अस्सल देशीच ( विदेशी कायकू)
लेखनविषय:
काव्यरस
माझी प्रेरणा : अस्सल देशी हायकू
१)
सिगरेट ,साहेब आणि कंपनी देशीच धरली
नाविलाजाने बायकुही देशीच पत्करली
देशातच बनलेली रम मात्र विदेशी ठरली.
२)
त्याला बघून काजूची फेणीही थरथरली
डोळ्यातून आसवे गळली
दुपारीच लागली असेल बहुतेक.
३)
डाबर,पुदीन हरा , खायचे असते
संध्याकाळी जास्त झाल्यास
दुसर्या दिवशीचा उत्तम उतारा असते.
४)
नोकरी देतांना एच आर ने माझेसमोर दोन पर्याय ठेवलेत.
ऑनसाईट की ऑफ शोअर....??
मला ऑफ शोअर ची गरज नव्हती... मी ऑन साईट निवडला.
चुकलच माझं ..तमिळ नाडूतल्या छोट्याशा गावात ऑनसाइट राबतोय...???
५)
संध्याकाळी मित्रांच्यात गप्पात जरा जास्तच झाली तेव्हा
भिंतीला घट्ट धरून ठेवले
सारे जग भोवताली फिरत असताना भिंत इतरांच्याअंगावर पडू नये म्हणुन.
वाचने
2261
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
संध्याकाळी मित्रांच्यात गप्पात जरा जास्तच झाली तेव्हा
भिंतीला घट्ट धरून ठेवले
सारे जग भोवताली फिरत असताना भिंत इतरांच्याअंगावर पडू नये म्हणुन.
क्या बात है..:)
चांगली रचना.
>>चुकलच माझं ..तमिळ नाडूतल्या छोट्याशा गावात ऑनसाइट राबतोय...???
तुम्ही तामिळनाडुत आहात तर, काही नाडीभविष्याबद्दल लिहु शकाल काय?
भिंतीला घट्ट धरून ठेवले
सारे जग भोवताली फिरत असताना भिंत इतरांच्याअंगावर पडू नये म्हणुन.
------------हीच भावना पुर्ण कवितेत असणारी कविता लिहा.
तुम्ही आता पण तामिळनाडुत आहात का?
हो तर दारुपेक्षा तितले local drink try करा,alcohol free असत ते,प्रमाणात फार छान!
आपली माझ्या लेखावरची पहीली प्रतिक्रिया फार डोक्यात जाणारी होती,ती विसरुन हे लिहत आहे.
बरं वरती बोललो तशी कविता लिहा,दारु हवीच त्यात,त्याने एक वेगळा touch
मिळतो कवितेला.
जय हो भाई, चालु द्या!!
जबरदस्त यार ! ! !
भिंत धरून ठेवून बरेच प्राण वाचविले.! ! Bravo ! ! !
१० मिनिटे खो खो हसत होतो
भिंतीला घट्ट धरून ठेवले
सारे जग भोवताली फिरत असताना भिंत इतरांच्याअंगावर पडू नये म्हणुन.
=)) =)) =))
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला,
जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।
मूळ कवितेपेक्षा छान झाली आहे...
सुपारीच्या जागी दुपारी फिट्ट बसतं.
धन्यवाद


संध्याकाळ