Skip to main content

मुक्तक

प्रेषीडेन्ट...(गब्ब्या इज बॅक!)

लेखक चिनार यांनी बुधवार, 19/07/2017 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
"बबन्या.....", "काय बे गब्ब्या?" "हा प्रेषीडेन्ट कोन असते?" "कोन?" "प्रेषीडेन्ट बे...पेपर नाय वाचत का तू? इलेक्शन हाय म्हन्ते ना प्रेषीडेन्टचं.", गब्ब्या म्हणाला. "हा वाचलं ना..प्रेषीडेन्ट म्हंजे राष्ट्रपती. हे बी माहित नाही का तुले ?" "नाही बा..कोन असते थो?" "थोचं तं सगळ्यात मेन राह्यते..बाकी सारे त्याच्या हाताखाली राह्यते.." "सारे म्हंजे?" "म्हणजे संसद-गिन्सद वाले, पंतप्रधान..सारे वचकून ऱ्हायतेत त्याले.", बबन्यानं माहिती पुरवली. "बाप्पा बाप्पा..पंतप्रधानपन त्येच्या हाताखाली म्हंजे लयचं झालं." "मंग!

रूम-मेट्स

लेखक मिडास यांनी शुक्रवार, 14/07/2017 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
रूमचं दार उघडून अनघा बाहेर आली तर तिला निनाद सोफ्यावर मेल चेक करताना दिसला. “गुड मोर्निंग.” अनघा त्याच्याकडे हसत बोलली. “वेरी गुड मोर्निंग princess” तीला एक नाटकी सलाम ठोकत निनाद ने प्रत्युत्तर दिले. “कधी आलास?” आपले मोकळे केस बांधत अनघाने विचारलं. “आत्ता just आलो. तू ये फ्रेश होऊन. मी चहा बनवतो तोपर्यंत.” “ओके बॉस” म्हणत अनघा फ्रेश व्हायला गेली.

" तु तेव्हा तसा ...! "

लेखक जेनी... यांनी शुक्रवार, 14/07/2017 00:49 या दिवशी प्रकाशित केले.
तुला मी फार मिस्स करते .. तुझ्या आठवणींनी भरलेली पानं अजुनही जपुन ठेवलियेत मी. रोज एकदा तरी त्यातल्या एकेका पानाची उजळणी करते. मला नाही माहित तु माझी किती आठवण काढतोस, पण तु विसरला नसशील हे मात्र नक्की. आज चार वर्ष होऊन गेली, तुझ्या माझ्यात म्हणावं असं काहीच उरलं नाही, तसं होतं तरी काय ?? पण तरीही काहीतरी होतं हे नक्की. नाहीतर बघना, मला अजुनही तुझी आठवण का यावी ? अजुनही तु कुठेतरी आहेस, असं साऱखं का वाटावं? जास्तं काही नाही पण तुझं ते सतत "कुठेयस??" ते मात्र नाही विसरता आलं मला, तु मला शोधत रहावसं आणि मी फुलपाखरासारखं अवतिभोवती असुनही क्षणात समोर तर क्षणात अद्रुश्य होत रहावं .

स्वच्छ भारत!

लेखक दिनेश५७ यांनी बुधवार, 12/07/2017 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
बेस्टची एक खच्चून भरलेली बस. पुरुष प्रवासी पॅसेजमधेही उभे आहेत. महिलांसाठी राखीव बाकडी मात्र, एका महिला प्रवाशासाठी पूर्ण बाकडे अशा हिशेबाने भरलेले! लक्षपूर्वक ध्यान दिले, तर जवळपास प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर, पुरुष प्रवाशांना खुन्नस दिल्याचा भाव दिसतोय! अचानक पावसाची सणसणीत सर आल्याने खिडक्यांच्या काटा फटाफट खाली ओढल्या जातात, आणि पावसामुळे ट्रॅफिकही जॅम होते. गाडी जागेवरच! दोनच मिनिटांत उकाड्याने गर्दी कासावीस होऊ लागते. घामाच्या धारा सुरू होतात. अशा वेळी अस्वस्थता येते. चीडचीड होते.

स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई!!

लेखक दिनेश५७ यांनी बुधवार, 12/07/2017 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
'लेप्टोस्पायरोसिस' या प्रसंगी जीवघेणा ठरणाऱ्या आजाराचा संसर्ग टाळण्यासाठी काय करावे, काय करू नये, हे सांगणारी एक जाहिरात सध्या मुंबई महापालिकेतर्फे सिनेमागृहांमध्ये दाखविली जात आहे.

उध्दु . . तुला माह्यावर भरोसा नाय काय ?

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी मंगळवार, 11/07/2017 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
उद्धुचे वडील किती मोठे . . मोठे . . त्यांचे पण नशीब करंटे . . . . करंटे . . त्यांच्या पोटी आला हा गोटा गोल . . गोटा गोल . . उध्दु तू माझ्याशी गोड बोल . . . गोड बोल . . . उद्धुचा मुलगा आदू . . . आदू . . . आहे तो पक्का लडदु . . . लडदु . . . पेंग्विनचा खर्च करतंय कोण . . करतंय कोण उध्दु तू माझ्याशी गोड बोल . . . गोड बोल . . . उद्धुचा पेपर सामना . . . सामना . . . संपादकाला काही येईना . . येईना . . . गुहेचा झाला पांजरपोळ . . . . पांजरपोळ . . . . उध्दु तू माझ्याशी गोड बोल . . . गोड बोल . . . उद्धुची पार्टी आहे सत्तेत . . . सत्तेत . . . तरी मनाने विरोधकातच बसलेत . . बसलेत . .

परीक्षा

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी रविवार, 09/07/2017 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
परीक्षेला बसवलं आहेस तू अशा देवा किती पानं लिहितोय तरी वेळच संपत नाही इतकी अवघड परीक्षा काय ही कामाची हजारदा वाचला तरी तुझा प्रश्नच कळत नाही ! परीक्षेचं वेळापत्रक तरी आधी सांगायचं असतं कोणालाही असं थेट पेपरला बसवायचं नसतं अभ्यासक्रम वेगळा आणि हे प्रश्न भलतेच आहेत गोंधळ झाला तरीही वर मार्क मिळवायचे आहेत ? मागे एकदा दिला होता मी धैर्याचा एक पेपर त्याचं काय झालं पुढे ते कळलंच नाही नंतर आता चालू आहे सहनशक्तीची अफाट चाचणी करतोस तरी कशी तू असल्या प्रश्नांची जुळवणी ? एक पेपर झाला की मध्ये थोडा वेळ द्यायचा असतोय तुझ्या शाळेत मात्र मी सतत परीक्षेलाच कसा बसतोय पेपर संपव तुझे सगळे आता, सांग मी पास

विंडोसीट

लेखक फुंटी यांनी रविवार, 09/07/2017 09:14 या दिवशी प्रकाशित केले.
विंडो सीट वरून आताही दिसतात अर्धवट हिरवेगार डोंगर दगडमातीसाठी लचके तोडलेले नागरीकरणाच्या सर्जरीला द्यावी लागते दगडमाती वसलेल्या शहराच्या सौंदर्यामागे असते कुर्बानी डोंगरांची विंडो सीट आजकाल नकोशी वाटते

एक अधिक एक...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 05/07/2017 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
एक अधिक एक=दोन! डायल केल्यावर लागलाच्च पाहिजे फोन! नेटवर्क बिझी असू शकतं. रेंज नसू शकते. कदाचित स्वीच अॉफ असू शकतो समोरच्याचा फोन! या वास्तविक शक्यता ग्रुहीत धरणार कोण? .. छे! छे! लागलाच्च पाहिजे फोन. कारण,एक अधिक एक=दोन! गणितात आयुष्य पहायचं. पण आयुष्याचं गणित शिकायचं नाही! पहिल्या एक आणी दुसय्रा एकच्या किं~मती मधली तफावत..मूल्यांचं वेगळेपण? त्यांचं मूळ १ असणं,नसणं? त्यांची भूक तहान तर अमान्य, अस्विकार्यच! कारण एक अधिक एक=दोन! यापेक्षा वेगळी जीवननिष्ठा कोण??? ह्हूं!!! लागलाच्च पाहिजे फोन! कारण,एक अधिक एक=दोन! एक अधिक एक=पाच! एक अधिक एक=दहा! कधी कधी मायनस दहा देखील!

भेटी लागी जीवा . .

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी सोमवार, 03/07/2017 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
परब्रम्ह उभे ठाकले समोर साक्षात कैसे मी मग सावरावे आता देहभान दाटलेला कंठ,डोळा पाणी आर्त हरपली केव्हाच अवघी भूक तहान मागणे भौतिक सुखे हे मूर्खलक्षण अशाश्वत गोष्टींचे काय करु कळेना तूच निर्मीलेल्या जगी कंठतो जीवन तरीही का तुझा परीसस्पर्श होईना सद्य परिस्थिती देवा तुझिया समोरी काय तुला मी वेगळे असे आळवावे दाता आहेस तू, एवढेच द्यावे मला तुझ्या चरणाची मी फक्त धूळ व्हावे !