयर व्हेंडर्स , टिम्स आणि डिपार्टमेंट्स इन्व्हॉल्व्ह असतात.

मला मेघदुताचा पुढील दुवा हवा आहे.....विदग्ध वरील .

डावखुरा ·
http://vidagdha.wordpress.com/meghadoot_purna/ प्रस्तुत दुव्यावर मेघदुत आहे मराठी रसग्रहणासहित पण क्रमशः आहे .... तरि यापुढिल दुवा अथवा सम्पुर्ण मेघदुतचे मराठी रसग्रहण कोणाकडे उपलब्ध असल्यास देण्याचे करावे ....... धन्यवाद!!

अबे राडे राजा

विजुभाऊ ·
आमची प्रेरणा http://misalpav.com/node/11516 पूर्वी कार्यकर्ते हे चळवळीचा भाग असत. हल्ली भाडोत्री कार्यकर्ते आणावे लागतात. अशाच एका भाडित्री कार्यकर्ते पुरविणार्‍या संस्थेची विनवणी.... "अबे राडे राजा.. रसते पे आजा जो राडे मे तेरे प्राण बसत है वो राडे करने को चोरी अबे राडे राजा रसते पे आजा काहेसे मै जाऊ करने राडे, काहेसे फोडू काच बिल्डिंग के , काहेसे मै लुटू माल दुकानओके ? अबे राडे राजा रसते पे आजा मुख से तुम बबोलो गारी , हाथोसे करदो पत्थरबाजी, थैले मे भरके माल लाओ चोरी अबे राडे राजा रसते पे आजा यूपी के भैय्या ;और बाके बीहारी भागो भागो ...

तुझ्या रेशमी केसांनी

विजुभाऊ ·
मित्रानो एक सगळेमिळून एक प्रयोग करु यात नेहमी एखाद्या काव्य प्रकारातून विडंबनाचा जन्म होतो. आपण उलटे करू या अगोदर विडंबन लिहुया आणि त्यावरून नन्तर त्याचे सुडंबन करुया तुझ्या रेशमी केसांनी जीव माझा ढापला जाता जाता सहजच कलीजा माझा कापला का आता गमजा करू फुका आपला भेटीत पहिल्याच तू खीसा पाचशेला कापला सोड हा नाद झेपणार नाही तुजला प्रेमात तुझ्या ऐसा आवाज आतला दबला मी खुळा होतो खुळा आहे हे ठाऊक होते मजला जादूत तुझ्या करवीयला मी माझाच खुळखुळा आपला कळाले तरी जाहला उशीर फार हे उमजायला मजला जेंव्ह्या तुझ्या त्या प्रीयकराने धरुनी मज बहूत चोपला. ...............विजुभाऊ या पुढच्या ओळी तुमच्यावर सोपवतोय

अस्सल देशीच ( विदेशी कायकू)

विजुभाऊ ·
माझी प्रेरणा : अस्सल देशी हायकू १) सिगरेट ,साहेब आणि कंपनी देशीच धरली नाविलाजाने बायकुही देशीच पत्करली देशातच बनलेली रम मात्र विदेशी ठरली. २) त्याला बघून काजूची फेणीही थरथरली डोळ्यातून आसवे गळली दुपारीच लागली असेल बहुतेक. ३) डाबर,पुदीन हरा , खायचे असते संध्याकाळी जास्त झाल्यास दुसर्‍या दिवशीचा उत्तम उतारा असते. ४) नोकरी देतांना एच आर ने माझेसमोर दोन पर्याय ठेवलेत. ऑनसाईट की ऑफ शोअर....?? मला ऑफ शोअर ची गरज नव्हती...

चला जोडीनं तण हे काढू, चला ठिबकसिंचन करू

पाषाणभेद ·
चला जोडीनं तण हे काढू, चला ठिबकसिंचन करू पिक आलंया जोमात औंदा त्येच्यात तणं लागलं वाढू ... अहो राया चला जोडीनं तण हे काढू ||धृ|| अहो सजणा चला जोडीनं तण हे काढू अहो सख्या चला जोडीनं तण हे काढू अहो धनी चला जोडीनं तण हे काढू अहो दिलवरा जोडीनं तण हे काढू बांधानं या येता जाता काटं बोचत्यात पायी /* (बांधावर असणारे चुबूक काटे हे सुद्धा एका तणाचाच प्रकार आहे.) */ काढून काढून मी गं थकले उपाय गावंना काही काट्याकुट्यात कशाला फिरता?... अहो काट्याकुट्यात कशाला फिरता? काटं

चल उसात दंगा करू

पाषाणभेद ·
चल उसात दंगा करू मंडळी, आप्ला ह्यो हिरो आन हिरवीन मस्तपैकी श्येताव आल्याली हायेत. त्ये काय करूं र्‍ह्यायलेय त्ये पाहू चला: (पैकं नसल्यांनं एका डबड्यात ग्येल्येल्या पिच्चरमंधी ह्ये गानं टाकेल हाय.) हिरो:
पिक आलं वयात आता नको उशीर तू ग करू अग पारू... चल उसात दंगा करू
हिरो:

डोईवरी पदर घेवूनी आलीस मोठ्या नखर्‍याने सांग सजणी भ्यालीस का तू माझ्या असल्या वागण्याने?

हिवाळी ऑलिंपिक मध्ये देवदास मधील गाण्यांवर आईस डान्स

अश्विनीका ·
सध्या व्हॅनकुव्हर , कॅनडा येथे हिवाळी ऑलिंपिक चालू आहे. हे २१ वे हिवाळी ऑलिम्पिक आहे . इथे फेब्रुवारी १२ ते २८ ह्या दरम्यान बर्फावरील खेळ खेळले जात आहेत. ह्यात बर्फावरील हॉकी , फिगर स्केटिंग (बर्फावर पायात स्केट्स घालून नाच), स्पीड स्केटिंग (पळण्याच्या स्पर्धेसारखीच पण पायात स्केट्स घालून बर्फाच्या ट्रॅक वरून पळणे), स्की जम्पिंग, फ्री स्टाईल आणि क्रॉसकंट्री स्किइंग , स्नोबोर्डिंग, स्लेईंग अशा अनेकविध स्पर्धा चालू आहेत. व्हॅनकुव्हर ला जाणे शक्यच नव्हते तरी घरच्या घरी टिव्ही वर ह्या स्पर्धा बघायला मजा येत आहे.