Skip to main content

मुक्तक

तगमग

लेखक शरदिनी यांनी सोमवार, 09/03/2009 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
अवहेलनेचे बकासूर टाचा झिजवताय्त.. अन् मी उन्मुक्त रंगबावरी भिरभिरतेय ध्येयवेड्या रूपरेषा धुंडाळत त्याच त्या साजणगहिर्‍या रंगहाका पिंपळरसिकांचा अत्तरटाहो रक्तसूज्ञांचा दंभपराभव अन् प्रतिबिंबांचा जादूटोणा यक् अन् असल्याच शब्दांना कंपूबाजांच्या "छान गं, मस्त गं, पाणी आलं गं, सुंदर कल्पना गं, कसं सुचतं गं.." असल्या छप्परतोड प्रतिक्रिया काहिली काहिली जिवाची वाटते सांगावे मी कोण या सार्‍यांना .. की या तेजतर्रार शून्यमनस्कतेचा उकळत्या तेलात टाकून एक मेदूवडा बनवून खावा खुसखुशीत??...

आम्ही चालवू हा पुढे वारसा...

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 09/03/2009 13:37 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस अस्वस्थ होतो. इस्राईलनं केलेल्या हल्ल्यात नाहक बळी पडलेल्या शेकडो पलेस्टिनींबद्दलची ही अस्वस्थता होती का? इथिओपियामधल्या दुष्काळग्रस्तांना खायला अन्न नसताना इथे लोक फुकटच्या मेजवानीतदेखील अन्नाची नासाडी करत असल्याबद्दलची होती का? शेकडो अधाशी, उतावळे उपवर तरुण गुढग्याला बाशिंग बांधून तयार असताना करीना कपूरनं सैफ सारख्या द्वितीय वराशी सूत जमवावं, याबद्दलची ही आर्त वेदना होती का? की आपल्या लेखनाला कुत्रंही विचारत नाही, त्याची व्यथा?? छ्या! ही अस्वस्थता, वेदना, वैषम्य होतं आपली पोरगी काही आपल्या पावलावर पाऊल ठेवून चालत नाही, त्याचं! एकदा हात मोडणं, एकदा उजव्या बोटावर कोयती, एकदा ड

कधी येणारगं तू सखये

लेखक अडाणि यांनी सोमवार, 09/03/2009 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळी वारा वाहता मेघदूत नी गारा होत्या मन माझे मग काहूरते कधी येणारगं तू सखये झाडावरचा राऊ मजला हळुच घालतो शीळ स्वरांची जाणुनबुजूनी माझ्याभोवती आठवण करीतो तुझ्या सुरांची रवीराज तो गहीवरलेला सांजवेळी बहरत होता मुक्तहस्ते तळ्याकिनारी तुझा रक्तिमा वाटत होता कोपरावरच्या वळणावरती मोगराही बहरलाय माझ्या वेड्या जिवाबरोबर तो ही तुझ्यासाठी आतुरलाय एक नभ जो जाई सुसाट वाटे तयावर स्वार होउनी मी यावे ऊडीनी अलगद कुशीत तुझया एक क्षणिक सरूनी जाते संध्याकाळ तुझ्या आठवणित नकळत मन माझे मग काहूरते कधी येणारगं तू सखये - अडाणि.
Taxonomy upgrade extras

मी जगतो आहे

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी सोमवार, 09/03/2009 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
मी झुंडी बरोबर जगतो आहे, झुंडी बरोबर तडजोड करतो आहे, दुस-याशी जुळवुन घेण्यासाठी, अ़खंड धडपडतो आहे....! मी जसा आहे तसा कुणी च स्विकारत नाही मला, म्हणुनच दुस-यांना पाहिजे तसा..
Taxonomy upgrade extras

जग रहाटी

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी गुरुवार, 05/03/2009 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
आईच्या गर्भातुन बाहेर येतांना मला खूप दु:ख झाले, शाश्वत वात्सल्याचच ठिकाण ते... कस सोडवणार......? मी खूप रडलो, अगदी टाहो फोडला.. पण व्यर्थ....! आश्चर्य म्हणजे.. मी इतका रडत होतो, पण माझी आई मात्र हसत होती..! आईच काय , सभोवतालची सारीच माणसे हसत होती..
Taxonomy upgrade extras

(रांधण्याची शिकवणी)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 04/03/2009 20:31 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा मागल्यासारखंच! हे रामदास काही उ(हु)च्च लिहून जातात आणि आमचा धर्म आम्हाला सोडवत नाही हो! त्यांची 'गाण्याची शिकवणी' वाचली आणी आमच्या वेगळ्याच शिकवणीचे तास डोळ्यांसमोर येऊन गेले!

थंडीतली सकाळ

लेखक सहज यांनी बुधवार, 04/03/2009 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
पंखा सुरू, पांघरुण ओढले, दिवा लागतो उठ आता, वेळ झाली, बाबांची विरत जाणारी आरोळी मग आई हळुच आत येते पंखा बंद करुन, उठ हा आता डोक्यावरुन हात फिरवून जाते पुन्हा एकदा बाबा येउन आज नाही आहे का ग क्लास? माझ्याजवळ उभे राहुन आत आईला मोठ्या आवाजात प्रश्न. चहा घ्या, पेपर आलाय आईचे बांबाना बाहेर बोलावणे अरे पावणेसात झाले असे आई म्हणताच ओह नो!
Taxonomy upgrade extras

?

लेखक शितल यांनी रविवार, 01/03/2009 01:20 या दिवशी प्रकाशित केले.
तू एक स्वप्न आहेस की सत्य? हा तुझा आभास का तुझी जाणीव करून देणारा अलगद स्पर्श? मनाला काहीच उमजत नाही ... आणि शरीरालाही. सगळे विसरून वर्तमानात जगायचे, तरी घुसमट होते. मनाच्या कोपर्‍यात, खोल कुठेतरी एक साद ऐकू येत आहे. आवाज ओळखीचा वाटतोय पण आज तर माझाच आवाज मीच विसरले आहे! तुझ्या सादाला प्रतिसाद द्यायला टाळतेय... का? कारण तू सत्य का तुझा मृत्यू सत्य? ... शरीर म्हणते तू आज जगात नाहीयेस, मन म्हणते तू मला सोडुन कुठे ही दूर नाही... फक्त माझ्यासाठी... मृत्यू नंतरही माझ्याजवळ.
Taxonomy upgrade extras

लग्नाच्या "बाजार'गप्पा!

लेखक आपला अभिजित यांनी शनिवार, 28/02/2009 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
लग्न हा "बाजार' म्हटला जातो. मनांचं मीलन बिलन खूपच दूर राहिलं. अनेकदा फक्त महत्त्वाचा असतो व्यवहार! "देहभान' नाटकात मुक्ता बर्वे म्हणते ना..."बुद्धिमत्ता वगैरे सगळं झूट आहे. शेवटी मुलग्याचा पगार आणि मुलीचं रूप, यावरच सगळं ठरतं!' आमच्याही "लग्नावळी'च्या अनुभवातले हे काही किस्से...अर्थातच, क्रमशः! (किस्से क्रमशः लिहिले नाहीत, तर तो "मिपा'वर फाऊल धरतात!) --- "हॅलो' ""हां. बोला.'' ""मी XYZ बोलतोय. तुमच्या मुलीची माहिती वाचली होती एका लग्नसंस्थेत.'' ""बरं.'' ""माहिती आवडली होती, म्हणून भेटायचं होतं.'' ""बरं.

निर्बलता

लेखक शिवापा यांनी शुक्रवार, 27/02/2009 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी स्पष्ट आठवते. टेकडीचा रस्ता. उतरलेली उन्हे. तुझा हात, विस्कटलेले केस ओलेते डोळे अणि तापलेले श्वास. काही क्षणांचा प्रवास. दरम्यानचे वाढलेले अंतर मनाच्या इच्छा, मिठीच्या अपेक्षा. पण आपण ठरलो नदीचे दोन किनारे. आज इतक्या दिवसानंतर डोळे न्याहाळाताहेत खिडकीच्या झरोक्यातून आत येऊ पहाणार्या आंब्याच्या डहाळीला. हि फांदी मी कितीतरी वेळा तोडली असेल. पण काहि दिवसांनतर ती पुन्हा हिरवी होते. परत एकदा घरात डोकावन्याकरीता आतुर. मग विशाद वाटतो. किती निरंतरता आहे तिच्या प्रयासात आणि किती निर्बलता होति माझ्या प्रयासात.