Skip to main content

मुक्तक

'किनारा'यण!

लेखक दिनेश५७ यांनी बुधवार, 20/09/2017 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा एक बिनशिडाचं तारू भक्कम जहाजाचा आधार सोडून समुद्रात भरकटलं. मग तगण्याचा एकाकी प्रयत्न करू लागलं. त्यावर फक्त तिघे प्रवासी होते. प्रत्येकजण प्रचंड आशावादी, स्वाभिमानी! होडीचं वल्हं आपल्याच हाती आहे अशा समजुतीत वावरणारा! होडी भरकटत चालली तरी, हाच आपला मार्ग आहे आणि याच मार्गाने आपण कि'नारा' गाठणार यावर मात्र तिघांचही एकमत होतं. अशातच समुद्र खवळला. वादळ उठलं. होडी हेलकावे खाऊ लागली. आता आपण काही तरत नाही, या भयानं तिघंही हादरले. लांबवर एक भव्य जहाज खवळलेल्या समुद्रातही संथपणे पुढे सरकत होते. तिघांनी त्याकडे पाहून हातवारे सुरू केले. शिट्ट्या वाजवल्या. 'आम्हाला वाचवा' असा आक्रोशही सुरू केला.

कंपास पेटी

लेखक OBAMA80 यांनी बुधवार, 20/09/2017 12:18 या दिवशी प्रकाशित केले.

कंपास पेटी

********************** आपल्या सगळ्यांच बालपण अनेक लहानसहान गोष्टींनी व्यापलेले असते, मधल्या काळात त्या गोष्टींच आपल्याला अप्रूप वाटेनास होत आणि आयुष्याच्या माध्यान्ही अचानक त्या सापडल्यानंतर मन लहान मुलासारख बागडायला लागत. त्या सर्वांमधली “कंपास पेटी” ही ह्रदयाच्या सर्वात जवळची. आपल्या बालपणातील अनेक गमतीजमती, गुपीत, भांडण या पेटीशी जोडलेली असतात. त्या रम्य दिवसातील लाखों आठवणी हळुवारपणे अलगद जपून ठेवणार्‍या या छोट्या गोष्टीला “पेटी”शिवाय दुसरा योग्य शब्द नाही. ही आपल्या शालेय जीवनातील एक अविभाज्य घटक!!

रमलखुणांची भाषा

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 19/09/2017 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
जरी तुटले आतून काही, तरी नकोस ओळख देऊ जाताना थांबून थोडे, तू नकोस मागे पाहू दिसतील अनाहूत इथल्या, सावल्या गडद होणाऱ्या हुरहुरत्या संध्याप्रहरी, पावलांत घुटमळणाऱ्या खोरणात तेवत असता, फडफडेल इथली दिवली मग उरेल काजळमाया, शोषून स्निग्धता सगळी ते वादळ येईल फिरुनी, पण सावर तोल जरासा ओठींचे स्मित लपवूदे, श्वासातील खोल उसासा ते विसर उमाळे इथले, पुसताना प्राक्तनरेषा उलगडेल अवचित अवघी, मग रमलखुणांची भाषा.....
काव्यरस

प्रिय घरास

लेखक शिव कन्या यांनी सोमवार, 18/09/2017 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय घरास, नाही, तुझी आठवण येत नाही. बाई आहे मी. जाईन तिथे चूल मांडीन. रांधेन. खाऊ घालीन. चार फुले लावीन. शेज सजवीन. संग करीन. पोरं जन्माला घालीन. संसार थाटीन. वाढवीन. इथेही नवे घर करीनच की. नव्हे नव्हे केलेच आहे. नाही, तुझी आठवण येत नाही. इथे मी पायी कुठे जात नाही. गाडीत जाते. पायी चालले असते तर थबकले असते. वळून पाहिले असते. मग एखादे घर तुझ्यासारखे दिसले असते. मग खिडकीतून आत शिरले असते. पडद्यामागे लपून बसले असते. नाही नाही ते आठवले असते. उगीच तो दिवस रडून घालवला असता. म्हणून मी इथे गाडीतून गालिच्यावर, गालिच्यावरून गाडीत एवढेच पाय खाली ठेवते.

पत्र...

लेखक प. शी. यांनी रविवार, 17/09/2017 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय, तु विचारत होतास, कि corporate life कशी आहे. मुळात नाटकात आणि यात जास्त काही फरक नाही. फरक फक्त इतकाच, कि नाटकात तु होतास आणि इथे manager आहे. नाटकाचे प्रयोग असायचे, इथे projects असतात. इथे ही उशिर झाला कि बोलणी बसतात, बर का... उलट ११ चे १२ झाले कि तु फार शिव्या घालायचास... इथ मात्र manager फक्त "Good Morning" असा टोमणा मारतो. इथली लोक यास sarcasm म्हणतात... इथे हि नाटकाप्रमाणे night shifts असतात... फरक फक्त इतकाच, नाटकात सोबती ला चहा असायची इथ मात्र coffee असते. पण इथे night shift ला झोप येते रे... कदाचीत इथल्या coffee त अापल्या चहा सारखी किक् नाही...

माझी मॅक्रो फोटोग्राफीशी ओळख

लेखक उदय आगाशे यांनी रविवार, 17/09/2017 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
तसा माझ्याकडे DSLR कॅमेरा 2010 पासून होता आणि त्यावर वेगवेगळे फोटो मी काढतही असे. पण मागच्या वर्षी (2016) मधे हा विषय जरा seriously घ्यावा असे वाटू लागले. मग त्या दृष्टीने हालचाल सुरू केली. अर्थात ह्या बरोबर थोडी जास्त investment सुद्धा लागणार होती हे लक्षात आल. २०१६ च्या मे महिन्यात मग नवीन advanced कॅमेरा घेण्यापासून सुरूवात केली. लगेच जून मध्ये माथेरान येथे फोटोग्राफी विशेष ट्रिप ला गेलो. ही अर्थात मॅक्रो विशेष सहल होती आणि मला तर ह्या विषयाची काहीच माहिती नव्हती. पण जाउन तर बघू म्हणून गेलो. सकाळी लवकर उठून लोकल ने नेरळ गाठल आणि जवळच न्याहारी करून तुफान पावसातच माथेरान येथे पोहोचलो.

सामान्य माणसानी नाकासमोर चालायचं

लेखक कल्पक यांनी शनिवार, 16/09/2017 00:14 या दिवशी प्रकाशित केले.
सामान्य माणसानी नाकासमोर चालायचं फार विचार न करता गपचूप राहायचं! आधाशी आणि नालायक लोकांची होर्डिंग्स शहराला विद्रुप करतात सणांच्या नावाखाली थिल्लर गाणी वाजतात स्पीकरच्या भिंती कानाचे पडदे फाडतात पण सामान्य माणसानी नाकासमोर चालायचं फार विचार न करता गपचूप राहायचं! बेकायदेशीर बांधकामं आणि अतिक्रमणं शहराला विळखा घालतात कचऱ्याचे ढीग ठिकठिकाणी ओसंडून वाहतात खड्ड्यांमध्ये अधूनमधून दिसणारे रस्ते दुर्मिळ होतात पण सामान्य माणसानी नाकासमोर चालायचं फार विचार न करता गपचूप राहायचं! अस्मितांची भांडणं लावली की राजकीय मार्ग सुकर होतात रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य हे मुद्दे मग बाजूला पडतात दर पाच वर्ष

पाऊस, भूमी आणि मैथिली

लेखक उपेक्षित यांनी शुक्रवार, 15/09/2017 13:22 या दिवशी प्रकाशित केले.

पाऊस, भूमी आणि मैथिली

विस्कळीतपणे मांडले आहे गोड मानून घ्या. ----------------------------------------------------------------------------------------------------------- कधीपासून पावसाची झड लागलीये, *हा कोकणातला पाऊस सुद्धा इथल्या माणसांसारखाच वेडा, एकदा जीव टाकला कि पूर्ण बरसूनच जाणार*.. पावसाची झड अजूनही चालूच आहे, थोडी वाढल्यासारखी वाटत्ते आहे का ? असेल कदाचित. हि कातर संध्याकाळ या धो धो पडणार्या पावसाने अजूनच कातर भासत आहे. आतून कुठूनतरी गझलेचा आवाज येत आहे पण पावसाच्या जोराबरोबर तो आवाजही कमी जास्त होतोय...

फासले ऐसे भी होंगे...

लेखक Naval यांनी गुरुवार, 14/09/2017 19:55 या दिवशी प्रकाशित केले.
आमचा ग्रॅफोलॉजीचा (हस्ताक्षर व सही याचा अभ्यास ) क्लास चालू होता . सरांनी आम्हाला प्रत्येकाला एक कोरा कागद दिला आणि काहीही मुक्तपणे लिहायला सांगितलं त्यावर आपलं नांव न टाकण्याचीही सूचना दिली . नंतर ते पेपर्स गोळा करून त्यांनी मधूनच कुठलाही पेपर काढून त्याचं अनालिसिस कसं करायच हे समजवायला सुरुवात केली. कागदावरच्या मजकुराचा आकार, मार्जिन आणि मग एक एक अक्षर घेऊन त्या व्यक्तीच व्यक्तिमत्व उलगडू लागले . एक दोन अनालिसिस झाल्यावर त्यांनी माझा कागद सगळ्यांसमोर पकडला ,मनात खूप उत्सुकता होती आज स्वतःबद्दल काय जाणून घ्यायला मिळणार ...

उपोषण

लेखक लाल गेंडा यांनी गुरुवार, 14/09/2017 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
उपोषण (कविता कालावधी 1996) घुसमटणारी वेदना धुमसणार छत दाबायला जातो मी होत ज्वालामुखीच तोंड ज्वालानदी ही चिरडत वाहते सर्व घर ती वाहुन नेते बसतो मी मग उपोषणास एकटा सदैव एकटा तीन मंत्री घेऊन येतात हातात ग्लास त्यात रस तीन संत्रांचा असतो पण वाटत नाही मी तो नाकारतो कारण त्याच्यावर माझा विश्वासच नसतो येतात तसे जातात तीन मंत्री धूळ चढते गर्दी हटते राहते उजाड स्थळ त्या ठिकाणी दिसते एक निराश खिन्न वीराण शव ते असते माझे सतत पेटणार्याचे राहते तसेच कारण मी उपोषणाला बसलेला असतो