“मी पुन्हा सायकलिंग सुरु करणार आहे!" (भीत भीत) अस्मादिक.
“उत्तम कल्पना! चांगलीशी सायकल घे आणि सुरु कर.” तीर्थरूप. (चेहऱ्यावर sadist हसू)
“शाळेत पण नाव घालूया का?” सौ.
“किती पैसे उडवणार आहेस?” मातोश्री.
“साधारण १५ - २० हजार" (पडलेल्या आवाजात) मी.
“एवढे? त्यापेक्षा बँकेत ठेव!” (अर्थातच) मातोश्री.
“त्यापेक्षा घरी टीव्ही घे!” (फणकाऱ्याने) सौ.
===============================================================================
काही दिवसांपूर्वी एका रविवारी दुपारी जेवणानंतर आमच्या घरी झालेला हा सुखसंवाद. भरल्या पोटी घरच्या दोन्ही अनाहिता सहज रुकार देऊन टाकतील अशा समजुतीने मी माझा मनसुबा मांडला, आणि पुढल्या काही दिवसांच्या कोल्ड वॉर ची सोय करून टाकली.
===============================================================================
कुठल्याही सामान्य मुलाप्रमाणेच शाळकरी वयात मला सायकलीचं वेड लागलेलं. आधी दासन आणि मग हर्क्युलिस वर मी मनसोक्त भटकायचो. शिवाय फाफे सारखी माझी पण हडकुळीच असल्याने मित्रांवर शाईन मारायचो. शाळा आणि क्लास ला तर सायकलशिवाय जाण्याचा विचार करणंही अशक्य होतं तेव्हा. शिवाय मी आणि माझे मित्र सायकलींवरून दहिसर-बोरीवली भागात उंडारत असायचो, ते वेगळच.
पुढे कॉलेज ला गेल्यावर सायकल चालवणं कमी झालं. बायकांचा, म्हणजे बाईक्स चा, छंद लागला. सायकल नुसतीच उभी होती, म्हणून ती पण कुणाला तरी देऊन टाकली. सायकलीचे दिवस संपले…
… असा माझा गैरसमज होता. वस्तुस्थिती लौकरच ध्यानात आली. भले स्वत:ची नसली, तरी मित्रांच्या आणि त्यांच्या धाकट्या भावांच्या सायकली बघितल्यावर चालवल्याशिवाय चैन पडत नसे. म्हणून हौसेने पुन्हा एकदा सायकल घेतली. हिरो ऑक्टेन! एव्हाना शिक्षण संपून चाकरी सुरु झालेली. हौसेने चारचाकी पण घेतलेली. तरीही माझं मन सायकलवर बसलेलं!
आणि अवघ्या तीन महिन्यात माझी नवी सायकल चोरीला गेली. पोलिसात तक्रार वगैरे देऊन झाली; पण काही फायदा झाला नाही. आणि मी एवढा नाराज झालो, की पुढली जवळपास ५ वर्षं सायकल घ्यायचा विचारही केला नाही.
===============================================================================
अलिकडेच, म्हणजे गेल्या एक सहा-सात महिन्यांपूर्वी “सायकल सायकल” नावाच्या एका मिपाकरांच्या कायप्पा समूहात सहभागी झालो. आणि जुन्या प्रेमाला पुन्हा धुमारे फुटले! समूहात एकसो एक दिग्गज सभासद त्यांचे सायकलिंग चे अनुभव शेअर करतायत, नवख्यांना मार्गदर्शन करतायत, सारे एकमेकांना प्रोत्साहन देतायत… आणि, मिपाकर असल्याने, भरपूर दंगा सुद्धा करतायत! धमाल! सुरुवातीला मी या समूहात वाचनमात्रच होतो. एकतर सायकलिंग करत नव्हतो. त्यातून बाकीचे सदस्य रोज लांबलांबच्या ट्रीपा मारतायत, ब्रह्म (BRM) मारतायत, पंक्चर काढतायत, सायकल कट्टे करतायत… मी निमूट एका कोपऱ्यात उभा राहून सगळा दंगा बघायचो.
हळू हळू भीड चेपली. मी सुद्धा माझ्या शंका विचारू लागलो. आणि सगळे अगदी आपुलकीने मला उत्तर देतायत हे पाहून धीर वाढला. पुन्हा एकदा सायकल घ्यायच्या विचाराने उचल खाल्ली. आणि उपरोल्लेखित संवाद घडला!
===============================================================================
शेवटी “आधी स्वस्तातली सायकल घेऊन ती नित्यनियमाने चालव” या मातोश्रींच्या आज्ञेनुसार आणि “दिवाळीत TV घ्यायचाच!” या सौंच्या धमकीला मान देऊन स्वस्त सायकलीचा शोध सुरु केला. २-४ सायकली शोर्टलिस्ट केल्या. नेमकी तेव्हाच समूहातल्या सुमित ने ६०० ची ब्रह्म मारलेली. तो म्हणाला, कि कुणीतरी BTWIN ची MyBike घेऊन आलेला, BRM ला. माझ्या यादीत ही सायकल होतीच. लगोलग मी समूहात MyBike घेण्याविषयी पृच्छा केली. आणि सर्व दादा लोकांच्या आशीर्वादाने घेऊन सुध्दा टाकली!
गेल्या शनिवारीच माझ्या बायकोच्या या सवतीला (तिचाच शब्द!) घरी घेऊन आलो… छोट्या छोट्या राईड मारायला सुरुवात केलीये… ३० किमीवर असलेल्या माझ्या कार्यालयात रोज सायकलवरून जायचं लक्ष्य आहे. त्या दृष्टीने प्रयत्न करतोय. आणि खात्री आहे की तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांच्या जोरावर लौकरच लक्ष्यभेद करेन. याचं कारण या समूहाचं घोषवाक्य, जे आता माझा मंत्र बनलंय:
धर हँडल आणि मार पँडल!
वाचने
16460
प्रतिक्रिया
44
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे व्वा.. अभिनंदन..!!
मस्त जमलाय...भारी!
अरे वाह अभिनंदन!
धर हँडल आणि मार पँडल!
भलतंच झक्कास. मी फक्त
खंग्री. आता तुमच्याकडून
अभिनंदन
व्वाह
शुभेच्छा आहेतच
मुद्द्याचं बोललात!
In reply to शुभेच्छा आहेतच by मी-सौरभ
नक्की जमेल
शुभेच्छा!!
हभीणंदण हो भाऊ!!!
वरुन मधला नियम राहू दे...
In reply to हभीणंदण हो भाऊ!!! by देशपांडेमामा
...
शुभेच्छा ! चालूद्यात जोरदार
मस्त ! शुभेच्छा.
दोन पाय जगातील सर्वांत सुंदर वाहन, इच्छा शक्ती हेच त्याचे इंधन!
In reply to मस्त ! शुभेच्छा. by हेमंतकुमार
हाहा!
भारी ! लेखन आणि वेड, दोन्हीही
वा, मला पण फार आवडतं सायकल चालवायला
मी बी ले इचार कर्तो
मलाही फार आवडतं सायकल चालवायला
मलाही फार आवडतं सायकल चालवायला
दादाने हिरोची k10 सायकल
अभिनंदन
पुढच्या दिवाळीची खरेदी...
In reply to अभिनंदन by लिओ
हे वेडाच खरं लक्षण, अभिनंदन :
In reply to पुढच्या दिवाळीची खरेदी... by mayu4u
मी ही सायकल पुन्हा हातात
अभिनंदन!
In reply to मी ही सायकल पुन्हा हातात by दुर्गविहारी
उत्तम व्यायाम आणि प्रदुषणमुक्त सफारी म्हणजे सायकलिंग.
In reply to मी ही सायकल पुन्हा हातात by दुर्गविहारी
नक्की करा जमतेच
In reply to मी ही सायकल पुन्हा हातात by दुर्गविहारी
प्रोत्साहनासाठी, शुभेच्छांसाठी, प्रतिसादांसाठी...
सास्वांच्या कळपात आपले स्वागत
मुंबईत कधी येताय कळवा...
In reply to सास्वांच्या कळपात आपले स्वागत by दाते प्रसाद
वा वा!
छान जमलंय...
अभिनंदन
मुंबई मधील एखादा ग्रुप असल्यास माहिती द्यावी
सायकल घेताना नक्की काय काय
शक्यतो ट्रिगर शिफ्टरवाली
In reply to सायकल घेताना नक्की काय काय by जेडी
सायकल घेण्यापूर्वी...
In reply to सायकल घेताना नक्की काय काय by जेडी
अरे वा..
अरे वा! अभिनंदन!