एक भुताचा अनुभव
नोंद : लेखा चा उद्देश अंधश्रद्धा ला खतपाणी घालणे नाहि.
तेव्हा मी महाविद्यालय मध्ये शिकत होतो तेव्हाची हि माझी गोष्ट आहे. पहाटे लवकर उठून व्यायाम शाळेत जाण्यासाठी मी माझे गजराचे घड्याळ एक तासाने पुढे करून ठेवत असे, जेणे करून ५ वाजता गजर वाजला तर मी ४ वाजताच उठून एक तास अभ्यास करून फ्रेश होऊन मग ५ वाजत व्यायाम शाळेत जाईल असा होता.
सकाळी लवकर ४ ला उठणे खूप जिकरीचे आणि अवघड वाटे म्हणून हि खटाटोप केली होती.
असो, त्या दिवशी पण मी नेहमी प्रमाणे ५ वाजताचा गजर वाजताच उठलो, पण आदल्या रात्री मित्रांसोबत चिवडा खात खात खूप खमंग भुतांच्या गप्पा मारल्या होत्या.
मिसळपाव