Skip to main content

मुक्तक

(why is there nothing rather than something ???????)

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 30/06/2017 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

आवर्तन

लेखक पिशी अबोली यांनी गुरुवार, 29/06/2017 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाची आवर्तनं चालू असताना प्रत्येक थेंबाला जमिनीवर एक कोंब फुटतो, आणि पाणी वेलीसारखं पसरत जातं. अचानक थबकायला होतं, आणि भीती वाटते की आपल्याला येणारी जगाची अनुभूतीच तर चुकीची नाही ना? मी आणि माझ्या नजरेने ठरवून घेतलेल्या रूपांमध्ये ज्याचं जगणं अल्पायुषी वाटतं, त्या त्या रुपांच्या मर्यादेतून बाहेर काढलं, तर त्या पाण्याला एकच गुणधर्म राहतो-वाहतेपण. या अचानक झालेल्या जाणीवेने क्षणिक काय, नित्य काय, याच्या सगळ्या संकल्पना वाहत्या होऊन जातात. सरपटत जाणारं पाणी सापडेल तिथल्या भेगेत जुनाट वाड्याच्या भिंतींवरील वेलीप्रमाणेच चोरपावलांनी शिरतं, आणि त्या भेगेइतकंच शहारायला होतं.

आयुष्याची गाडी

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी बुधवार, 28/06/2017 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
रिकामी दिसली एक गाडी त्यात जाऊन बसलो मी आता मजा येईल प्रवासाची म्हणून स्वतःशीच हसलो मी कधी वाटलं गाडीला थांबवावं कधी सुसाट पळवावं तिला पण आयुष्य नामक चालकाने माझा पूर्ण भ्रमनिरास केला मी नेईन तसंच जायचं तू म्हणालं मला माझं आयुष्य कसला हट्ट करायचा नाही विचारायचं नाही कधी भविष्य घडवीन तुला सफर मी आता एका वेगळ्याच जादुई दुनियेची कुठे फार थांबायचं नाही आपण आणि घाईही नाही करायची आलास जसा जन्माला सगळे रंग तू बघून घे लक्षात नाही यायचा खेळ हा हे पहिल्यांदा समजून घे तुझ्यासारखेच इतर अनेक भेटतील तुला पावलोपावली तू मात्र असशील एकटाच बरोबर फक्त तुझीच सावली वाटेल तुला तूच करतोस सगळं पण तो

हिंदी सिनेमा वाल्यांचे आवडते वाद्य कोणते?

लेखक मुक्त विहारि यांनी शनिवार, 24/06/2017 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : १. खालील लेखातील मते ही माझ्या हिंदी सिमातील तुटपुंज्या ज्ञावर आधारीत आहेत.हा वैचारीक लेख नसल्याने (तसे आमचे कुठलेही लेख जास्त विचार करण्यासारखे नसतात, हा भाग वेगळा) खूप विचार करणार्‍या व्यक्तींनी ह्या लेखाकडे कानाडोळा केलात तरी चालेल. २. दुसरी गोष्ट म्हणजे मला वाद्यांमधले अजिबात काही समजत नाही. पिपाण्या : म्हनजे फुंकायची वाद्ये ह्यात बासरी पासून सनई पर्यंत सगळी वाद्ये. खाजवायची वाद्ये : सतार, तंबोरा. व्हायोलिन. बडवायची वाद्ये : तबला-डग्गा, ढोल, नगारा इत्यादी.

शिक्षणाच्या नावाने....चांगभलं!

लेखक चिनार यांनी शनिवार, 17/06/2017 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
तसे मला बरेच प्रश्न नेहमीच पडतात. त्यातले काही विचारण्यासारखे असतात तर काही नसतात. काहींची उत्तरे असतात पण ती देण्यासारखी नसतात. आणि ज्यांची उत्तरे देण्यासारखी असतात ती मला समजण्यासारखी नसतात. म्हणूनच शेवटी मी आणि माझे प्रश्न आहेत तिथेच राहतात. मनाच्या समजुतीसाठी मी आपला "तुका म्हणे उगी राहावे अन जे जे होईल ते ते पाहावे" आणि "ठेविले अनंते तैसेची राहावे" या ओव्या गुणगुणत असतो. (आता तैसेची राहावे म्हणजे कैसेची राहावे हासुद्धा प्रश्न मला नेहमीच पडतो हा भाग वेगळा!) पण सध्या एक अजब प्रकार सुरु आहे. प्रश्नांचेसुद्धा सिक्वेल येत आहेत.

बकरी ने पैसे का खाल्ले ?

लेखक खट्याळ पाटिल यांनी शुक्रवार, 16/06/2017 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
नोंद : लेखा चा हेतू फक्त मनोरंजन आणि हसवणूक आहे. लेख हा खऱ्या बातमीवर आधारित असला तरी, पूर्णतः काल्पनिक आहे. याचा कोणत्याही व्यक्ती किंवा घटनेशी काही संबंध नाही. . कृपा करून हि कथा स्वतःच्या नावाने दुसरी कडे छापू नये. copy-right संदर्भ : नुकतीच एक बातमी सर्वे पेपर मध्ये गाजत आहे कि एका बकरी ने शेतकऱ्याच्या ६२ हजारांच्या नोटा खाल्ल्या.

तो, मी आणि इगो…!

लेखक सनकी यांनी गुरुवार, 15/06/2017 17:13 या दिवशी प्रकाशित केले.
खूप दिवस झाले मन अस्वस्थ होत होतं. दिवसातून एकदा तरी त्याचा विचार मनात यायचाच. त्याच्याशी जवळ जवळ वर्षभर बोललो नव्हतो. मग एके दिवशी लावला फोन आणि बोललो. तसा व्यवस्थित बोलला, अगदी formally कोणाशीही बोलावं तसं. का कुणास ठाऊक मी त्याच्या आवाजात मायेचा ओलावा शोधत होतो, पण तसं काही जाणवलं नाही. त्याला म्हणालो कैक दिवस आपलं बोलणं किंवा भेटणं झालाच नाही, तेंव्हा भेटू. तो म्हणाला सध्या परगावी चाललोय १५ दिवस. मग मी म्हणालो आलास की फोन कर, तो हो म्हणाला नि मी फोन ठेवला. फारशी आशा नव्हती पण कुठेतरी आतून वाटत होतं की करेल फोन.

पावसावर कविता? नाय नो नेव्हर!

लेखक रातराणी यांनी बुधवार, 14/06/2017 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
आता पाऊस आला की, सगळे कविता करतील पावसावर, प्रेमावर, शहारलेल्या भेटींवर. तुम्हाला सांगते, आम्हा (सो कॉल्ड) कवीलोकांना, निमित्त हवं असतं उगा. सेंटीमेंटल कविता लिहून, मजा घेत असतो तुमची. हळवे कोपरे, हळवे क्षण, एक पाऊस पडून गेला, की सगळं कसं हुळहुळतं, आम्ही त्याचीच वाट बघतो. मग काहीबाही लिहून, जखमेवर एक फुंकर मारतो, गरम चहाचे भुरके घेत, पावसाला एन्जॉय करतो. मी नाही हा असं करणार पावसाबिवसावर कविता? लिहून लिहून काय लिहणार? कसा बाहेर पाऊस पडताना मी आत कोरडीठक्क. फारफार तर बाहेरचा पाऊस आत, आतला पाऊस बाहेर! खिडकीत बसून आठवलेली पावसातली पहिली भेट.

शाळेचा पहिला दिवस

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी बुधवार, 14/06/2017 07:59 या दिवशी प्रकाशित केले.
आज १४ जून . . प्रदीर्घ सुट्टीनंतर पहिल्यांदा शाळेत जायचा दिवस . . .नवीन गणवेश . . नवीन वह्यापुस्तकं . . . नवीन वर्ग . . . . नवीन सवंगडी . . . आपलं नाव कुठल्या वर्गात येतंय त्याची उत्सुकता . . . आपला हजेरी क्रमांक काय असेल , मग तो लकी आहे की नाही याचा अंदाज घेणे . . . नवीन शिक्षक कोण आले आहेत ते बघणे . . . . बाहेरच्या कुंद पावसाळी वातावरणात ते वाहनांचे आवाज आणि पादचारी लोकांची लगबग . . . शेजारच्या मशिदीतली ती भोंगावाली अजान . . . आपला वर्ग आणि खोली पहायला प्रवेशद्वारी उसळलेली गर्दी . . .आपलं नवंकोरं दप्तर,ते भिजू नये म्हणून आपला चाललेला आटापिटा.... त्यातले ओळखीचे आणि अनोळखी चेहरे . . .

एक भुताचा अनुभव

लेखक खट्याळ पाटिल यांनी शुक्रवार, 09/06/2017 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
नोंद : लेखा चा उद्देश अंधश्रद्धा ला खतपाणी घालणे नाहि. तेव्हा मी महाविद्यालय मध्ये शिकत होतो तेव्हाची हि माझी गोष्ट आहे. पहाटे लवकर उठून व्यायाम शाळेत जाण्यासाठी मी माझे गजराचे घड्याळ एक तासाने पुढे करून ठेवत असे, जेणे करून ५ वाजता गजर वाजला तर मी ४ वाजताच उठून एक तास अभ्यास करून फ्रेश होऊन मग ५ वाजत व्यायाम शाळेत जाईल असा होता. सकाळी लवकर ४ ला उठणे खूप जिकरीचे आणि अवघड वाटे म्हणून हि खटाटोप केली होती. असो, त्या दिवशी पण मी नेहमी प्रमाणे ५ वाजताचा गजर वाजताच उठलो, पण आदल्या रात्री मित्रांसोबत चिवडा खात खात खूप खमंग भुतांच्या गप्पा मारल्या होत्या.