मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नशीब

दत्ता काळे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
१. चंद्रकिरणात समुद्राच्या वाळूवर सळसळणार्या माडांच्या विक्राळ सावल्या, अन् चमचमणारी एक मासोळी, तडफडून क्लांत थिजलेल्या, असाह्य डोळ्यांनी दिपस्तंभाचे ते मार्ग दाखवणारे लांबच लांब हात पहात शेवटच्या लाटेच्या प्रतीक्षेत . . . . २. मी विक्रमादित्य, एक मतदार सत्तांध, मतलबी वेताळाला दर पाच वर्षांनी खांद्यावर घेऊन येतो विकासाच्या लालसेपोटी . . . खोटया आश्वासक गोष्टी सांगून, मलाच कोड्यात पाडून वेताळ हवेत विरुन जातो मलाच बेरोजगारी, दारिद्र्याच्या अकाली स्मशानात टाकून . . . मी माझा ह्ट्ट न सोडता परत जाईन मुर्ख बनायला, अन् त्याच वेताळाला खांद्यावरुन आणायला.

वाचने 1538 वाचनखूण प्रतिक्रिया 3