Skip to main content

मुक्तक

मिठी

लेखक दत्ता काळे यांनी गुरुवार, 14/09/2017 03:48 या दिवशी प्रकाशित केले.
समोरंच एका मुलीनी मुलाला मारलेली निर्व्याज मिठी बघून वाटलं "सालं, आपल्यावेळी नव्हतं असं काही" आताही ती असती अन तिन हे बघितलं असतं तर हळूच हसंत म्हणाली असती "आपल्यावेळी नव्हतं बाई असं काही" मी उगाचंच आठवणींच्या गर्तेत.. दूर उडून चाललेल्या सावरीच्या कापसाच्या म्हातार्‍या पकडू पाहतोय मनांत पूर्वीच्याच अल्लडपणे.

एका वेडाला पुनश्च सुरुवात!

लेखक mayu4u यांनी मंगळवार, 12/09/2017 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
“मी पुन्हा सायकलिंग सुरु करणार आहे!" (भीत भीत) अस्मादिक. “उत्तम कल्पना! चांगलीशी सायकल घे आणि सुरु कर.” तीर्थरूप. (चेहऱ्यावर sadist हसू) “शाळेत पण नाव घालूया का?” सौ. “किती पैसे उडवणार आहेस?” मातोश्री. “साधारण १५ - २० हजार" (पडलेल्या आवाजात) मी. “एवढे? त्यापेक्षा बँकेत ठेव!” (अर्थातच) मातोश्री. “त्यापेक्षा घरी टीव्ही घे!” (फणकाऱ्याने) सौ. =============================================================================== काही दिवसांपूर्वी एका रविवारी दुपारी जेवणानंतर आमच्या घरी झालेला हा सुखसंवाद.

हाफ चड्डी गँग (पार्ट -१)

लेखक बाजीप्रभू यांनी शुक्रवार, 08/09/2017 19:49 या दिवशी प्रकाशित केले.
पोर्तुगीज भाषेत एक म्हण आहे "ए ओकासीआओ फाज ओ लाडराओ" आपल्या मराठीत त्याचा अर्थ होतो कि, "चोर संधी निर्माण करतो आणि संधी सापडली तर सगळेच चोर होतात" याच भाषेत अजून एक म्हण आहे, ती अशी कि "क्यूएम कॉन्टा उम कॉण्टो, आऊमेन्टा उम पोण्टो" अर्थात, गोष्ट सांगणारा आपली भर घालतोच, आपल्या पदरचं, आपल्या बाजूनेच सांगतो.

मोडीची_गोडी

लेखक vcdatrange यांनी शुक्रवार, 08/09/2017 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
फारा वर्षाच्या अंतराने पुन्हा विद्यार्थी दशेत गेलो, ते ब्राह्मि अन् मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाच्या निमित्ताने.

क्रॉस सबसिडी

लेखक सुबोध खरे यांनी मंगळवार, 05/09/2017 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
क्रॉस सबसिडी काल सकाळी सकाळी एक रुग्ण आला होता. खाऊन पिऊन सुखी दिसत होता.गळयात, हातात सोन्याच्या साखळ्या. वय वर्षे २८. इकडे दुखतंय तिकडे दुखतंय. सोनोग्राफी केली तेंव्हा अति दारू पिण्यामुळे यकृतात चरबी भरलेली दिसत होती. आतड्याला सूज आलेली दिसली त्यांना सांगितले हे बाहेर खाण्यामुळे तुम्हाला अन्न विष बाधा झाली आहे. त्यावर ते म्हणाले अहो मी रोजच बाहेर खातो. (व्यवसायाने बिल्डर आहे. मुंबईत पनवेल मध्ये वडिलोपार्जित भरपूर मालमत्ता आहे. ) कुठे खाल्ल्यामुळे झाली ते सांगता येईल का? मी म्हणालो असं कसं सांगणार? बाकी काही नव्हतं. जाताना विचारलं "कन्सेशन" किती?

मेंदुला दुखापत

लेखक रानरेडा यांनी सोमवार, 04/09/2017 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
मेंदुला दुखापत पाशवी गवत आहे पाशवी गवत आहे खेळ आणि डेझी चेन आणि हसणे स्मरण पथ्यावर ल्यूनी ठेवण्यासाठी आला पापी हॉलमध्ये आहे पार्सर्स माझ्या हॉलमध्ये आहेत या कागदाच्या चौकटीत चेहर्यावर जमिनीवर ठेवलेले आहेत आणि प्रत्येक दिवशी पेपर बॉय अधिक आणतो आणि जर बांध काही वर्षांनी खुले होते आणि जर टेकडीवर काहीच जागा नसेल आणि जर आपले डोकेदेखील अंधाऱ्या विरहीत असतील तर मी तुम्हाला चंद्राच्या गडद बाजूला बघितो पागल माझ्या डोक्यात आहे पागल माझ्या डोक्यात आहे आपण ब्लेड लावा, आपण बदल करा मी पुन्हा विचार करेन 'जोपर्यंत मी समजणार नाही आपण दार लॉक आणि कळ टाकून द्या माझ्या डोक्यात कोणीतरी आहे पण मी नाही आहे जर मेघगर

मी शोधात आहे अशा कवितेच्या,

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 04/09/2017 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
मी शोधात आहे अशा कवितेच्या, तारे, वारे, रिमझिम, फुलं, वेली, विरहाचे उमाळे, असं आळुमाळु काहीच नसेल तिच्यात हुलकावण्या देईल ती, पण तरीही नेटाने शोधेन ती कविता जी थेट भिडून उलगडताना देईल अनुभव – हर एक थर सोलूनही जिवंत राहिलेल्या वास्तवाचा, थंड दुधारी कट्यारी इतका खराखुरा
काव्यरस

प्रतिसादांचा महामेरू । सकल फेक-आयडीस आधारू । अखंड जिल्बिचा निर्धारु । श्रीमंत डूआयडी ।।

लेखक चामुंडराय यांनी रविवार, 03/09/2017 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
डूआयडीचे आठवावे लेख । डूआयडीचा आठवावा ताप । डूआयडीचा आठवावा प्रतिसाद । मिपामंडळी ।।१।। डूआयडीचे कैसें लिहिणें । डूआयडीचे कैसें पिंकणें । डूआयडीचे काडी टाकणे । कैसें असे ।।२।। मुळायडीचा केला त्याग । म्हणोनि साधिजें ट्यार्पीचा योग । जिल्बी पाडण्याची लगबग । कैसीं केली ।।३।। वापरावे विविध आयपी । तेव्हा मिळे डूआयडी । वापरावे फेक आयडी । पाडण्या जिल्बी ।।४।। सकल डूआयडी आठवावे । फेकायडी डिलीटवत् मानावे । आंजालोकी मिपालोकी उरावे । पिंकरूपें ।।५।। प्रतिसादांचा महामेरू । सकल फेक-आयडीस आधारू । अखंड जिल्बीचा निर्धारु । श्रीमंत डूआयडी ।।६।।

"पप्पूलीची पिन्नी - पिन्नीचा पप्पूली"

लेखक मूखदूर्बळ यांनी रविवार, 03/09/2017 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
"पप्पूलीची पिन्नी - पिन्नीचा पप्पूली" हे ऐकायला वेगळ वाटत असल तरी थोडस वेगळ आहे. पप्पूली शिवाय पिन्नी अपूर्ण आहे का माहीत नाही पण पिन्नी शिवाय पप्पूली अगदीच अपूर्ण आहे. पिन्नी आणि पप्पूली चे नाते बाप-लेकाचे आहे कदाचित त्यापेक्षाही अधिक आहे. विठ्ठल कामतान्चे एक वाक्य आहे " अ चाईल्ड गिव्ज बर्थ टू अ मदर" त्याचेच थोडा बदल करून मी म्हणेन " अ चाईल्ड गिव्ज लाईफ टू अ फादर" पप्पूली कधी कधी पिन्नीचा अभ्यास घेतो. अभ्यास करताना पिन्नी खुप गमतीदार दिसते. छोट्याश्या टेबलावर पूर्ण अन्ग झोकून देऊन अक्षर आकडे गिरवायला घेते. दोन अक्षर काढल्यावर हळूच पप्पूली कडे बघते. पिन्नी ला पाणि हव असत.

बकरी ईद आणि हैदराबाद (अर्थात हैदराबाद डायरी)

लेखक सचिन कुलकर्णी यांनी शनिवार, 02/09/2017 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
मी हैद्राबादमध्ये गेली ६ वर्षं राहतोय. बकरी ईद जवळ आली की इथल्या काही इलाक्यांमध्ये (जसं की मेहंदीपटनम) बकऱ्यांचे बाजार लागायला सुरुवात होते. मोठ्या मोठ्या रस्त्यांच्या कडेला मंडप टाकून तिथे बकऱ्यांचे जथेच्या जथे साऱ्या भारतभरातून विक्रीसाठी आणले जातात. यामध्ये तगडे बोकड, पुष्ट बकऱ्या, मध्यम बकऱ्या आणि अगदी कोवळी पिल्लं पण असतात. ज्याला जसा परवडेल तसा प्राणी विकत घेता येतो. कुर्बानीसाठी भाविक (?) लोक, मोठ्या कुटुंबातील लोक, मशिदींचे प्रतिनिधी तसेच छोटे मोठे कसाई देखील इथून 'माल' घेऊन जातात.