Skip to main content

मुक्तक

[कूळ ]

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शुक्रवार, 25/06/2010 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
[इतके काव्य पचवल्यावर मी कसा दूर राहू. मूळ कवीचे आभार ] :) लॉगीन केल्याबरोबर, याची तक्रार त्याची तक्रार मी शांतपणे वाचत असायचो. तो या आयडीने यायचा अन ती या आयडीने यायची. तोल सांभाळत एकमेकांना डोळा मारत, काहीच्या काही प्रतिसाद ती टाकायची संपादक त्यांना समजून घ्यायचे. काळाबरोबर बदलत अनेक सदस्य रंगून गेले मी मात्र दाबत आहे डिलीट बटन या धाग्यावरुन त्या धाग्यावर. व्यर्थ...!
काव्यरस

पालट

लेखक स्पंदना यांनी शुक्रवार, 25/06/2010 15:33 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाची रिपरिप सुरूच होती. हे असं एकसारख रिपरिपणं मग हळुहळू तुमच्या गाभ्या पर्यंत उतरत जातं. सकाळ तशी झालीच नव्हती. वेळेनुसार डोळे उघडले, तर बाहेर हे रिपरिपणं ! सूर्याला सुद्धा कंटाळा आला असावा. दर्शन देण्याचीसुद्धा तसदी न घेता त्यानंही "दिवस सुरू" असं घोषित करून परत कूस बदलली असावी. पाऊस असो वा नसो; डोळे उघडायची तुमची इच्छा असो वा नसो, घड्याळ कधी कुणासाठी थांबलय? मग घड्याळ्याकडे पाहत पाहत, सगळ्यांच्या आंघोळी, दोघांची दुधं, आमचा चहा. हाताला चक्र बांधल्यागत झर झर कामं हातावेगळी केली.

( फौल ) : स्पॅनिश व्हर्शनसह ...

लेखक छोटा डॉन यांनी शुक्रवार, 25/06/2010 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
काल अवलियांनी त्यांचे 'रुळ' हे काव्य मिपावर टाकुन मॅच सुरु झाल्याची शिट्टी वाजवली आणि त्यानंतर एक से एक महारथी मैदानात उतरले आणि त्यांनी धडाधङ गोल मारुन अगदी बाजार उठवला. पण आम्ही काल जरा 'इंज्युयर्ड' असल्याने बेंचवरुनच हे सामने पाहिले, आज आमच्याअ फिजियोने आम्हाला फिट घोषीत केले अहे व आम्ही मैदानात उतरलो आहोत ...
काव्यरस

रुळ

लेखक अवलिया यांनी गुरुवार, 24/06/2010 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
हातात हात घेवुन आम्ही चालायचो ती एका रुळावर पाय ठेवायची अन् मी दुस-या रुळावर पाय ठेवायचो तोल संभाळत चालत असतांना बोलत असतांना असंच आयुष्यातही संभाळायचे एकमेकांना हलकेच बजावुन सांगायचो करिअरच्या रुळावरुन कधीतरी तिची गाडी निघुन गेली मी मात्र मारत आहे त्याच रुळांवरुन शटलसारख्या चकरा... टर्मिनस टु टर्मिनस.

गीत: कधी कधी खोटं बोलाया लागते

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 22/06/2010 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी खोटं बोलाया लागते
कधी काम करतांना, कधी काम सांगतांना तुमची आमची कसोटी खरोखर लागते लोकहो तुम्हां खरखरं सांगतो, तेव्हां कधी कधी खोटं बोलाया लागते ||धृ|| लहाणपणीचे साधे उदाहरण तुम्ही घ्याना शिक्षक सांगती अमूक तमूक गृहपाठ करूनी आणा न केला अभ्यास तर तुम्ही काय देता उत्तर? ठावूक असे गुरूजनांना त्याचे कारण तरीही शिक्षा मिळे तुम्हांला ओल्या छडीची खोटे बोलणे तेव्हा आपसूक येई तुमच्या ओठी असलेच खोटे खोटे बोलणे तेव्हापासून सुरू होते म्हणून तुम्हा खरखरं सांगतो तेव्हा कधी कधी खोटं बोलाया लागते ||१|| मोठे

वाकुल्या दाखवणारा अदृश्य मुद्राराक्षस

लेखक अरुंधती यांनी मंगळवार, 22/06/2010 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
ही गोष्ट काही महिन्यांपूर्वीची! माझ्या अनेक मित्रमैत्रिणींनी व परिचितांनी ''तू आंतरजालावर नियमित का लिहित नाहीस?'' वगैरे उद्गार काढून मला आंतरजालीय लिखाणाच्या दिशेने ढकलल्यानंतरचा काळ होता तो! तर, आंतरजालावरील एका मराठी संकेतस्थळावर माझा एक 'अभ्यासपूर्ण' लेख प्रसिद्ध झाला. वस्तुतः त्या लेखात अभ्यासपूर्ण वगैरे फारसे काही नव्हते. बरीचशी माहिती एकत्र संकलित करून दिली होती इतकेच! त्याचे कारणही हेच होते की जेव्हा त्या विषयावर मी आंतरजालावर मराठीतून माहिती शोधायला गेले तेव्हा अतिशय थोडी माहिती हाताशी लागली.

आपली व्यक्तिपूजा

लेखक अभिरत भिरभि-या यांनी सोमवार, 21/06/2010 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
एका आवडलेल्या कवितेचा भावानुवाद .. आपली व्यक्तिपूजा तुम्ही आम्ही, या देशातील व्यक्ति-पुजारी आम जनता केवळ व्यक्तीरूप मूर्ति शोधतो .. घडवतो. .. वंदण्याकरता पूजेकरता .. हार घालण्याकरता .. आरत्या करण्याकरता .. मैदानातल्या मांडवात स्थापना करण्याकरता ..
काव्यरस

कोल्हापुरी तडका!!!

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 19/06/2010 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
परवा कोल्हापूरला गेल्तो... जाताना, प्रवासातच, आठवणींची जुळवाजुळव करून ठेवली होती... कोल्हापुरात जायचं म्हटलं, की मला बर्‍याच वेळा `सत्यवादी' आठवतो... ते तीनचार रंगाचे, उभे पट्टे असलेलं पहिलं पान, आणि त्यावरच्या मस्त मथळ्यांच्या बातम्या... त्यातले खास कोल्हापुरी शब्द... ते आठवतच सकाळी कोल्हापुरात उतरलो. रेस्ट हाऊसवर गेलो, आणि जस्ट फ्रेश होऊन भायेर पडलो. मस्त पाऊस पडून गेल्ता...

अगा लेखकांनो

लेखक सन्जोप राव यांनी शुक्रवार, 18/06/2010 06:41 या दिवशी प्रकाशित केले.
हे तुमचं लिखाणबिखाण गोष्टीबिष्टी, लेखबिख, कविताबिविता हे सगळं ठीक आहे चांगलंच आहे उदाहरणार्थ चंद्र, नद्या, पक्षी, फुले, निसर्ग पहिला पाऊस, आईची माया, माणुसकी फुटपाथवरची म्हातारी, प्रेयसीची आठवण, फाटका झगा जन्म, मृत्यू, प्रेम, स्वार्थ, मैथुनही गडकर्‍यांपासून कोलटकरांपर्यंत दासू वैद्य, वर्जेश इश्वरलाल सोळंकी मध्ये विंदाबिंदा, बाकीबाब, पाडगावकर आणि कुसुमाग्रज सगळे झाडून कवी झाले बघा गाडगीळ, गोखले, माडगूळकरांपासून गवस पेठ्यांपर्यंतच्या कथा घ्या आपट्यांपासून महाजनांपर्यंत कादंबर्‍या घ्या दोस्तोवस्की घ्या, टॉलस्टॉय घ्या, स्ट्रिंडबर्ग घ्या लोकांना माहिती असलेले तर घ्याच, पण माहिती नसलेले आधी घ्या वैच
काव्यरस

मुसळ धार पाऊस

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 16/06/2010 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
मुसळ धार पाऊस असतो व आपण झाडाच्या वा बस स्टॅण्डच्या आडोश्याला उभे असतो..पावसाने निम्मे तर भिजवलेले च असते.. आज झाला तसाच पाउस सुरु असतो..रस्त्यावर तुरळक वहातूक...गाड्या हेड लाईट फ़ुल ऑन करुन मंद गतिने धावत असतात.. वेगाने येण्या~या जलधारा अंगावर झेलत वसुंधरा त्रुप्त होत असते..बोचरे वहाणारे वारे झाडांशी लगट करित झाडे लयात हलत असतात.... वातावरणात एक सुखद गारवा पसरु लागतो.... रस्त्या वरुन एखादा तरुण व त्याला मागुन घट्ट बिलगलेली तरुणी पावसाची मजा लुटत होंडा मोटर सायकल वरुन जाताना दिसते.. सारे जण अंग आखडुन उभे असतात.