मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मुक्तक

दिवाळी (?)

हर्षदा विनया ·
दिवाळी जवळ आली नाही का? मग गेली तिही खरेदीला, बरेचसे पैसे घेऊन, बरेचसे !! शिरली एका मोठ्याशा दूकानात, स्वतःचे कपडे घेता घेता हळूच, वाकून पाहत होती, पलीकडच्या, "men's section" मध्ये, तिथे न्याहाळत होती अधिक तन्मयतेने! "कोणता रंग उठून दिसेल तूला?, हा असा shirt आवडेल तूला?" विचारत राहीली मनातल्या मनात.. .................... ,........... (http://www.karadyaachhata.blogspot.com/)

आठवण

चन्द्रशेखर गोखले ·
माझ्या स्वर्गवासी पत्निसाठी..... सख्ये तुझ्या आठवणी टच्च डोळ्यामध्ये पाणी एक एक चांदणी ओघळली.... *********** अजूनही तुझी वेणी मी शोधितो गं साजणी आपुल्या शयनी पुन्हा पुन्हा.... ************ कोण खुळा तुला सांगतो..? मी अजुनही एकटाच रहातो.. खोटेच सांगतो... हा बघ एकान्त घेउन उशाला मी रोज झोपतो.. खरे सांगतो... बघ तर येउन .. मी वाट पहातो वाट पहातो..... ***********

...पण "वेळ' आली नव्हती!

आपला अभिजित ·
--------- विधान परिषदेत कुठलं भाषण करायचं, याची तयारी सुबोध मोहितेंनी सुरू केली होती. शिवसेनेला नामोहरम करण्याच्या युक्‍त्याही योजून ठेवल्या होत्या. नितीन गडकरींच्या भाषणावर कडी कशी करता येईल, याचा विचार सुरू होता. सगळी जय्यत तयारी झाली होती. विमानही सज्ज होतं. विधान परिषदेच्या उमेदवारीचा अधिकृत फोन आला नव्हता, तरी त्यांना त्याबद्दल खात्री होती. मुख्यमंत्र्यांना फोन करून त्यांनी बाकीची "व्यवस्था' ठीकठाक असल्याचंही कळवलं होतं. उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशीही अर्ज भरण्याची सूचना आली नाही, तेव्हा मात्र मोहिते अस्वस्थ झाले. येरझारा घालत असतानाच फोन वाजला. त्यांनी उत्सुकतेनं घेतला.

येस `बॉस'!

आपला अभिजित ·
मोकळ्या पटांगणाऐवजी एका बंद घरातल्या शाळेत त्या मुलांचा खेळ रंगला होता. खेळाचं नाव होतं - "महाराज म्हणतात...' खेळाचं स्वरूप साधारणपणे असं असतं ः एकानं राज्य घ्यायचं. तो होणार महाराज. मग त्यानं एकेकाला ऑर्डर सोडायच्या - महाराज म्हणतात, पाणी प्या. महाराज म्हणतात, खाली बसा. महाराज म्हणतात अमकं करा अन्‌ तमकं करा...! सगळ्यांनी त्या पाळायच्या जो पाळणार नाही, त्यानं बाहेर जायचं. इथे "महाराज'च्या ऐवजी त्याला "बॉस' म्हणत होते, एवढाच फरक... ही मुलं जरा मोठी होती. कुठल्या कुठल्या भागातून आलेली. काही वांड होती, काही आगाऊ, काही अतिउत्साही, काही खोडकर (नॉटी.). या शाळेत एक आधुनिक बाईसुद्धा होत्या.

स्वत:वर प्रेम करुन तर बघ....!!!!!

नुसताधिन्गाना ·
स्वतःच्या प्रेमात पडणं म्हणजे आपल्यातली अमर्याद प्रेम करण्याची ताकद ओळखणं. एकदा का ही ताकद ओळखली, की आपण स्वतःवरच नव्हे, तर सगळ्यांवरच प्रेम करू लागतो. ....... तुम्ही स्वतःच्या कधी प्रेमात पडला आहात? स्वतःच स्वतःला खूप आवडला आहात? विचित्र वाटतोय प्रश्‍न, की असा कधी विचारच आला नाही मनात? हा काही आध्यात्मिक प्रश्‍न नाहीए. साधा सरळ विचार आहे. आपण आपल्याला आवडणे यासारखी सुंदर गोष्ट नाही. आपण नेहमीच इतरांशी असलेल्या आपल्या नात्यांविषयी बोलत असतो, पण आपलं आपल्याशीही काही नातं असतं, याचा अनेकदा विचारच करत नाही. आपण आपल्यालाच काही देणं असतो. आपलं आपल्याशीच काही मागणं असतं.

लोच्या झाला रे !!!

अनिल हटेला ·
नमस्कार मिपाकर्स !! चीन मध्ये येउन साधारण ६ महीने झालेत .. आणी हाय हॅलो पूरत चायनीज बोलायला शिकलोत ..(भाषेत आधी पासुनच कच्चा!!) विशेष म्हणजे चीन मध्ये राहुन काम करायच तर तुम्हाला चायनीज (थोडीफार का होइना)यायलाच हवी . नाय तर फारच त्रास होतो ... चायना मेड मालाची निर्यात करणा-या एका फर्म मध्ये क्वालीटी चेक करण्याचे (थोडक्यात पाट्या टाकायचे) महत्त्व पूर्ण काम मी करतो.. आणी कामानिमित्त सारख भटकंती चालू असते ... साधारण पणे प्रत्येक फॅक्टरीत कोण ना कोण ईंग्लीश येणारा (मोस्टली येणारी) असतोच/असतेच ... पण ब-याचदा असा कोणी प्राणी नसेल तर मग आमचा द्वीभाषीक संवाद ऐकून /पाहुन कुणाचीही करमणुक होइन .. २ म

...हमने इश्क किया है.(१)

रामदास ·
झेंडूच्या उफाड्यावर दिवसभर, निलाजरी पुंडाई करणारा उनाड चतुर. नाईलाजाच्या वाटेने घरी येतो. तसा मी येतो तिनसांजेला. तेव्हा... तुझ्या ओंजळीतली गुलबाक्षी चिंबून गेली असते. बावळट... ***** अशीतशी इथे तिथे वाट बघू नको माझी. का? का? का?.. तुझ्या सात्वीक ओठाची गुलबाक्षी थरथर. (मी वसूल करतो माझी भ्रष्ट निराशा) का? काय बावळट.. का?..का? का? का?.. कारण.. का? का?.. कावळ्याची असते नजर -गस्त पिकत्या पपईवर.

बालकं - खलिल जिब्रानच्या मुक्तकाचा अनुवाद

चतुरंग ·
मध्यंतरी विनायक प्रभूंच्या एका समुपदेशनाच्या लेखात प्रतिक्रिया देताना मी खलिल जिब्रानच्या एका इंग्लिश मुक्तकाचा उल्लेख केला होता. विप्रंनी त्याचा अनुवाद करुन देता का म्हणून विचारणा केली होती. बरेच दिवस त्याला हात घालीन म्हणत होतो आज थोडी सवड मिळाली आणि मी त्याच्या माझ्या परीने भावानुवाद केलाय तो मिपाकरांसाठी सादर आहे. जिब्रानने व्यक्त केलेले विचार मला पटलेत आणि माझ्या मुलाशी वागताना ते मला पदोपदी जागेवर आणायचे काम चोख करत असतात!

नशीब

दत्ता काळे ·
१. चंद्रकिरणात समुद्राच्या वाळूवर सळसळणार्या माडांच्या विक्राळ सावल्या, अन् चमचमणारी एक मासोळी, तडफडून क्लांत थिजलेल्या, असाह्य डोळ्यांनी दिपस्तंभाचे ते मार्ग दाखवणारे लांबच लांब हात पहात शेवटच्या लाटेच्या प्रतीक्षेत . . . . २. मी विक्रमादित्य, एक मतदार सत्तांध, मतलबी वेताळाला दर पाच वर्षांनी खांद्यावर घेऊन येतो विकासाच्या लालसेपोटी . . . खोटया आश्वासक गोष्टी सांगून, मलाच कोड्यात पाडून वेताळ हवेत विरुन जातो मलाच बेरोजगारी, दारिद्र्याच्या अकाली स्मशानात टाकून . .

सीमापाश

अरुण मनोहर ·
फ़ार फ़ार पूर्वी, अगदी सुरवातीला. अमर्याद पसरलेले जंगल होते. सीमा अशी काहीच संकल्पना नव्हती. मात्र वाघ सिंहानी गजबजलेल्या भागात इतर प्राणी जाणे टाळत असायचे. सीमेची ही सुरवात असावी. बुद्धीची देणगी लाभलेली एक प्राणीजात जनावर जातीच्या सीमा सोडून मानवी झुंडीच्या सीमा बनवून राहू लागली. त्या सीमेला गुहा असे नाव पडले. पुढे जसजशा झुंडी वाढू लागल्या गुहेच्या अपुऱ्या सीमा आता टोळ्यांच्या सीमा झाल्या. त्या झाडापासून त्या ओढ्यापर्यंत ह्या किनाऱ्यापासून त्या पर्वतापर्यंत सीमा प्रस्थापित झाल्या. मानवाच्या सीमीत नजरेपासून दूर दूर मानवाला मापणेही शक्य नसलेल्या सीमेच्या पलीकडे त्रीमीती सिमांनी न बांधलेल्या ज