Skip to main content

एकदा

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 19/07/2022 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
अक्षयाचा डोह भरुनी वाहतो जेथे सदा सांडवा तिथला कुठे ते सांगशिल का एकदा? अद्भुताचा ढग निळा ओथंबतो जेथे सदा बरसतो केव्हा, कुठे ते सांगशिल का एकदा? नीरवाचा घुंगरू बघ रुणझुणे येथे सदा सातही स्वर वर्ज्य तरिही ऐकशिल ना एकदा!
लेखनविषय:

वाचने 1940
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

सांडवा तिथला कुठे ते ?
यातील सांडवा चा अर्थ काय ? अवांतर : शुद्धलेखनाच्या चुका टाळणे श्रेयस्कर. एक कवी म्हणून व्याकरणावर / शुद्धलेखनावर जास्त लक्ष द्या असे सुचवेन.

In reply to by धर्मराजमुटके

शुद्धलेखनातील नेमक्या चुका दाखविल्यास अधिक आवडेल. सांडवा सांडवा sāṇḍavā m (सांडणें) A sluice, watergate, floodgate; a vent (as through a dam or mound): also a built-up channel or passage of masonry for flowing water generally. मोल्सवर्थ शब्दकोश